केस गळणं (Hair Fall) केसांना फाटे फुटणं या समस्या प्रत्येक मुलीला उद्भवतात. केस दाट काळे बनवण्यासाठी कोणता शॅम्पू वापरायचा असा प्रश्न अनेकांना पडतो. (Hair Care Tips) वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पू, तेल लावूनही केसांमध्ये बदल दिसत नाही. केसांच्या चांगल्या वाढीसाठी तुम्ही घरच्याघरी मल्टीव्हिटामीन्सचा समावेश करू शकता. मल्टीव्हिटामीन्सच्या सेवनाने शरीर निरोगी राहण्यास मदत होते. (How to Stop Hair Fall) घराच्याघरी मल्टीव्हिटामीन पावडर बनवणं खूपच सोपं आहे. यासाठी तुम्हाला काही बेसिक टिप्स फॉलो करू शकता. (Homemade Multivitamin Powder For Hair Growth)
रिसर्चनुसार भोपळ्याच्या बिया केसांचे टक्कल दूर करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. भोपळ्याच्या बियांच्या तेलात सॅच्युरेडेट आणि अन्सॅच्युरेडेट फॅटी एसिड्स असतात. भोपळ्याच्या बियांच्या तेलाने केसांची वाढ चांगली होते. ज्यामुळे केसांचे कोणतेही नुकसान होत नाही (Ref). केस मजबूत आणि दाट राहतात. जर तुम्हाला या बिया अशाच खायला आवडत नसतील तर तुम्ही याची पावडर बनवून दूधाबरोबर खाऊ शकता. हे एक प्रकारचे प्रोटीन आहे ज्यामुळे केसांची चांगली वाढ होते. (How to Make Natural Hair Growth Powder At Home)
मल्टी-व्हिटामीन करण्यासाठी लागणारं साहित्य
१) अळशीच्या बीया - २ टेबलस्पून
२) चिया सिड्स - २ टेबलस्पून
३) चिया सिड्स- २ टेबलस्पून
४) भोपळ्याच्या बिया- २ टेबलस्पून
५) सुर्यफुलाच्या बिया - २ टेबलस्पून
६) तीळ - २ टेबलस्पून
मल्टी व्हिटामीन पावडर बनवण्याची कृती (How to Make Homemade Multivitamin)
१) कढई गरम करून त्यात अळशीच्या बीया, भोपळ्याच्या बीया, तिळाच्या बीया, चिया सिड्स, सनफ्लॉवर, तिळाचे सिड्स, सुर्यफुलाच्या बीया भाजून घ्या. भाजलेल्या बीया मिक्सरच्या भांड्यात घालून दळून घ्या. दळून बाहेर काढल्यानंतर हे मिश्रण एका हवाबंद डब्ब्यात घालून ठेवा.
पोट-कंबर-मांड्या सुटल्यात, कपडे घट्ट होतात? पाण्यात हे ४ पदार्थ मिसळून प्या; भराभर वितळेल चरबी
२) महिनाभर हे मिश्रण तुम्ही साठवून ठेवू शकता. रोज रात्री किंवा सकाळी एक ग्लास कोमट दूधात १ चमचा ही पावडर मिसळून प्या. यामुळे केसांच्या वाढीत फरक दिसून येईल आणि केस आधीपेक्षा जास्त मजबूत होतील.
३) या होममेड मल्टिव्हिटामीनमध्ये फॅटी एसिड्स, व्हिटामीन्स, मिनरल्स असतात ज्यामुळे हेअर ग्रोथ चांगली होते आणि तब्येतही चांगली राहते. आळशीच्या बीयांमध्ये एंटी ऑक्सिडेंट्स असतात ज्यामुळे स्किन चांगली राहण्यासही मदत होते.