सध्या प्रत्येक तरूणीला पिंपल्समुळे डाग येणं, खाज येणं, चेहऱ्याचा काळपटपणा अशा समस्या उद्भवतात. पार्लर ट्रिटमेंट्समध्ये हजारो रुपये खर्च करूनही हवा तसा ग्लो येत नाही. हार्मोनल बदल, प्रदुषण, खाण्यापिण्यातील अनियमिता, पाण्याची कमतरता, त्वचेवर अतिरिक्त तेल जमा होणं यामुळे त्वचेवर पुळ्या येतात. चांगल्या त्वचेसाठी एक स्किन केअर रुटीन फॉलो करणं गरजेचं असतं. (Homemade night cream for clear skin)
त्वचा चांगली राहण्यासाठी स्किन केअर रुटीन फॉलो करावं लागतं. रात्री झोपताना चेहऱ्यावर नाईट क्रिम लावण्याचा सल्ला दिला जातो. रात्री चेहऱ्याला ही क्रिम लावण्याचे अनेक फायदे आहेत. नाईट क्रिम घरच्याघरी कशी तयार करायची ते पाहूया. (Skin Care Tips)
घरच्या घरी नाईट क्रिम बनवण्याचं साहित्य
एलोवेरा जेल -१ टिस्पून
गुलाब पाणी - २ टिस्पून
टी ट्री ऑईल - २ ते ३ ड्रॉप्स
ऑलिव्ह ऑईल - २ थेंब
हळद- १ टिस्पून
सगळ्यात आधी एक डबीत एलोवेरा जेल आणि गुलाबपाणी घाला. त्यात ऑलिव्ह ऑईल, आणि व्हिटामीन ई ची कॅप्सूल, हळद घाला. हे मिश्रण एकत्र करून एका डब्ब्यात भरा. रात्री झोपण्यापूर्वी ही क्रिम चेहऱ्याला लावा आणि सकाळी चेहरा स्वच्छ पाण्यानं धुवा. यामुळे चेहरा ग्लोईंग दिसेल.
नाईट क्रिम लावण्याचे फायदे
१) नाईट क्रिमच्या वापरानं त्वचा मऊ मुलायम राहते
२) नाईट क्रिम त्वचेला हायड्रेट ठेवते
३) त्वचेच्या फाईन लाईन्स कमी होतात.
४) त्वचा कोरडी पडत नाही.
५) फाईन लाईन्स कमी होतात.