बऱ्याचदा आपले केस रुक्ष, निस्तेज, खरखरीत होतात. असे केस अगदी निर्जीव दिसतात. यामुळे केसांचा लूक आणि सौंदर्य खराब दिसू लागते. अशा केसांची हेअर स्टाईल करणं किंवा ते मोकळे (How To Do A Hair Spa At Home) सोडणं देखील कठीण होत. अशा केसांसाठी आपल्यापैकी बऱ्याचजणी पार्लरमध्ये (Hair Spa Cream for Dry & Frizzy Hair) जाऊन हेअर स्पा, स्ट्रेटनिंग,बायोटीन, केराटीन अशा (homemade hair spa cream) विविध प्रकारच्या ट्रिटमेंट करतात ज्याने केस सिल्की होण्यास मदत होते. या ट्रिटमेंटसाठी एकतर बरेच तास जातात आणि केमिकल्सच्या वापराने केस कायमचे खराब होण्याची शक्यता असते.
इतकेच नाही तर या ट्रिटमेंट खूप महाग असल्याने त्यासाठी हजारो रुपये मोजावे लागतात. इतके महागडे उपाय करूनही काहीवेळा ते फेल ठरतात. याचबरोबर, केसांवर असे केमिकल्सयुक्त उपाय केल्याने केस अधिकच खराब होण्याची भीती असते. पण घरच्या घरी नैसर्गिक पदार्थांचा वापर करुन रुक्ष - निस्तेज, खरखरीत झालेल्या केसांना एक नवा लूक देऊ शकतो. त्यासाठी घरात अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या काही नैसर्गिक पदार्थांचा वापर करुन केस सिल्की-मुलायम होण्यास मदत होते. चमकदार, गुळगुळीत मजबूत केसांसाठी एका खास घरगुती सिक्रेट क्रीम वापरुन हेअर स्पा कसे करायचे ते पाहा.
साहित्य :-
१. पाणी - १ ग्लास
२. अळशी - २ टेबलस्पून
३. तांदुळाचे पीठ - २ टेबलस्पून
४. खोबरेल तेल - २ टेबलस्पून
५. एलोवेरा जेल - १ कप
मांड्यांच्या आतील भाग काळपट पडला? जाणून घ्या कारणं आणि उपाय - 'अशा' पद्धतीने घ्या त्वचेची काळजी...
केसांवर मेथीची जादू, सगळे विचारतील सुंदर केसांचं सिक्रेट! मेथीचे ४ उपाय, केसही म्हणतील थँक्यू!
कृती :-
१. सगळ्यांत आधी एका भांड्यात पाणी घेऊन ते व्यवस्थित गरम करून घ्यावे.
२. या गरम केलेल्या पाण्यांत अळशीच्या बिया आणि तांदुळाचे पीठ घालावे.
३. आता हे दोन्ही जिन्नस चमच्याने हलवून पाण्यांत मिसळून घ्यावे.
४. ५ मिनिटांनंतर गॅस बंद करुन हे सगळे मिश्रण एका बाऊलमध्ये गाळणीने गाळून घ्यावे.
५. हे गाळून घेतलेलं मिश्रण थोडं थंड झाल्यावर यात खोबरेल तेल आणि एलोवेरा जेल घालावं.
उन्हाळ्यात अंगाला साबण नका लावू, ‘ही’ पावडर लावा-घामाची दुर्गंधी जाईल,डिओ-परफ्युमची गरजच नाही...
याचा वापर कसा करावा ?
१. हे मिश्रण हातांनी किंवा ब्रशच्या मदतीने केसांच्या मुळांपासून ते खालच्या टोकापर्यंत लावून घ्यावे.
२. त्यानंतर हे मिश्रण केसांवर एक तास तसेच लावून ठेवावे.
३. मग पाण्याने केस स्वच्छ धुवावेत.
४. आठवड्यातून एकदा हा उपाय केल्यास रुक्ष, निस्तेज, रखरखीत झालेले केस स्मूद, सिल्की आणि शायनी होतील.
अशा प्रकारे आपण नैसर्गिक पदार्थांचा वापर करून पार्लर सारखी हेअर केराटिन ट्रिटमेंट घरीच करु शकतो.