Join us  

शॅम्पू बदलूनही केस गळणं थांबत नाही? 'हा' घरगुती स्प्रे वापरा, भराभर वाढतील केस

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2022 1:50 PM

Homemade Hair Spray For Hair Growth : हा स्प्रे तयार करण्यासाठी तुम्हाला जास्त काही करावं लागणार नाही. फक्त खोबरेल तेलात मेथीचे दाणे घालून गरम करावे लागतील.

हेअर फॉलची समस्या आजकाल खूपच कॉमन झालीये. (Hair Fall Control) शॅम्पू, तेल बदलूनही हवातसा बदल दिसत नाही. या सगळ्यात पैसे खूप वाया जातात आणि केसांवर केमिकल्स वापरल्यानं केसांची हानी होते. जर तुम्हीही केसांवर वेगवेगळे प्रयोग करून थकला असाल तर घरगुती उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. हा स्प्रे तयार करण्यासाठी तुम्हाला जास्त काही करावं लागणार नाही. फक्त खोबरेल तेलात मेथीचे दाणे घालून गरम करावे लागतील. (Homemade hair spray for hair growth hair care tips)

केसांच्या वाढीसाठी स्प्रे 

साहित्य- मेथी दाणे + खोबरेल तेल

१) मेथीचे दाणे पोषक तत्वांनी भरलेले असतात.

२)  केसांच्या वाढीस प्रोत्साहन मिळते.

३) नियमितपणे वापरल्यास केसांचा पोत देखील सुधारतो.

४) केस पांढरे कमी होण्याचं प्रमाण कमी होतं. 

टॅग्स :केसांची काळजीत्वचेची काळजीब्यूटी टिप्स