Lokmat Sakhi >Beauty > आता विसरा केसगळती, केस घनदाट करण्यासाठी आजीच्या बटव्यातील सिक्रेट नैसर्गिक शॅम्पूची जादू...

आता विसरा केसगळती, केस घनदाट करण्यासाठी आजीच्या बटव्यातील सिक्रेट नैसर्गिक शॅम्पूची जादू...

100% NATURAL HOME-MADE SHAMPOO : आवळा, रिठा, शिकेकाई वापरून नैसर्गिक शॅम्पू कसा बनवायचा पाहू..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2023 11:13 AM2023-04-22T11:13:09+5:302023-04-22T11:25:45+5:30

100% NATURAL HOME-MADE SHAMPOO : आवळा, रिठा, शिकेकाई वापरून नैसर्गिक शॅम्पू कसा बनवायचा पाहू..

Homemade Shampoo for Hair Growth Amla Reetha Shikakai Shampoo | आता विसरा केसगळती, केस घनदाट करण्यासाठी आजीच्या बटव्यातील सिक्रेट नैसर्गिक शॅम्पूची जादू...

आता विसरा केसगळती, केस घनदाट करण्यासाठी आजीच्या बटव्यातील सिक्रेट नैसर्गिक शॅम्पूची जादू...

केसांची स्वच्छता राखण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पू किंवा कंडिशनरचा वापर करत असतो. घनदाट आणि मजबूत केस हवे असतील तर केमिकलयुक्त शॅम्पूऐवजी नैसर्गिक पदार्थांचा केस धुण्यासाठी वापर करणे हे केव्हाही उत्तमच. नैसर्गिक सामग्रीतील पोषण तत्त्वांमुळे केसांमधील जमा झालेली दुर्गंधी नाहीशी होईल. याव्यतिरिक्त केस निरोगी आणि चमकदार देखील होतील. जर शॅम्पूच्या पॅकिंगवरील माहिती लक्षपूर्वक वाचली तर त्यामध्ये हानिकारक रसायनांचा किती भरणा असतो, हे तुमच्या लक्षात येईल. बाजारात उपलब्ध असणाऱ्या शॅम्पूमध्ये नैसर्गिक सामग्रींचा समावेश असल्याचा दावा कित्येक कंपन्यांकडून केला जातो. यामुळेच हे ब्युटी प्रोडक्ट महागडे असतात. केसांचे नुकसान टाळायचे असेल तर अशा शॅम्पूचा वापर करणं तुम्ही वेळीच थांबवायला पाहिजे. 

पूर्वीच्या काळापासून आवळा, रिठा, शिकेकाई या तीन गोष्टी केस धुण्यासाठी शॅम्पूच्या स्वरूपात वापरल्या जात आहेत. आवळा, रिठा आणि शिकेकाई मिसळून केस धुतल्यास केस चमकदार आणि मुलायम होतात. शिकेकाईमधील औषधी गुणधर्मामुळे मुळांसह संपूर्ण केसांना पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो. यामुळे केसगळती तसंच केस तुटणे इत्यादी समस्या कमी होतात. शिकेकाईचा नियमित वापर केल्यास केसगळती आणि कमी वयात पांढऱ्या होणाऱ्या केसांची समस्या देखील दूर होण्यास मदत मिळते. शिकेकाई प्रमाणेच रीठाचा देखील आयुर्वेदिक औषधांमध्ये वापर केला जातो. आवळ्यामध्ये असे अनेक गुणधर्म असतात जे तुमच्या केसांना मजबूत करतात, ज्यामुळे तुम्हाला केस गळण्यापासून आराम मिळतो. या नैसर्गिक औषधी वनस्पतीमध्ये अँटी फंगल आणि अँटी बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. हे घटक आपल्या केसांचे संरक्षण करण्याचे काम करतात आणि नैसर्गिक स्वरुपात मॉइश्चराइझ देखील करतात. आवळा, रिठा, शिकेकाई या नैसर्गिक घटकांपासून नैसर्गिक शॅम्पू कसा बनवायचा ते पाहूयात(Homemade Shampoo for Hair Growth Amla Reetha Shikakai Shampoo).

साहित्य :- 

१. रिठा - १०० ग्रॅम 
२. शिकेकाई - २० ग्रॅम 
३. सुकवलेला आवळा - २० ग्रॅम 
४. पाणी - २ कप 

'रिव्हर्स हेअर वॉशिंग' केस धुण्याची नवी पद्धत, केस गळती थांबून केस होतील चमकदार....

कृती :- 

१. सर्वप्रथम सुका आवळा व रिठा घेऊन हे दोन्ही पदार्थ फोडून घ्यावेत. या आवळ्यातील व रिठामध्ये असणाऱ्या बिया काढून घ्याव्यात. 
२. त्यानंतर शिकेकाई मधील बिया काढून शिकेकाईचे लहान लहान तुकडे करुन घ्यावेत. 
३. एका मोठ्या भांड्यात २ कप पाणी घेऊन त्यात रिठा, बिया काढून घेतलेल्या शिकेकाई, सुकवलेला आवळा घालावा. 

भरीव, दाट पापण्या व भुवयांसाठी सोनम सांगते एक राज की बात, १ घरगुती उपाय... भुवया पापण्या होतील दाट..

४. हे मिश्रण व्यवस्थित उकळवून घ्यावे. (२ कप पाणी आटून १ कप होईपर्यंत उकळवून घ्यावे.)
५. हे मिश्रण व्यवस्थित उकळवून झाल्यानंतर थोडे गार होऊ द्यावे. मिश्रण गार झाल्यावर त्यातील रिठा, शिकेकाई, आवळा हातांनी दाबून थोडे कुस्करुन घ्यावे. 
६. आता हे शॅम्पूचे मिश्रण एका मोठ्या गाळणीने गाळून घ्यावे. 


तयार झालेला हा शॅम्पू एका काचेच्या बाटलीत हवाबंद पद्धतीने स्टोअर करुन ठेवावा. हा शॅम्पू आपल्याला हवा तेव्हा थोडासा हातावर घेऊन वापरता येतो.

Web Title: Homemade Shampoo for Hair Growth Amla Reetha Shikakai Shampoo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.