Join us  

केस विंचरताना खूप तुटतात? आवळ्यापासून बनलेलं 'हे' घरगुती तेल वापरा; भराभर वाढतील केस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 12:01 PM

Homemade Oil For Hair Growth : तेल कोमट झाल्यानंतर त्यात आवळ्याची पेस्ट, कढीपत्ता, कलौंजी घालून तेल गरम करून घ्या. तेल गरम झाल्यानंतर एका भांड्यात गाळून घ्या.

जसजसं वय वाढत जातं तसतसं केसांच्या वाढीवरही त्याचा परिणाम होतो.  केस गळणं कमी करण्यासाठी बरेच महागडे शॅम्पू क्रिम्स उपलब्ध आहेत. पण नक्की कोणत्या उत्पादनाची निवड करावी याबद्दल संभ्रम असतो. (Hair Care Tips) केस धुतल्यानंतर कंडीशनर वापरताना किंवा विंचरताना गळून हातात येतात अशी बऱ्याच महिलांची तक्रार असते. केसांचं गळणं कमी करण्यासाठी घरच्याघरी तेल कसं तयार करायचं ते पाहूया. यामुळे पार्लरचा खर्च न करताच तुम्हाला लांबसडक, दाट केस मिळू शकतात. (How to make hair oil for Growth)

साहित्य

आवळा- ४ ते ५ नारळाचं तेल - १ ते २ कपराईचं तेल  अर्धा कपकलौंजी सीड्स - १ चमचाकढीपत्त्याची पानं - १२  ते १५

सगळ्यात आधी आवळ्याचे लहान तुकडे करून घ्या आणि ते मिक्सरमध्ये वाटून घ्या.  नंतर कढईत नारळाचं तेल आणि राईचं तेल घालून गरम करून घ्या. तेल कोमट झाल्यानंतर त्यात आवळ्याची पेस्ट, कढीपत्ता, कलौंजी घालून तेल गरम करून घ्या. ते गरम झाल्यानंतर एका भांड्यात  गाळून घ्या. 

या तेलाचे फायदे

१)  केसांच्या वाढीस चालना मिळते.

२) अकाली केस पांढरे  होण्यापासून रोखता येतं

३) केस गळणं कमी होतं. 

४) स्काल्प इन्फेक्शनपासून बचाव होतो. 

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स