केसांचे आरोग्य आणि सौंदर्य चांगले राखण्यासाठी त्यांची काळजी घेणे आवश्यक असते. वेळोवेळी केसांना तेल लावून मसाज करणे, केस स्वच्छ धुणे तसेच त्यांना कंडिशनिंग करणे (Homemade Hibiscus Conditioner for soft hydrated hair) गरजेचे असते. काहीवेळा आपण केसांना तेल लावून ते स्वच्छ धुतो परंतु त्यांना कंडिशनिंग (How to make Hibiscus Conditioner for Hair Growth) करत नाही. जर केसांना कंडिशनिंग (Hibiscus For Hair Care) केले नाही तर केसांच्या अनेक समस्या त्रास देतात. केसांना कंडिशनिंग करताना आपण वेगवेगळ्या केमिकल्सयुक्त महागड्या कंडिशनरचा वापर करतो. परंतु केसांसाठी असे केमिकल्सयुक्त महागडे कंडिशनर वापरण्यापेक्षा काही नैसर्गिक पदार्थांचा वापर करुन देखील आपण घरच्या घरीच कंडिशनर तयार करु शकतो(How to make Homemade Hibiscus conditioner for massive hair growth).
केसांच्या वाढीसाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी जास्वंदाचे फुल सर्वोत्तम औषधी वनस्पतींपैकी एक मानले जाते. या सुंदर आणि तेजस्वी फुलामध्ये इतके गुणधर्म आहेत की तुमच्या केसांशी संबंधित सर्व समस्या दूर ठेवण्याची क्षमता या फुलात असते. आपण आपल्या हेअर केअर रुटीनमध्ये जास्वंदीच्या फुलांचा व पानांचा समावेश करून केसांची काळजी घेऊ शकता. आयुर्वेदात जास्वंदाचे फुल व पानं यांना फार महत्त्व आहे. तुम्ही यापासून घरच्या घरी अगदी सहज आयुर्वेदिक कंडिशनर तयार करू शकता. केसांच्या अनेक समस्या दूर करण्यास जास्वंदीच्या फुलाचे घरगुती कंडिशनर फायदेशीर ठरते. जास्वंदीच्या फुलाचे कंडिशनर घरच्या घरी कसे तयार करावे याची सोपी कृती पाहूयात.
साहित्य :-
१. जास्वंदीची फुले - १० ते १५ फुले२. अळशीच्या बिया - १ टेबलस्पून ३. पाणी - १ ग्लास (३५० मि. ली)४. पाण्यांत भिजवून घेतलेला डिंक - १ टेबलस्पून ५. रोज बायो एंजाईम्स - १ टेबलस्पून
केसांच्या अनेक समस्या सतावतात ? करुन पाहा आवळा - रिठा - शिकेकाईच्या पाण्याचा असरदार उपाय...
उन्हाळ्यांत तेलकट त्वचेसाठी फक्त चमचाभर चंदन पावडरची जादू, तेलकटपणा होईल मिनिटभरात गायब...
कृती :-
१. एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यात जास्वंदीची फुले सर्वात आधी स्वच्छ धुवून घ्यावीत. त्यानंतर फुलांचे देठ काढून घ्यावेत. २. त्यानंतर एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यात ही जास्वंदीची फुले आणि अळशी संपूर्ण रात्रभर भिजत ठेवावीत. ३. दुसऱ्या दिवशी जास्वंदीच्या फुलांचा रंग या पाण्याला येऊन पाण्याचा रंग लाल झाला असेल.
किचनमधील 'हे' ५ पदार्थ वापरुन घरीच करा पार्लरसारखे फेशियल, चेहऱ्यावर येईल अस्सल फेशियल ग्लो...
४. आता पाण्यात भिजवून घेतलेली जास्वंदीची फुले आणि भिजवलेला डिंक मिक्सरमधून बारीक पेस्ट होईपर्यंत एकत्रित वाटून घ्यावीत.५. आता एका मोठ्या भांड्यात जास्वंदीच्या फुलांची पेस्ट काढून घ्यावी त्यात जास्वंदीची फुल भिजत ठेवलेले पाणी देखील मिक्स करावे. ६. सगळ्यात शेवटी यात यात आपण प्रिझर्व्हेटिव्ह्ज व सुगंध येण्यासाठी १ टेबलस्पून रोज बायो एंजाईम्स देखील घालू शकता. ६. सगळ्यात शेवटी हे मिश्रण चमच्याने व्यवस्थित हलवून एका हवाबंद बाटलीत भरुन ठेवावे.
अशाप्रकारे आपण जास्वंदीच्या फुलांचा वापर करून घरच्याघरी झटपट नैसर्गिक कंडिशनर बनवू शकतो. काचेच्या बाटलीत हे कंडिशनर भरुन आपण १ महिन्यापर्यंत स्टोअर करुन ठेवू शकता. कोणत्याही प्रकारचा शाम्पू लावल्यानंतर आपण या घरगुती कंडिशनरचा वापर करु शकता.