Join us  

शाम्पू केल्यावर केस खूप गळतात? 'हा' शाम्पू वापरून पाहा, केस गळणं थांबून वाढतील भराभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2024 2:06 PM

Homemade Shampoo For Reducing Hair Fall: शाम्पू केल्यावर केस जरा जास्तच गळतात, असा अनेकींचा अनुभव असतो. म्हणूनच आता हा एक होममेड शाम्पू वापरून पाहा...(How to make shampoo at home)

ठळक मुद्देकाही दिवस इतर सगळे शाम्पू वापरणं बंद करा आणि हा होममेड शाम्पू वापरून पाहा.

केस गळण्याची समस्या सध्या खूप जास्त वाढली आहे. याचं कारण म्हणजे एक तर आहारातून आपल्याला पुरेसं पोषण मिळत नाही आणि दुसरं म्हणजे आपल्या केसांना प्रदुषणाचा वारंवार सामना करावा लागतो. त्याचाही परिणाम केसांवर होतोच. शिवाय अनेक जणींना केसांवर वेगवेगळे कॉस्मेटिक्स ट्राय करण्याची सवय असते. याचाही दुष्परिणाम म्हणजे केस गळू लागतात, केसांमध्ये कोंडा होतो. काही जणींचे शाम्पू केल्यानंतर खूपच जास्त केस गळतात (Homemade shampoo for reducing hair fall or hair loss). त्यामुळे तर त्यांना केस धुणेही अगदी नकोसे होऊन जाते (How to make shampoo at home). तुमचंही असंच होत असेल तर काही दिवस इतर सगळे शाम्पू वापरणं बंद करा आणि हा होममेड शाम्पू वापरून पाहा. (Home remedies for long and strong hair)

 

केसांचं गळणं कमी करण्यासाठी उपाय

केसांचं गळणं कमी करण्यासाठी घरगुती शाम्पू कसा तयार करायचा, याचा एक सोपा उपाय theriaaminnn या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

हाय रे तेरा घागरा!! बघा आयरा- नुपूरच्या रिसेप्शनमधले हिरोईन्सचे स्टनिंग 'घागरा लूक'

हा उपाय करण्यासाठी आपल्याला रिठे, आवळा, जास्वंदाची ८ ते १० पाने, १ टेबलस्पून मेथी दाणे आणि २ टेबलस्पून कोरफडीचा गर एवढे साहित्य लागणार आहे.

सगळ्यात आधी तर एका पातेल्यात साधारण १ लीटर पाणी उकळायला ठेवा. त्यात साधारण एक मुठभर रिठे, २ ते ३ आवळ्यांचे बारीक काप, कोरफडीचा गर, मेथी दाणे आणि जास्वंदाची पाने टाका.

 

पाणी जसं जसं उकळेल तसा तसा त्याला फेस येऊ लागेल. १ लीटर पाणी उकळून पाऊण लीटर झालं की गॅस बंद करा. पातेल्यातलं मिश्रण थंड होऊ द्या आणि नंतर एका बाटलीमध्ये भरून ठेवा.

आयरा खानच्या भरजरी लेहेंग्यावर होते सुंदर कर्दाना वर्क, बघा एम्ब्रॉयडरीचा हा प्रकार कोणता

आता हे पाणी केस धुण्यासाठी वापरा. एरवी शाम्पू करण्यापुर्वी आपण केसांना भरपूर तेल लावतो. शाम्पूने ते सगळं तेल निघून जातं. पण हा उपाय करत असाल तर केसांना भरपूर तेल लावू नका. कारण केमिकल्सचा शाम्पू केसांमधलं तेल जसं सगळं काढून टाकतो, तेवढं तेल हा घरगुती शाम्पू काढून टाकू शकत नाही. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी