उन्हाळ्यात चेहऱ्यावर काळपटपणा येणं खूपच कॉमन आहे पण एकदा चेहरा टॅन झाला की पुन्हा चेहऱ्यावर तेज येण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात. (Skin Care Tips) नेहमी नेहमी पार्लरला जाणं प्रत्येकालाच शक्य नसते असं नाही अशावेळी घरच्याघरी काही सोपे उपाय करून तुम्ही त्वचेची काळजी घेऊ शकतात. (Homemade korean Face Pack For Glowing Skin)
घरच्याघरी कोरियन फेस मास्क कसा तयार करायचा? (How To Make korean Face Pack)
एका भांड्यात ग्लासभर पाणी उकळण्यासाठी ठेवा. त्यात २ चमचे आळशीच्या बिया घाला, १ ते २ चमचा तांदूळाचे पीठ घाला हे पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घ्या ८ ते १० मिनिटं शिजवल्यानंतर गॅस बंद करा. हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्या. थंड झालेलं मिश्रण चमच्याच्या साहाय्याने पुन्हा एकजीव करून ब्रशच्या साहाय्याने किंवा हाताने संपूर्ण चेहऱ्याला लावा. ज्यामुळे चेहरा चमकेल आणि हरवलेलं सौंदर्य परत येण्यास मदत होईल.
त्वचेसाठी तांदूळाच्या पीठाचा वापर कसा करावा? (Rice For Face Flour)
काही सौंदर्यतज्ज्ञांचा असा विश्वास आहे की तांदूळाचे पीठ काही संयुगे फेरुलिक एसिड आणि पीएबीएमुळे सुर्यापासून संरक्षण करण्यास मदत करू शकते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार हे मिश्रण तांदूळाच्या पीठाचा वापर करून तुम्ही त्वचेचं सौंदर्य वाढवू शकता.
त्वचेवर ग्लो येण्यासाठी तांदूळाच्या पीठात गुलाबपाणी मिसळून याचा फेस पॅक तयार करा. त्यासाठी एका वाटीत २ चमचे तांदूळाचे पीठ घ्या. त्यात गुलाबपाणी घालून पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्याला लावा नंतर सुकण्यासाठी सोडून द्या. १० मिनिटांनंतर चेहरा साध्या पाण्याने धुवून घ्या. या फेस पॅकमुळे डाग, पिग्मेंटेशन, ब्लॅकहेड्सस दूर होण्यास मदत होईल.
त्वचेसाठी आळशी
चांगल्या त्वचेसाठी आळशी रात्रभर पाण्यात भिजवायला ठेवा. त्यानंतर सकाळी मुलतानी पाणी, गुलाब पाण्याबरोबर मिसळून एक फेस पॅक तयार करा. हा फेसपॅक चेहऱ्याला १५ मिनिटं लावून सोडून द्या. ग्लोईंग स्किनसाठी आठवड्याभरातून एकदा हा फेस मास्क नक्कीच चेहऱ्याला लावा.