केस वाढवणं सोपं पण मेंटेन करणं कठीण. (Hair Care Tips) केस वाढवण्यासाठी तुम्हाला जितकी मेहनत लागते तितकीच वाढलेले केस चांगले दिसावेत यासाठीही मेहनत घ्यावी लागते. (Homemade Hair Pack For Stop Hair Fall) अन्यथा केस मोठे असूनही आकर्षक दिसत नाहीत. केस कुमकुवत होणं, केस तुटणं असे त्रास उद्भवतात. केसांना काळे आणि दाट बनवण्यासाठी तुम्ही एका घरगुती हेअर मास्कचा वापर करू शकता. हा हेअर मास्क केसांना लावल्याने तुम्हाला बराच फरक जाणवेल. घरी बनवलेला असल्यामुळे केमिकल्स यात नसतील, केस खराब होण्याचा धोकाही नसेल. (How to stop Hair Fall using Kitchen Things)
मेथीच्या दाण्यांचा हेअर मास्क कसा तयार करायचा?
मेथीचे जाणे अनेक गुणधर्मांनी परिपूर्ण असतात. थंडीच्या दिवसात लोक मेथीचे लाडू खातात कारण मेथी हाडांदुखी, कंबरदुखीसाठी उत्तम ठरतात. मेथीचे सेवन केल्याने हाडांची झीज भरून निघण्यास मदत होते. इतकंच नाही तर थकवा, अशक्तपणा यांसारख्या समस्याही टळतात. मेथीचे दाणे केसांच्या आरोग्यासाठीही उत्तम ठरते. मेथीच्या दाण्यांचा वापर करून तुम्ही केस लांबच लांब वाढवू शकतात.
कमी वयातच पांढरे केस उगवू लागले? आठवड्यातून एकदा 'हे' घरगुती टॉनिक लावा, काळे होतील केस
मेथीच्या दाण्यातील गुणधर्म केसांना मजबूत बनवण्यासाठी गुणकारी ठरतात. फॉलिक एसिड, व्हिटामीन के, व्हिटामीन सी, व्हिटामीन ए आणि एंटी ऑक्सिडेंट्सने परिपूर्ण असतात. यामुळे हेअर फॉल रोखण्यास मदत होते. हेअर मास्क बनवण्याची सोपी पद्धत पाहूया.
मेथीच्या दाण्यांचा हेअर मास्क करण्याची सोपी पद्धत (How to Make Methi Dana Hair Mask For Hair Growth)
1) आपल्या केसांची लांबी आणि वॉल्यूमनुसार जितके लागतील तितके मेथीचे दाणे पाण्यात भिजवून फुलवण्यासाठी ठेवून द्या. नंतर सकाळी उठून या फुललेल्या दाण्यांची एक पेस्ट बनवून घ्या.
2) पेस्ट वाटल्यानंतर मिक्सरमध्ये दाणे आणि पाणी घालून एक जाडसर पेस्ट तयार करा. या पेस्टमध्ये गरजेनुसार गुलाब पाणी आणि नारळाच्या तेलाचे काही थेंब मिसळा.
पोट सुटण्याच्या भितीने भात कमी खाता? या पद्धतीने हवा तितका भात खा-१ किलोही वजन वाढणार नाही
3) ३० मिनिटं केसांवर लावून तसंच सोडून द्या. त्यानंतर माईल्ड शॅम्पूने केस धुवा. चांगल्या परिणामांसाठी हा पॅक आपल्या केसांना आठवड्यातून एकदा लावा.