Join us  

रोज गळून केसांचा झाडू झालाय? धुताना शॅम्पूमध्ये हा पदार्थ मिसळा; लांबसडक, दाट होतील केस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 1:21 PM

Homemade Shampoo For Hair Growth :

रोजच्या धावपळीच्या रुटीनमध्ये केसांकडे लक्ष द्यायला फारसा वेळ मिळत नाही. सुरूवातीला केसांवर स्काल्पमध्ये कोंडा होतो, केस कोरडे पडतात आणि विंचरताना खूपच तुटतात. तेल बदलून पाहिल्यानंतर काहीजणांना फरक जाणवतो तर काहींचे केस आधीपेक्षा जास्त गळायला लागतात. केस  खूपच गळायला लागले की आत्मविश्वासही कमी होतो. (How do you make homemade shampoo for hair growth)

केस गळणं थांबवण्यासाठी आणि नवीन केस उगवण्यासाठी केमिकल्सयुक्त शॅम्पू, तेलांपेक्षा काही घरगुती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. मेथीचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. केसांवर मेथीचा वापर केल्यास केसांची वाढ चांगली होते. केस धुण्यासाठी मेथीच्या पाण्याचा वापर करून तुम्ही घरीच शॅम्पू बनवू शकता. हा शॅम्पू बनवण्यासाठी तुम्हाला फार काही करावं लागणार नाही.  घरगुती शॅम्पू बनवण्याच्या सोप्या स्टेप्स पाहूया. (Homemade Shampoo For Hair Growth)

मेथीच्या बीया रात्रभर  पाण्यात भिजवून  ठेवा.  ॉसकाळी त्यात रोजमेरी इसेंशियल ऑईलचे २ थेंब घालून ढवळून घ्या.  एका दुसऱ्या वाटीत  माईल्ड शॅम्पू घ्या. त्यात मेथीचे पाणी घाला आणि या पाण्यानं केस धुवा. यामुळे केसांची भराभर वाढ होण्यास मदत होईल. याशिवाय केस दाट, मऊ राहतील. आठवड्यातून २ ते ३ वेळा हा प्रयोग करून पाहा.

टॅग्स :हेल्थ टिप्सकेसांची काळजी