Lokmat Sakhi >Beauty > हिवाळ्यात केस फार गळताहेत? घरीच 'हे' जादूई तेल बनवून लावा, भराभर केस वाढतील होतील दाट

हिवाळ्यात केस फार गळताहेत? घरीच 'हे' जादूई तेल बनवून लावा, भराभर केस वाढतील होतील दाट

Homemade oil for hair growth : घरगुती उपाय करण्यासाठी फारसा खर्च येत नाही त्यामुळे ते ट्राय करण्यासाठी तुम्हाल फक्त थोडासा वेळ काढावा लागेल. (Homemade oil for hair growth)

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 12:02 PM2022-12-30T12:02:19+5:302022-12-30T12:11:49+5:30

Homemade oil for hair growth : घरगुती उपाय करण्यासाठी फारसा खर्च येत नाही त्यामुळे ते ट्राय करण्यासाठी तुम्हाल फक्त थोडासा वेळ काढावा लागेल. (Homemade oil for hair growth)

Homemade Oil for Hair Growth : Here are some DIY Hair Growth recipes | हिवाळ्यात केस फार गळताहेत? घरीच 'हे' जादूई तेल बनवून लावा, भराभर केस वाढतील होतील दाट

हिवाळ्यात केस फार गळताहेत? घरीच 'हे' जादूई तेल बनवून लावा, भराभर केस वाढतील होतील दाट

थंडीत केस बरेच कोरडे पडतात लांब केसांचा गुंता होतो आणि मोठ्या प्रमाणात गळतात. केस गळणं वाढलं की अनेकजण शॅम्पू, तेल बदलण्याचा प्रयत्न करतात पण असं करूनही हवा तसा बदल दिसत नाही. (Simple Way to get black Hair Naturally) पार्लरमध्ये स्पा ट्रिटमेंट घेतल्यानंतर जवळपास १ आठवडा केसांचा पोत  सुधारल्यासारखा वाटतो पुन्हा नंतर केस तसेच दिसायला लागतात. (Hair Care Tips)

डोक्यावरचे केस कमी व्हायला लागल्यानंतर आत्मविश्वास कमी झाल्यासारखा वाटतो. पण काही घरगुती उपाय तुम्हाला यातून सुटका मिळवून देऊ शकतात.  घरगुती उपाय करण्यासाठी फारसा खर्च येत नाही त्यामुळे ते ट्राय करण्यासाठी तुम्हाल फक्त थोडासा वेळ काढावा लागेल. (Homemade oil for hair growth)

हे तेल बनवण्यासाठी लागणारं साहित्य (How to make Homemade oil For Hair Growth)

नारळाचं तेल - १ कप

एलोवेरा जेल- २ चमचे

कढीपत्त्याची पानं- १० ते १२

काळ्या बीया (कलौंजी) - १ टिस्पून

मेथी - १ टिस्पून


 
१) हे तेल तयार करण्यासाठी सगळ्यात आधी १ कप नारळाचं तेल गॅसवर गरम करत ठेवा त्यात एलोवेराचे काप  घाला. काळ्या बीया (कलौंजी) आणि मेथीचे दाणे  त्यात घाला. ते तेल सर्व साहित्य घातल्यानंतर गॅसवर जवळपास १० मिनिटं शिजू द्या. त्यानंतर गॅस बंद करा. हे तेल थंड झाल्यानंतर गाळून एका काचेच्या भांड्यात भरून घ्या. 

२) या तेलानं मसाज करून १ ते २ तास तसंच  ठेवा. त्यानंतर नेहमी केस धुतो त्याप्रमाणे शॅम्पू किंवा कंडीशनरचा वापर करून केस  व्यवस्थित धुवून घ्या आणि सुकवा. यामुळे हेअर ग्रोथ वेगानं होईल आणि केस कायम काळेभोर सुंदर दिसतील.

Web Title: Homemade Oil for Hair Growth : Here are some DIY Hair Growth recipes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.