पंचविशीच्या आसपास त्वचेवर फाईन लाईन्स यायला सुरुवात होऊन जाते. खासरून डोळ्यांच्या आसपासच्या त्वचेवर त्या सगळ्यात पहिल्यांदा जाणवू लागतात. पण सुरुवातीपासूनच किंवा पंचविशी येण्याच्या आधीपासूनच जर त्वचेची चांगली काळजी घेतली, तर मात्र कमी वयातच चेहऱ्यावर बारीकशा सुरकुत्या दिसणे बंद होते. त्वचा अधिकाधिक काळ तरुण राहते. आता आपण असंच एक खास तेल पाहणार आहोत, जे तुमच्या त्वचेला नेहमीच तरुण ठेवेल (Homemade oil for wrinkle free skin). शिवाय या उपायामुळे त्वचेवरचा ग्लो तर वाढत जाईलच (oil for flawless glowing skin). पण पिंपल्स, ॲक्ने, पिगमेंटेशन असा त्रास असेल तर तो ही कमी होईल. (home remedies for removing pimples, acne and pigmentation)
त्वचेवर सुरकुत्या येऊ नये म्हणून उपाय
त्वचेवर सुरकुत्या येऊ नयेत, तसेच त्वचेचे छान पोषण होऊन पिंपल्स, ॲक्ने, पिगमेंटेशन असा त्रास कमी व्हावा आणि त्वचेवर तेज यावे, यासाठी कशा पद्धतीने तेल तयार करायचं याची माहिती kahaniwalishivani या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.
लहान मुलांमधील लठ्ठपणा वाढविणारे ३ पदार्थ; बघून घ्या तुमची मुलंही 'हे' पदार्थ खातात का....
हा उपाय करण्यासाठी आपल्याला ३० ग्रॅम ओली हळद, पावशेर बदाम तेल आणि १ टीस्पून केशर हे ३ पदार्थ लागणार आहेत.
सगळ्यात आधी ओली हळद किसून घ्या. एका एअरटाईट बाटलीमध्ये बदाम तेल, किसलेली हळद आणि केशर टाका. आणि डबल बॉयलिंग पद्धतीने तेल गरम करून घ्या. साधारणपणे २ तास तरी तशा पद्धतीने तेल गरम करावं. त्यानंतर तेल थंड झालं की मग गाळून घ्यावं.
दुसरी पद्धत म्हणजे जर तेल गरम करायचं नसेल तर तेलाची बाटली २ ते ३ दिवसांसाठी तुमच्या घरात अशा ठिकाणी ठेवा, जिथे सुर्यप्रकाश येणार नाही. त्यानंतर मग बाटलीमधलं तेल गाळून घ्या.
ड्रेसच्या रंगानुसार लिपस्टिकची शेड कशी ठरवायची? बघा खास टिप्स, दिसाल आणखी स्मार्ट- आकर्षक
रोज रात्री झोपण्यापुर्वी या तेलाने चेहऱ्याला मसाज करा. साधारणपणे ३ ते ४ थेंब एवढं तेल पुरेसं आहे. तेल लावण्यापुर्वी पॅच टेस्ट जरुर घ्या. तसेच ज्यांची त्वचा सेन्सिटिव्ह आहे त्यांनी मॉईश्चरायझरमध्ये या तेलाचे थेंब टाकावे आणि मग ते चेहऱ्याला लावावे.