केस वाढवण्यासाठी बाजारात अनेक उत्पादनं उपलब्ध असली तरी अशा उत्पादनांचा केसांना पुरेपूर फायदा होतो जे केसांना आतून पोषण देतात. बाजारात उपलब्ध असलेल्या तेलांमध्ये सुंगधित द्रव्य आणि रसायनं वापरली जातात. ज्यामुळे त्याची गुणवत्ता कमी होते. (How to stop hair fall) केसांच्या चांगल्या वाढीसाठी कोणत्या तेलाचा वापर करणं अधिक फायदेशीर ठरतं ते पाहूया.(Hair Growth Tips) ज्याप्रमाणे घरी बनवलेले अन्नपदार्थ तब्येतीसाठी पौष्टीक तितकेच चविष्ट असतात. (How to make hibiscus hair oil at home)
त्याप्रमाणे घरी तयार केलेल्या सौदर्य उत्पादनांचा वापर केल्यास केसांची आणि त्वचेची निगा चांगल्याप्रकार राखता येते. स्वयंपाकघरात उपलब्ध असलेले ५ पदार्थ वापरून तुम्ही हेअर ग्रोथ तेल बनवू शकता. या तेलामुळे केस जलद गतीनं वाढण्यास मदत होईल. (Long Hairs Tips) या व्हिडिओमध्ये तेल आणि जास्वंदाच्या फुलांचा वापर करून तेल बनवलं गेलं आहे.
केसांची दुप्पट वाढ होण्यासाठी आणि केस गळती थांबवण्यासाठी हे तेल उपयुक्त ठरतं. हे घरगुती तेल बनवण्यासाठी सगळ्यात आधी कढईत तेल गरम करायला ठेवा. त्यानंतर त्यात नारळाचं तेल घाला. नारळाचं तेल गरम झाल्यानंतर त्यात अर्धे चिरलेले कांदे घाला. मंद आचेवर शिजवल्यानंतर २ चमचे भरून मेथीचे दाणे या तेलात घाला. सगळ्यात शेवटी यात कढीपत्ते घाला आणि त्यानंतर ७ ते ८ जास्वंदाची फूल घाला. हे तेल व्यवस्थित शिजल्यानंतर एका बरणीत भरून ठेवून द्या. आठवड्यातून २ वेळा हे तेल लावल्यानंतर चांगला परीणाम दिसून येईल.
जास्वंद केसांना लावण्याचे फायदे
जास्वंदाच्या पानांमध्ये मॉईश्चरायजिंग गुण असतात. ज्यामुळे केस हायड्रेट राहतात. कोरडे केस, केसांना फाटे फुटणं यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो. जास्वंदाच्या फुलाचा वापर तुम्ही हेअर कलरच्या स्वरूपातही करू शकता. याच्या वापरानं केसांवर तुम्हाला वेगळीच चमक दिसून येईल. केस सॉफ्ट आणि शायनी होतील.
जास्वंदाच्या फुलांच्या वापरानं कोंड्यापासून आराम मिळतो. यामुळे स्काल्पची स्थिती सुधारण्यास मदत होते. स्काल्पमध्ये खाज, कोंड्याची समस्या दूर करण्याासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. मेथी आणि जास्वंदात एंटी डॅड्रफ गुण असतात. याची पेस्ट स्काल्पला लावल्यानं कोंडयाची समस्या दूर होते.