Lokmat Sakhi >Beauty > थंडीत त्वचेचा काळपटपणा घालवण्याचा १ सोपा उपाय; घरच्या घरी ५ मिनीटांत तयार करा मॉईश्चरायजर...

थंडीत त्वचेचा काळपटपणा घालवण्याचा १ सोपा उपाय; घरच्या घरी ५ मिनीटांत तयार करा मॉईश्चरायजर...

Homemade Moisturizer for Winter Season : या उपायामुळे त्वचेचा कोरडेपणा दूर होऊन त्वचेला एकप्रकारचा ग्लो येण्यासही चांगली मदत होईल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2022 10:13 AM2022-11-09T10:13:57+5:302022-11-09T10:34:36+5:30

Homemade Moisturizer for Winter Season : या उपायामुळे त्वचेचा कोरडेपणा दूर होऊन त्वचेला एकप्रकारचा ग्लो येण्यासही चांगली मदत होईल.

Homemade Moisturizer for Winter Season : 1 simple solution to get rid of dark skin in winter; Make Moisturizer at Home in 5 Minutes... | थंडीत त्वचेचा काळपटपणा घालवण्याचा १ सोपा उपाय; घरच्या घरी ५ मिनीटांत तयार करा मॉईश्चरायजर...

थंडीत त्वचेचा काळपटपणा घालवण्याचा १ सोपा उपाय; घरच्या घरी ५ मिनीटांत तयार करा मॉईश्चरायजर...

Highlightsतुम्हाला हे मिश्रण सूट झाले तर सुरुवातीला एक दिवसाआड आणि नंतर दररोज तुम्ही याचा वापर करु शकता. रात्री झोपताना हे मिश्रण हातांना आणि पायांना लावायचे आणि सकाळी आंघोळीच्या वेळी धुवून टाकायचे.

थंडीच्या दिवसांत सगळ्यात जास्त समस्या उद्भवतात त्या त्वचेच्या बाबतीत. हवेतील तापमान कमी झाल्याने आणि कोरडेपणा वाढल्याने शरीरात एकप्रकारची शुष्कता येते. याचा सर्वात जास्त परिणाम आपल्या त्वचेवर आणि केसांवर होतो. या काळात केस आणि त्वचा इतकी जास्त कोरडी होते की अनेकदा त्वचेची सालपटे निघतात आणि केसही अतिशय निर्जीव दिसायला लागतात. या सगळ्यामुळे थंडीच्या दिवसांत त्वचा काळपट दिसायला लागते. आता त्वचा अशाप्रकारे काळी पडली तर नेमकं काय करायचं असा प्रश्न आपल्याला पडतो. पण त्याचे उत्तर आपल्याला मिळतेच असे नाही. अशावेळी बाजारात मिळणारी वेगवेगळी प्रॉडक्ट वापरण्यापेक्षा घरच्या घरी काही सोपे उपाय केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. या उपायामुळे त्वचेचा कोरडेपणा दूर होऊन त्वचेला एकप्रकारचा ग्लो येण्यासही चांगली मदत होईल. पाहूया घरच्या घरी मॉईश्चरायजर कसे तयार करायचे (Homemade Moisturizer for Winter Season) ? 

(Image : Google)
(Image : Google)

मॉईश्चरायजर कसे तयार करायचे? 

१. एका बाऊलमध्ये २ चमचे ग्लिसरीन घेऊन त्यामध्ये २ चमचे गुलाबपाणी एकत्र करायचे. या दोन्ही गोष्टींचे प्रमाण सारखेच असायला हवे.

२. यामध्ये २ चमचे लिंबाचा रस घालून हे मिश्रण एकत्र करायचे. 

३. तयार झालेले हे मिश्रण चेहऱ्यावर न वापरता हात किंवा पायांवर हे मिश्रण लावायचे. 

४. यामध्ये लिंबू असल्याने चेहऱ्यासाठी हे मिश्रण त्रासदायक ठरण्याची शक्यता असते त्यामुळे चेहऱ्यावर हे मिश्रण वापरु नये. 

५. हा प्रयोग करताना सुरुवातीला पॅच टेस्ट केलेली केव्हाही चांगली. त्यामुळे तुम्हाला यामध्ये वापरलेले घटक कितपत उपयुक्त ठरतात याचा अंदाज येईल.

६. तुम्हाला हे मिश्रण सूट झाले तर सुरुवातीला एक दिवसाआड आणि नंतर दररोज तुम्ही याचा वापर करु शकता. 

७. रात्री झोपताना हे मिश्रण हातांना आणि पायांना लावायचे आणि सकाळी आंघोळीच्या वेळी धुवून टाकायचे. यामुळे त्वचा नक्कीच ग्लोईंग आणि तजेलदार दिसण्यास मदत होईल. 


 

Web Title: Homemade Moisturizer for Winter Season : 1 simple solution to get rid of dark skin in winter; Make Moisturizer at Home in 5 Minutes...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.