Join us  

केस गळून टक्कल पडले? ताकाचा करा सोपा उपाय; केसांची व्हॉल्युम वाढेल - दिसतील दाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2024 7:57 PM

Homemade Natural ButterMilk for Soft and Shiny Hairs : ॲसिडिटीमुळे केस गळत असतील तर, ताकाचा स्वस्तात मस्त घरगुती उपाय करा

आपण केसांची निगा कशा पद्धतीने राखतो, त्यावर केसांचे सौंदर्य अवलंबून असते (Hair Care Tips). मात्र, बिघडलेल्या जीवनशैलीमुळे केसात कोंडा, केस गळणे, केस पातळ होणे यासह इतर समस्या निर्माण होतात (Buttermilk for Hairs). यावर उपाय म्हणून आपण ब्यूटी उत्पादनांचा वापर करून पाहतो. पण यामुळेही केस अधिक प्रमाणात गळतात.

केस गळण्यामागे अनेक कारणे असू शकतात. त्यापैकी एक कारण म्हणजे ॲसिडिटी. होय, ॲसिडिटीमुळे (Acidity) केस गळण्याचे प्रमाण वाढते असे आयुर्वेदात सांगितले आहे. जर केसांची व्हॉल्युम कमी झाली असेल तर, ताकाचा वापर करून पाहा. ताकामुळे केस गळती होणार नाही. केस दाट आणि सुंदर दिसतील(Homemade Natural ButterMilk for Soft and Shiny Hairs).

पित्तामुळे केस गळतात का?

पित्तामुळे आपल्याला शारीरिक त्रास होतोच. ॲसिडिटी होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. पित्त हे उष्ण गुणाचे असते, त्यात त्याला येणारी आम्लता. वेळेवर न जेवणे, जास्त प्रमाणात जेवणे, तिखट आंबट पदार्थ खाणे, रात्री वेळेवर न झोपणे यासह इत्यादी कारणांमुळे उद्भवतात.

१ चमचा तुपात कालवून खा ३ गोष्टी; दृष्टी होईल तेज - डोळ्यांचे विकार राहतील दूर

ज्यामुळे अन्नपचनानंतर पित्त संपूर्ण शरीरात पसरायला लागते, आणि त्वचेमधे उष्णता वाढवायला लागते. त्वचेमधे जेवढी उष्णता अधिक तेवढे केसांच्या मुळांशी केसाला धरुण ठेवणारे वॅक्स सैल पडू लागते आणि याचा परीणाम केसांच्या आरोग्यावर होतो आणि ते गळायला लागतात. पित्तामुळे केस गळती होऊ नये म्हणून आपण ताकाचा वापर करू शकता.

रासायनिक खत कशाला? नारळाच्या शेंड्यांचा करा 'असा' वापर; कुंडीतली रोपं वाढतील जोमाने

केसांसाठी ताकाचा वापर

ॲसिडिटीमुळे केस गळत असतील तर, ताकाचा वापर करा. एका भांड्यात ताक घ्या, त्यात ग्रीन टी घालून गरम करण्यासाठी ठेवा. उकळी फुटल्यानंतर थंड करण्यासाठी ठेवा, व ताकाने केस धुवून घ्या. आपण याचा वापर आठवड्यातून २ वेळा करू शकता. यामुळे केस गळती होणार नाही. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी