Lokmat Sakhi >Beauty > केसाचं गळणं ताबडतोब थांबवेल हे घरगुती हेअर सिरम; पटापट वाढतील केस, दिसतील चमकदार

केसाचं गळणं ताबडतोब थांबवेल हे घरगुती हेअर सिरम; पटापट वाढतील केस, दिसतील चमकदार

Homemade Hair Serum for Hair Growth : हेअर केअर उत्पादनांमध्ये हेअर सिरमसुद्धा असते. हिटींग टुल्स वापरण्यापूर्वी केस खराब होऊ नयेत यासाठी ते वापरले जाते.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 03:28 PM2023-04-27T15:28:30+5:302023-04-27T16:39:45+5:30

Homemade Hair Serum for Hair Growth : हेअर केअर उत्पादनांमध्ये हेअर सिरमसुद्धा असते. हिटींग टुल्स वापरण्यापूर्वी केस खराब होऊ नयेत यासाठी ते वापरले जाते.

Homemade Hair Serum for Hair Growth : Powerful Homemade Serum For extreme Hair Growth | केसाचं गळणं ताबडतोब थांबवेल हे घरगुती हेअर सिरम; पटापट वाढतील केस, दिसतील चमकदार

केसाचं गळणं ताबडतोब थांबवेल हे घरगुती हेअर सिरम; पटापट वाढतील केस, दिसतील चमकदार

केस गळण्याची समस्या तिशी, चाळीशीनंतर सर्वाधिक उद्भवत असतील तरी आजकाल खाण्यापिण्यातील बदल आणि अनियमिततेमुळे कमी वयातच लोकांचे केस गळतात. केस गळणं थांबवण्यासाठी आणि केसांची वाढ होण्यासाठी नवीन तेलं, शॅम्पू बाजारात उपलब्ध आहेत. (Powerful Homemade Serum For extreme Hair Growth) तर काहीजण केस गळू नये म्हणून कंगवासुद्धा बदलतात. लाकडाच्या कंगव्यांची क्रेझही महिलांमध्ये आहे. केस जास्त गळू नयेत यासाठी अनेकजणी पार्लरमध्ये जाऊन हजारो रुपये खर्च करतात पण त्याचा हवातसा परिणाम दिसत नाही. (Homemade hair serum for hair growth)

हेअर केअर उत्पादनांमध्ये हेअर सिरमसुद्धा असते. हिटींग टुल्स वापरण्यापूर्वी केस खराब होऊ नयेत यासाठी ते वापरले जाते. हेअर सिरम घरच्याघरीसुद्धा बनवता येते. घरी बनवलेलं हेअर सिरम केस दाट, काळेभोर करण्यास मदत करते. याशिवाय गळणाऱ्या केसांचा त्रास  ही कमी होतो. घरच्याघरी हेअर सिरम बनवण्यासाठी तुम्हाला जास्त खर्चही करावा लागणार नाही.

हेअर सीरमचा  वापर कोणीही करू शकते. फक्त तुमच्या केसांच्या गरजेनुसार कोणते हेअर सीरम चांगले असेल हे तुम्हाला माहित असले पाहिजे. हे समजून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या ब्युटीशियनची मदत घेऊ शकता. कारण कोरड्या केसांसाठी मॉइश्चरायझिंग सीरम असते आणि तेलकट केसांसाठी विविध प्रकारचे न्युट्रिशनिंग सीरम. हेअर सीरम नेहमी स्वच्छ केसांमध्ये वापरावे.

चेहरा अजिबात काळा पडणार नाही; आंघोळीनंतर १ काम करा, दिवसभर फ्रेश दिसेल त्वचा

शॅम्पूनंतर तुमचे केस कोरडे झाल्यावर तुम्ही स्टाइल करण्यापूर्वी हेअर सीरम वापरू शकता. जर तुम्ही तुमच्या केसांच्या गरजेनुसार योग्य हेअर सीरम निवडले असेल तर तुम्ही ते रोज लावू शकता. कारण हेअर सीरम कोणत्याही प्रकारचे कोटिंग किंवा थर मागे सोडत नाही. त्याऐवजी, हे पोषक तत्वांनी भरलेले एक द्रव आहे, जे केसांना आवश्यक पोषण देण्याचे काम करते.

केस पिकलेत, केमिकल डाय नको वाटतो? मेहेंदीत हा पदार्थ मिसळून लावा; काळेभोर राहतील केस

जर तुम्ही तुमच्या केसांच्या गरजेनुसार योग्य हेअर सीरम निवडले असेल तर तुम्ही ते रोज लावू शकता. कारण हेअर सीरम कोणत्याही प्रकारचे कोटिंग किंवा थर मागे सोडत नाही. त्याऐवजी, हे पोषक तत्वांनी भरलेले एक द्रव आहे, जे केसांना आवश्यक पोषण देण्याचे काम करते.

Web Title: Homemade Hair Serum for Hair Growth : Powerful Homemade Serum For extreme Hair Growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.