Lokmat Sakhi >Beauty > पपई खाता आणि बिया फेकून देता? पपईच्या बिया म्हणजे नितळ चेहऱ्याचे वरदान, पाहा फेसपॅकची सोपी कृती

पपई खाता आणि बिया फेकून देता? पपईच्या बिया म्हणजे नितळ चेहऱ्याचे वरदान, पाहा फेसपॅकची सोपी कृती

homemade Papaya Seeds Face Pack : पपई त्वचेसाठी उत्तमच, पपईचे फेसपॅक तर करता येतातच, पण पपईच्या बियाही फार उत्तम.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2023 05:48 PM2023-01-11T17:48:03+5:302023-01-11T18:01:45+5:30

homemade Papaya Seeds Face Pack : पपई त्वचेसाठी उत्तमच, पपईचे फेसपॅक तर करता येतातच, पण पपईच्या बियाही फार उत्तम.

homemade Papaya Seeds Face Pack - check out this easy face pack recipe | पपई खाता आणि बिया फेकून देता? पपईच्या बिया म्हणजे नितळ चेहऱ्याचे वरदान, पाहा फेसपॅकची सोपी कृती

पपई खाता आणि बिया फेकून देता? पपईच्या बिया म्हणजे नितळ चेहऱ्याचे वरदान, पाहा फेसपॅकची सोपी कृती

पपई खाल्यामुळे आपल्या शरीराला खूप फायदे होतात. खाण्याशिवाय याचे अन्य फायदे देखील आहेत. स्किनसाठी पपईचा वापर फेस पॅक म्हणून करणे  लाभदायक ठरते. पपईमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विटामिन्स आणि मिनरल्स असतात. हे घटक शरीरातील संपूर्ण कार्य योग्य पद्धतीने काम करायला मदत करतात. खाण्यासोबतच, पपई त्वचेसाठी देखील चांगली मानली जाते. पपईमध्ये असलेल्या अनेक पोषक तत्वांमुळे स्किनला पोषण प्राप्त होते तसेच स्किनवरील अशुद्ध घटक देखील नष्ट होतात. पपई आरोग्य आणि चेहरा दोन्हीसाठी एक वरदानच आहे. घरच्या घरी आपण खूप सोप्या स्टेप्स फॉलो करून पपईच्या बियांचा फेसपॅक तयार करू शकतो आणि चेहऱ्यावर ग्लो आणू शकतो. 

पपईच्या बियांचा फायदा 

त्वचेशी संबंधित कोणत्याही समस्या दूर करण्यासाठी पपईच्या बिया अतिशय फायदेशीर ठरतात. यामध्ये अँटी-एजिंग गुणधर्म असतात. हे घटक आपल्या त्वचेसाठी लाभदायक असतात. या बियांचे सेवन केल्यास कमी वयातच त्वचेवर दिसणारी वृद्धत्वाची लक्षणे जसे की, सुरकुत्या यांसारख्या समस्या दूर होण्यास मदत मिळू शकते.

फेसपॅक बनविण्याचे साहित्य - 

१. पपईच्या बिया - १ टेबलस्पून 
२. नारळाचे तेल - १ टेबलस्पून 
३. मध - १ टेबलस्पून 

फेसपॅक बनविण्याची कृती - 

१. पपईच्या बिया आणि गर वेगळा करून घ्या. पपईच्या बिया घेऊन खलबत्त्यात जाडसर भरडून घ्या. 
२. पपईच्या बियांची जाडसर भरड झाल्यावर त्यात मध आणि नारळाचे तेल घालून घ्यावे. 


३. हे मिश्रण चमच्याच्या साहाय्याने ढवळून घ्या. मिश्रण एकत्रित करून त्याची घट्टसर पेस्ट होईपर्यंत एकजीव करून घ्या. 
४. हे मिश्रण स्मूथ होण्यासाठी त्यात गरजेनुसार नारळाचे तेल २ थेंब घाला.

पपईच्या बियांपासून घरगुती फेसपॅक तयार आहे.

Web Title: homemade Papaya Seeds Face Pack - check out this easy face pack recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.