Lokmat Sakhi >Beauty > विकतच्या महागड्या क्रिम्स कशाला? रात्री झोपताना लावा होम मेड क्रिम, सकाळी चेहरा करेल ग्लो...

विकतच्या महागड्या क्रिम्स कशाला? रात्री झोपताना लावा होम मेड क्रिम, सकाळी चेहरा करेल ग्लो...

Homemade Night Cream for natural Glow : पार्लरमधील महागड्या ट्रिटमेंट किंवा केमिकल्स असलेली सौंदर्यप्रसाधनं वापरण्यापेक्षा नैसर्गिक उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2023 12:33 PM2023-06-22T12:33:11+5:302023-06-22T12:34:38+5:30

Homemade Night Cream for natural Glow : पार्लरमधील महागड्या ट्रिटमेंट किंवा केमिकल्स असलेली सौंदर्यप्रसाधनं वापरण्यापेक्षा नैसर्गिक उपाय...

Homemade Night Cream for natural Glow : Apply home made natural cream at night without fail, it will make your face glow in the morning... | विकतच्या महागड्या क्रिम्स कशाला? रात्री झोपताना लावा होम मेड क्रिम, सकाळी चेहरा करेल ग्लो...

विकतच्या महागड्या क्रिम्स कशाला? रात्री झोपताना लावा होम मेड क्रिम, सकाळी चेहरा करेल ग्लो...

आपला चेहरा कायम ग्लोईंग आणि चांगला दिसावा यासाठी आपण नेहमीच काही ना काही उपाय करत असतो. कधी आपण बाजारात मिळणारी विविध सौंदर्यप्रसाधनं वापरतो तर कधी पार्लरमधल्या महागड्या ट्रिटमेंटस घेतो आणि चेहरा चांगला राहील यासाठी प्रयत्न करतो. पण तरीही कधी चेहऱ्यावर पिंपल्स येतात, कधी डाग पडतात तर कधी त्वचा खूप कोरडी पडते. काही वेळा चेहऱ्याला इतक्या सुरकुत्या येतात की लहान वयातच आपण वयस्कर दिसायला लागतो. मात्र या सगळ्या समस्या दूर होण्यासाठी त्यावर ठोस उपाय करणे गरजेचे असते. पार्लरमधील आणि सौंदर्यप्रसाधनं वापरुन केलेले उपाय हे तात्पुरते असतात तसेच त्यामध्ये वारपण्यात येणाऱ्या केमिकल्सचा चेहऱ्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो (Homemade Night Cream for natural Glow) . 

यापेक्षा घरच्या घरी काही नैसर्गिक उपाय केल्यास त्याचा निश्चितच चांगला फायदा होऊ शकतो. आपण स्कीन केअर रुटीनमध्ये सकाळी उठल्यापासून काही ना काही आवर्जून करत असतो. रात्री झोपतानाही आपण नाईट क्रिम किंवा मॉईश्चरायजर लावतो. यामुळे त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते आणि त्वचा छान ग्लोईंग दिसते. हे जरी खरे असले तरी सकाळी उठल्यावर चेहऱ्यावर चांगला ग्लो हवा असेल तर रात्री झोपताना १ सोपा उपाय केल्यास त्याचाही चेहऱ्याचा ग्लो वाढण्यासाठी अतिशय चांगला फायदा होतो. पाहूयात हा उपाय कोणता आणि तो कसा करायचा.  

कशी करायची क्रिम तयार? 

१. एक मध्यम आकाराचा बटाटा घेऊन तो एका बाऊलमध्ये किसून घ्यायचा. तो चांगला दाबून त्याचा रस काढायचा. 

(Image : Google)
(Image : Google)

२. दुसऱ्या बाऊलमध्ये १ चमचा कोरफडीची जेल किंवा गर घ्यायचा.

३. त्यामध्ये व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि बदाम तेल घालायचे. 

४. हे सगळे मिश्रण चांगले एकजीव करुन घ्यायचे आणि त्याच थो़डा थोडा बटाट्याचा रस घालून याची छान एकजीव पेस्ट बनवायची. 

५. एका लहानशा बाटलीत ही पेस्ट आपण साठवून ठेवू शकतो. 

६. रोज रात्री न चुकता या पेस्टचा जाडसर थर चेहऱ्यावर लावायचा आणि सकाळपर्यंत तसाच ठेवायचा. 

७. सकाळी उठल्यावर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवायचा.

फायदे 

१. चेहऱ्यावरचे डाग आणि काळे स्पॉट निघून जाण्यास याची चांगली मदत होते.

२. चेहरा हायड्रेट राहील्याने छान ग्लोईंग दिसतो. 

३. सगळे घटक नैसर्गिक असल्याने कोणताही साईड इफेक्ट होण्याची शक्यता नाही.

४. त्वचा काही प्रमाणात टाईट होण्यासही याचा चांगला उपयोग होतो. 

Web Title: Homemade Night Cream for natural Glow : Apply home made natural cream at night without fail, it will make your face glow in the morning...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.