Join us  

घरच्याघरी करा पेडिक्युअर, काॅफी आणि दुधाचे खास स्क्रब, 2 मस्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2022 5:15 PM

पेडिक्युअर ही आपल्या पावलांची गरज असते. ही गरज नाकारुन आपण वेळ आणि पैसा वाचवू शकतो पण त्यातून आपण आपल्या पायांचं सौंदर्य मात्र गमावतो हे नक्की. हे टाळायचं असेल तर घरच्याघरी पेडिक्युअर करणं आवश्यक आहे. त्यासाठी सौंदर्य तज्ज्ञ दुधाचं आणि काॅफीचं स्क्रब करण्याचा सल्ला देतात. 

ठळक मुद्देघरघ्याघरी पेडिक्युअर करुन पायाच्या सौंदर्याची आणि स्वच्छतेची काळजी घेणं सहज शक्य आहे. घरच्याघरी पेडिक्युअर करताना ते परिणामकारक होण्यासाठी दूध आणि काॅफी हे दोन घटक फायदेशीर ठरतात.महिन्यातून एकदा घरच्याघरी पेडिक्युअर करुन पायाची त्वचा जपणं आवश्यक आहे. 

सुंदरता आणि नीटनेटकेपणा जपायचा म्हणजे केवळ चेहऱ्याकडे पाहावं, चेहऱ्याची त्वचा जपावी असं नव्हे. खरी सुंदरता आणि नीटनेटकेपणा बघताना , जोखताना आणि स्वत:च्या बाबतीत ती जपताना चेहरा नाही तर पाय बघायला हवेत. आपण स्वत:ची किती काळजी घेतो हे पायाकडे बघितलं तर लक्षात येतं. पण पायाकडे बघायला ना वेळ असतो ना आपल्या लेखी काही गरज? पण हा समज चुकीचा आहे असं सौंदर्य तज्ज्ञ म्हणतात.  पाय नेहमी जमिनीला टेकलेले असतात. त्यामुळे जमिनीवरील धूळ, जमिनीच्या पृष्ठभागावरचा खडबडीतपणा याचा सामना पायांनाच करावा लागतो. त्यामुळे काळजीचा हात फिरवून लाड करुन घेण्याची गरज पायांना देखील असते. पायाच्या स्वच्छतेकडे, सौंदर्याकडे दुर्लक्ष केल्यास पाय, पायाची त्वचा ही घातक जिवाणू आणि बुरशीसारखे आजार वाढण्याची जागा होते. म्हणूनच पेडिक्युअर या ब्यूटी ट्रीटमेण्टची गरज असते.

Image: Google

पेडिक्युअर हे पार्लरमध्ये जाऊनच करायला हवं असं नाही. पायांचं सौंदर्य जपण्यासाठी, पायाच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी पार्लरमधले पेडिक्युअर अनेकांना चैन वाटते, यावर नको पैसे खर्च करायला, वेळ घालवायला असं वाटतं. जरी पार्लरमध्ये जाऊन पेडिक्युअर करण्यासठी वेळ मिळत नसला तरी पेडिक्युअर ही आपल्या पावलांची गरज असते. ही गरज नाकारुन आपण वेळ आणि पैसा वाचवू शकतो पण त्यातून आपण आपल्या पायांचं सौंदर्य मात्र गमावतो हे नक्की. हे टाळायचं असेल तर घरच्याघरी पेडिक्युअर करणं आवश्यक आहे. 

Image: Google

पेडिक्युअर का महत्त्वाचं

 त्वचा चेहऱ्याची असू देत किंवा पायाची ती सुंदर तेव्हाच राहाते, जेव्हा तिला आवश्यक असलेला ओलावा मिळतो, आर्द्रता मिळते. तसेच त्वचेच्या सौंदर्यासाठी त्वचेतील नैसर्गिक आद्रताही जपली जायला हवी. पेडिक्युअरद्वारे पायाच्या त्वचेत ओलावा निर्माण होतो. पायाच्या त्वचेवर या उपायानं डाग पडत नाही.  पावलाची, बोटांची त्वचा पेडिक्युअरमुळे स्वच्छ होते. पायांंना घट्टे पडून तेथील त्वचा निबीड होत नाही. पेडिक्युअर करताना पायाला आवश्यक तो मसाज मिळतो. त्याचा परिणाम पावलांना आणि पोटऱ्यांना आराम मिळतो. मसाजमधून केवळ पायाच्या त्वचेलाच नाहीतर संपूर्ण शरीराला उष्णता मिळते. रक्तप्रवाह वाढतो. त्यामुळे तेथील पेशीनिर्मितीचा वेग वाढतो. मृत त्वचा पायावर साठून राहात नाही. स्वच्छता आणि सौंदर्याशी निगडित या महत्त्वाच्या कारणामुळे पेडिक्युअर करण्याची गरज असते. किमान महिन्यातून एकदा तरी पेडिक्युअर करण्याचा सल्ला सौंदर्य तज्ज्ञ देतात.  काॅफी आणि दूध या दोन घटकांचा वापर कर्रत घरच्याघरी प्रभावी आणि परिणामकारक पेडिक्युअर करणं शक्य आहे. 

Image: Google

दुधाचं स्क्रब

पेडिक्युअरसाठी दुधाचं स्क्रब करताना आधी एक कप कोमट दूध घ्यावं. त्यात 1 मोठा चमचा साखर आणि मीठ घालावं. यात 1 चमचा बेबी ऑइल घालावं. हे सर्व नीट मिसळून घ्यावं. हे स्क्रब थेट पायाला चोळून लावलं तरी चालतं. पण पाय चांगले स्वच्छ होण्यासाठी आधी पाय कोमट पाण्यात बुडवून 10-15 मिनिटं बसावं. पाण्यातून पाय बाहेर काढून ओल्या पावलांवर दुधाचं स्क्रब घासून लावल्यास पायाची त्वचा स्वच्छ होते. टाचा मऊ होतात. 

 Image: Google

काॅफी स्क्रब

काॅफीचं स्क्रब करताना एका भांड्यात  1 मोठा चमचा काॅफी पावडर घ्यावी. त्यात 1 मोठा चमचा मीठ घालवं. ते नीट मिसळलं की त्यात अर्धा कप मध घालावं. सुंगधासाठी इसेन्शियल ऑइलचे 2-3 थेंब घालावेत. हे सर्व एका बादलीत कोमट पाणी घेऊन टाकलं तरी चालतं. किंवा आधी पाय कोमट पाण्यात थोडा वेळ बुडवून ठेवावे. मग ओलसर पाय काॅफी स्क्रबने घासावेत . या दोन्ही पध्दतीने काॅफी स्क्रबचा उपयोग करुन पायाच्या सौंदर्याची काळजी घेता येते.

 

Image: Google

घरच्याघरी पेडिक्युअर करताना..

1. दूध किंवा काॅफीचं स्क्रब वापरुन घरच्याघरी इफेक्टिव्ह पेडिक्युअर सहज करता येतं. घरी पेडिक्युअर करताना ते योग्य पध्दतीने केलं तर त्याचा फायदा होतो. पेडिक्युअर करताना एका बादलीत/ टबात कोमट पाणी घ्यावं. कोमट पाण्यात पाय बुडवून 10-15 मिनिटं बसावं. 

2. कोमट पाण्यातच घरी तयार केलेलं दुधाचं किंवा काॅफीचं स्क्रब टाकावं. ते पाण्यात मिसळून घ्यावं. या पाण्यात पाय बुडवून बसलं तरी चांगला परिणाम दिसतो. दुसऱ्या पध्दतीने पेडिक्युअर करताना आधी पाय कोमट पाण्यात बुडवून 10-15 मिनिटं बसावं. नंतर पाय पाण्यातून बाहेर काढून ओल्या पावलांवर घरी तयार केलेलं स्क्रब घासून लावावं.

3. स्क्रब लावून झालं की प्युबिक स्टोन किंवा फुटब्रशनं पाय, पायाची बोटं, टाचा घासून स्वच्छ कराव्यात. यामुळे पायावरील मृत त्वचा निघून जाते. 

Image: Google

4.  प्युबिक स्टोननं किंवा फूटब्रशनं पाय घासताना टाचा आणि नखांच्या सभोवतालची त्वचा नीट स्वच्छ होणं आवश्यक आहे. तिथेच घाण साचून राहते. 

5. पाय घासून झाले की पुन्हा कोमट पाण्यात बुडवावे.

6. ओले पाय रुमालानं पुसावे आणि लगेच पायाला माॅश्चरायझिंग क्रीम लावावं.

7. वाढलेली नखं कापावीत. नखांना तिन्ही बाजूंनी घासून शेप द्यावा आणि आपल्या आवडती नेलपेण्ट लावावी. घरच्याघरी 20-25 मिनिटात अशा प्रकारे पेडिक्युअर करणं शक्य आहे.  

टॅग्स :ब्यूटी टिप्स