केस गळणं खूपच कॉमन झालं आहे. (Hair Fall Solution) केस गळणं कमी करण्यासाठी आणि केसांच्या चांगल्या वाढीसाठी बाजारात बरीच उत्पादनं उपलब्ध आहेत. पण वारंवार हजारो रुपये खर्च करूनही केसांची मनासारखी वाढ होत नाही. हेअर स्पा, केरेटिन यांसारख्या ट्रिटमेंट्स घेऊनही केस गळणं थांबत नाही. (Homemade hair spray for hair growth) काही घरगुती उपाय तुम्हाला या समस्येवर सोल्यूशन देऊ शकतात. (How to stop hair fall)
मेथीचे आरोग्याच्या दृष्टीनं अनेक फायदे आहेत. केसांसाठीही मेथी गुणकारी ठरते. मेथी आणि घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर करून तुम्ही मनासारखे केस मिळवू शकता. यामुळे केस धुताना आणि रोज केस विंचरताना केसांचं गळणं कमी होतं. (Fenugreek and aloe vera spray for hair)
- सगळ्यात आधी एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. त्यात १० ते १२ कढीपत्त्याची पानं आणि एलोवेरा, १ चमचा मेथी घाला. हे पाणी चांगलं उकळू द्या. उकळलेलं पाणी थंड झाल्यानंतर एका स्प्रे बॉटलमध्ये भरा. स्प्रे बॉटलनं आपल्या केसांवर फवारणी दिवसातून दोनवेळा फवारणी करा. यामुळे स्काल्प मजबूत होण्यास मदत होईल आणि केसाचं गळणंही थांबेल.
- कढीपत्ता हा प्रथिने आणि लोहाचा चांगला स्रोत आहे. हे दोन्ही पोषक घटक केसांसाठी आवश्यक आहेत. ते केस मुळांपासून मजबूत करतात आणि वाढण्यास मदत करतात. कढीपत्त्याच्या अर्कामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात, जे केसांसाठी फायदेशीर ठरू शकतात. त्याचे औषधी गुणधर्म तुमचे केस पांढरे होण्यापासून थांबवू शकतात. जेणेकरून केसांना नैसर्गिक रंग परत मिळू शकेल.
केस फारच लवकर पिकले? डायची गरजच नाही; हे जादूई तेल लावून झटपट मिळवा काळे केस
- मेथीमध्ये जीवनसत्त्वे आणि प्रथिने आढळतात, ज्यामुळे केस निरोगी तसेच लांब होण्यास मदत होते. याशिवाय मेथीच्या दाण्यामध्ये लोहाचे प्रमाण चांगले असते ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि केस आतून मजबूत होतात. तसेच कोंडा दूर होतो.
जेवताना दही खाताय? 3 पदार्थांसह चुकूनही करू नका दह्याचे सेवन, तब्येत कधीही बिघडेल
-केसांच्या चांगल्या वाढीसाठी कोरफडीचा थेट वापरही करता येतो. तुम्हाला फक्त कोरफडीचे ताजे पान घ्यायचे आहे आणि ते मधोमध कापायचे आहे. आता पानाचा आतील भाग म्हणजेच जेल तुमच्या केसांवर आणि टाळूवर लावावे लागेल.