उन्हाळा सुरु झाला की, टॅनिंगची समस्या प्रत्येकाला सतावते. स्किन टॅन होतेच, शिवाय डेड स्किनमुळे चेहरा डल आणि खराब दिसू लागतो. बऱ्याचदा चेहरा नसून, कपाळाचा भाग काळा पडत जातो (Tanning Removal). ज्यामुळे सौंदर्यात बाधा निर्माण होते. शिवाय महागडे ब्यूटी उत्पादनांचा वापर करूनही कपाळाचा काळेपणा दूर होत नाही (Skin Care Tips). जर आपल्याला कपाळाचा काळेपणा ब्यूटी उत्पादनांमध्ये खर्च न करता, घरच्या साहित्यांमध्ये घालवायचा असेल तर, काही घरगुती गोष्टींचा वापर करून पाहा (Beauty Tips).
या उपायांमुळे काही दिवसात फरक दिसेल. शिवाय त्वचेवरील टॅन आणि डेड स्किन निघेल. या नैसर्गिक उपायांमुळे उन्हाळ्यातही चेहरा कायम टवटवीत फ्रेश दिसेल(Homemade Remedies To Remove Forehead Tanning).
कमी वयातच स्किन सैल पडली? झोपण्यापूर्वी 'या' तेलाच्या २ थेंबाने करा मसाज; चेहरा दिसेल कायम तरुण
कपाळाचा काळेपणा घालवण्यासाठी नैसर्गिक घरगुती उपाय
दूध आणि हळदीचे फायदे
दुधामध्ये अनेक प्रकारचे पौष्टीक घटक आढळतात. त्यात प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे आणि फॅटी ॲसिड असतात. जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. शिवाय त्यात क्लिंजिग एजंट आढळतात. ज्यामुळे डेड स्किन, टॅनिंग आणि इतर स्किनच्या निगडीत समस्या दूर होतात. शिवाय हळदीमध्ये अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. ज्यामुळे स्किन कायम क्लिन आणि तजेलदार दिसते.
दुध आणि हळदीचा वापर
- बेसनामध्ये अर्धा चमचा हळद आणि दूध मिसळून पेस्ट तयार करा. चेहरा धुवून पेस्ट चेहऱ्यावर लावा.
- १५ मिनिटानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.
अगदी १० रुपयांत घरीच करा हेअर स्पा; ब्यूटी पार्लरमध्ये जाऊन महागडे स्पा केल्यासारखे चमकतील केस
- आपण या पेस्टचा वापर आठवड्यातून ३ वेळा करू शकता. यामुळे स्किनच्या अनेक समस्या दूर होतील.
कोरफड
कपाळावरचा काळेपणा दूर करण्यासाठी आपण कोरफडीचा वापर करू शकता. कोरफडमध्ये अँटी-सेप्टिक, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. जे त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. आपण याचा जेल थेट कपाळावर किंवा संपूर्ण चेहऱ्यावर लावू शकता. यामुळे नक्कीच काळेपणा दूर होईल. शिवाय उन्हाळ्यातही त्वचा टवटवीत दिसेल.