हिवाळ्यात त्वचेचा कोरडेपणा वाढल्याने डोक्यात कोंडा होण्याची समस्या खूप जास्त वाढते. केसांतला कोंडा वाढला की केस गळणं तर सुरू होतंच, पण अपुऱ्या पोषणामुळे आणि कोरड्या हवेमुळे केसांचं टेक्स्चरही बदलून जातं (Winter care tips for dry hair). केस खूपच डल, रुक्ष, कोरडे दिसू लागतात. त्याउलट काही जणींचे केस खूप चिकट होतात. त्यांच्यातली चमक, सिल्कीपणा निघून गेल्यासारखा वाटतो. केसांची अशी समस्या कमी करण्यासाठी घरच्याघरी फक्त ३ पदार्थ वापरून हेअर स्पा करून पाहा (Homemade hair spa cream in just 10 Rs). हे तीन पदार्थ आपल्या घरात अगदी सहज उपलब्ध होणारे असून त्यासाठी १० रुपयांपेक्षा अधिक खर्च लागणार नाही.(Home remedies for dry hair and dandruff)
केस सिल्की- चमकदार होण्यासाठी उपाय
हा उपाय इन्स्टाग्रामच्या anubeauty.tips या पेजवर शेअर करण्यात आला आहे.
हेअर स्पा क्रिम घरच्याघरी तयार करण्यासाठी आपल्याला कोरफडीचा गर, दही आणि खोबरेल तेल लागणार आहे.
लहानसहान गोष्टींचा खूप विचार करता? 'ओव्हरथिंकींग'चा त्रास होतो? मन शांत करण्यासाठी करा १ सोपा उपाय
एका वाटीमध्ये कोरफडीचा गर काढून घ्या. साधारणपणे अर्धी वाटी गर निघाला पाहिजे.
त्यामध्ये २ टीस्पून दही आणि १ टीस्पून खोबरेल तेल टाका.
कितीही घासलं तरी कढईचा तेलकटपणा- चिकटपणा जातच नाही? ३ उपाय, कढई होईल स्वच्छ- चकाचक
हे सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. ५ ते ७ मिनिटे मिश्रण व्यवस्थित हलविल्यानंतर त्याचे टेक्स्चर आणि रंग दोन्हीही थोडं बदलेलं.
यानंतर हे क्रिम केसांच्या लांबीवर लावा आणि पाऊण तासाने एखादा माईल्ड शाम्पू वापरून केस स्वच्छ धुवून टाका. आठवड्यातून एकदा हा उपाय करा. केसांना नैसर्गिकपणे खूप छान चमक येईल आणि ते सिल्की होतील.
केसांना कोरफड लावण्याचे फायदे
कोरफडीमध्ये असणारे काही घटक डोक्यातला त्वचेचा कोरडेपणा कमी करतात. यामुळे कोंड्याची समस्या कमी होते.
खत- पाणी वेळेवर देऊनही झाडं सुकत आहेत? ५ गोष्टी करून पाहा- सुकलेली रोपं पुन्हा नव्याने बहरतील
केसांची मुळं पक्की करण्यासाठी कोरफडीचा गर उपयुक्त ठरतो.
कोरफडीत असलेल्या नॅचरल मॉईश्चरायझिंग घटकांमुळे केसांचा कोरडेपणा कमी होऊन केस मऊ- चमकदार होण्यास मदत होते.