Lokmat Sakhi >Beauty > २ रुपयांच्या लिंबाने करा घरगुती फेशियल, स्किन होईल क्लिअर, दिसाल फ्रेश - चेहरा करेल ग्लो

२ रुपयांच्या लिंबाने करा घरगुती फेशियल, स्किन होईल क्लिअर, दिसाल फ्रेश - चेहरा करेल ग्लो

Homemade Lemon Face Packs for Clear Skin चेहऱ्यावर नैसर्गिक चमक हवीय? २ रुपयांच्या लिंबाने करा फेशियल, दिसाल सुंदर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2023 08:53 PM2023-06-15T20:53:29+5:302023-06-15T20:56:44+5:30

Homemade Lemon Face Packs for Clear Skin चेहऱ्यावर नैसर्गिक चमक हवीय? २ रुपयांच्या लिंबाने करा फेशियल, दिसाल सुंदर..

Homemade Lemon Face Packs for Clear Skin | २ रुपयांच्या लिंबाने करा घरगुती फेशियल, स्किन होईल क्लिअर, दिसाल फ्रेश - चेहरा करेल ग्लो

२ रुपयांच्या लिंबाने करा घरगुती फेशियल, स्किन होईल क्लिअर, दिसाल फ्रेश - चेहरा करेल ग्लो

लिंबाचा वापर आपण अनेक गोष्टींमध्ये करतो. जेवणापासून ते ब्युटीपर्यंत लिंबाचे अनेक फायदे आहेत. चेहऱ्यावर लिंबाचा रस लावल्याने चेहऱ्याला नवी चमक मिळते. लिंबाच्या रसामध्ये अँटीफंगल गुणधर्म असतात. ज्यामुळे स्किन क्लिअर होते. काही महिला ब्युटी पार्लरमध्ये जाऊन पैसे खर्च करून चेहरा क्लिन करून घेतात, फेशियल करतात.

पण एवढे पैसे खर्च करण्यापेक्षा, लिंबाच्या वापराने स्किनच्या निगडीत समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी आढळते, जे चेहऱ्याची चमक वाढवते. लिंबाने आपण स्क्रबिंग करू शकता, घरच्या घरी मसाज करू शकता. एकंदरीत लिंबाच्या मदतीने फेशियल करू शकता(Homemade Lemon Face Packs for Clear Skin).

स्क्रबिंग

डागरहित चेहरा हवं असल्यास त्वचेवर लिंबाच्या मदतीने स्क्रबिंग करा. यामुळे चेहऱ्याची खोलवर सफाई होण्यास मदत होईल. यासाठी एका वाटीत लिंबाचा रस घ्या, त्यात एक चमचा मध आणि एक चमचा साखर मिसळून मिश्रण तयार करा, हे मिश्रण चेहऱ्याला लावा. 5 मिनिटे हलक्या हातांनी चेहरा स्क्रब करा, 10 मिनिटांनंतर चेहरा पाण्याने धुवा.

फक्त १ चमचाभर मेथी दाणे घ्या, जाड घट्ट लांब केसांसाठी ३ सोपे उपाय

मसाज

स्क्रबिंग केल्यानंतर चेहऱ्यावर मसाज करा. यासाठी एका वाटीत लिंबाचा रस, २ चमचे एलोवेरा जेल घेऊन पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून मसाज करा, यामुळे चेहऱ्यावरील रक्ताभिसरण सुधारेल, व चेहरा तुकतुकीत - हायड्रेट दिसेल.

केस किती दिवसांनी कापावे? खरेच कापले की केस वाढतात का? जावेद हबीब सांगतात...

फेस पॅक

स्क्रबिंग व मसाज केल्यानंतर शेवटी फेस पॅक लावा, यासाठी एका वाटीत लिंबाचा रस घ्या, त्यात बेसन, एलोवेरा जेल मिक्स करून पेस्ट तयार करा. हा फेस पॅक चेहऱ्यावर १५ मिनिटांसाठी लावून ठेवा, व हा पॅक सुकल्यानंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा.

Web Title: Homemade Lemon Face Packs for Clear Skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.