Join us  

केस गळतीमुळे कपाळ सपाट दिसतंय? फक्त २ दिवस हे तेल लावा; उगवतील नवे-दाट केस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 8:37 AM

Homemade oil for hair growth and methi seeds for hair growth : नेमकं कोणता प्रोडक्ट वापरल्यानं केसांच गळणं थांबेल याची कल्पना नसते. त्यामुळे पैसे घालवून वेगवेगळ्या गोष्टी केसांवर ट्राय केल्या जातात.

सध्याच्या लाईफस्टाईलमध्ये खाणं पिणं आणि वाढतं प्रदूषण याचा परीणाम केस आणि त्वचेवर झालेला पाहायला मिळत आहे. केस गळणं, केस वेळेआधीच पांढरे होणं या समस्या तरूण वयातील लोकांना जास्त उद्भवतात. आपले केस, दाट सुंदर असावेत असं प्रत्येकालाच वाटतं. केस गळणं रोखण्यासाठी ब्युटी स्टोअरमध्ये १० ते २० प्रकारची तेलं किंवा शॅम्पू तुम्हाला दिसून येतील. (Homemade oil for hair growth and methi seeds for hair growth)

नेमकं कोणता प्रोडक्ट वापरल्यानं केसांच गळणं थांबेल याची कल्पना नसते. त्यामुळे पैसे घालवून वेगवेगळ्या गोष्टी केसांवर ट्राय केल्या जातात. प्रत्येकवेळी त्याचा इफेक्ट होतोच असं नाही. काहीवेळा तात्पुरती केसांची ग्रोथ होते तर कधी अजिबात होत नाही. तुम्ही आहारात बदल केला तर केसांची चांगली वाढ होऊ शकते.(Foods for stop hair fall)

केसांना लांब, दाट बनवण्यासाठी आहारात या पदार्थांचा समावेश करा

१) पालकातील मिनरल्स, व्हिटामीन्स आणि आयर्न केसांसाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. याचे सेवन केल्या केसांची चांगली वाढ होते. भाजी, सूप किंवा सॅलेडच्या स्वरूपात तुम्ही पालकाचा समावेश करू शकता.

२) पनीरमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स असतात. जे केसांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरतात. पनीर खाल्ल्यानं केस मुळापासून मजबूत होतात.

३) केस चांगले राहण्यासाठी स्काल्पवर रक्ताभिसरण योग्य पद्धतीनं होणं गरजेचं असतं  जर शरीरात योग्य प्रमाणात रक्त नसेल तर पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे केस तुटून पडतात. म्हणून बीट, गाजर, खजूर, शेंगदाणे, गूळ अशा रक्त वाढवणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करा. 

केसांच्या वाढीसाठी  घरगुती तेल कसे बनवावे

एलोवेरा जेल आणि मेथीचे दाणे हे तेल बनवण्यासाठी लागतील. हे हेअर ऑईल बनवण्यासाठी एका पॅनमध्ये आपल्या केसांच्या लांबीनुसार पाणी आणि मेथीचे दाणे घालून ५ ते १० मिनिटांसाठी उकळून  घ्या. पाणी थंड झाल्यानंतर गाळून बाऊल ठेवा. यात एलोवेरा जेल घालून व्यवस्थित मिसळा.

जर तुम्हाला कोरड्या स्कॅल्पची समस्या असेल तर त्यात व्हिटॅमिन ई कॅप्सूल घाला. आता हे तेल तुमच्या टाळूपासून केसांच्या लांबीला लावा आणि चांगली मसाज करा. नंतर माईल्ड शॅम्पूने केस स्वच्छ धुवा. हे तेल आठवड्यातून २ वेळा केसांना लावल्यानंतर फरक दिसून येईल.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी