Lokmat Sakhi >Beauty > प्राजक्ता कोळी म्हणते महागडे ब्यूटी प्रॉडक्ट्स कशाला, मी करते घरगुती उपाय कारण...

प्राजक्ता कोळी म्हणते महागडे ब्यूटी प्रॉडक्ट्स कशाला, मी करते घरगुती उपाय कारण...

Prajakta koli share her home made face pack to get glowing skin : Prajakta koli share Skin & Hair Care : Homemade skin & hair care Secrets by Prajakta Koli : 'प्राजक्ता कोळी' त्वचा आणि केसांची काळजी घेण्यासाठी करते हे खास घरगुती उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2025 19:33 IST2025-02-04T19:04:25+5:302025-02-04T19:33:28+5:30

Prajakta koli share her home made face pack to get glowing skin : Prajakta koli share Skin & Hair Care : Homemade skin & hair care Secrets by Prajakta Koli : 'प्राजक्ता कोळी' त्वचा आणि केसांची काळजी घेण्यासाठी करते हे खास घरगुती उपाय...

Homemade skin & hair care Secrets by Prajakta Koli Prajakta koli share her home made face pack to get glowing skin Prajakta koli share Skin & Hair Care | प्राजक्ता कोळी म्हणते महागडे ब्यूटी प्रॉडक्ट्स कशाला, मी करते घरगुती उपाय कारण...

प्राजक्ता कोळी म्हणते महागडे ब्यूटी प्रॉडक्ट्स कशाला, मी करते घरगुती उपाय कारण...

सध्या रील्स, इंस्टाग्राम या माध्यमातून बरेच लोकप्रिय झालेले अनेक कंटेंट क्रिएटर्स असतात. हे कंटेंट क्रिएटर्स वेगवेगळ्या प्रकारचे कंटेंट नेहमी तयार करत असतात. अशीच एक कंटेंट क्रिएटर आणि (Homemade skin & hair care Secrets by Prajakta Koli) सगळ्यांची लाडकी 'प्राजक्ता कोळी'. 'मोस्ट्लीसेन' 'प्राजक्ता कोळी' म्हणून तिला ओळखले जाते. 'मोस्ट्लीसेन' आणि 'मिसमॅच' सारख्या वेबसिरीजमुळे सध्याच्या यंग तरुणाईत अत्यंत लोकप्रिय असणाऱ्या 'प्राजक्ता कोळीचे' फॅनफॉलोअर्स फार मोठ्या प्रमाणात आहेत. तिचे बरेच चाहते तिच्या सौंदर्यावर देखील फिदा आहेतच(Prajakta koli share Skin & Hair Care).

प्राजक्ता आपले सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी फारसे महागडे उपचार किंवा पार्लरला जात नाही. तिच्या स्किन आणि हेअर केअर रुटीनमध्ये ती नेहमीच घरगुती उपायांना (Prajakta koli share her home made face pack to get glowing skin) अधिक प्राधान्य देते. आपल्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकणारी 'प्राजक्ता कोळी' (Prajakta Koli) जितकी सुंदर आहे तितकीच ती गोंडस देखील आहे. प्राजक्ता आपल्या त्वचा आणि केसांची काळजी घेण्यासाठी नेमक्या कोणत्या घरगुती उपायांचा वापर करते, ते पाहूयात.  

१. प्राजक्ता स्किनसाठी वापरते हा फेसमास्क... 

प्राजक्ता कोळीने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, ती तिच्या त्वचेसाठी बेसनाचा वापर करते. त्वचेसाठी बेसन वापरणे हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे. तिने पुढे असेही सांगितले की या उपायाने तिच्या त्वचेवर जादू केल्यासारखे काम केले आहे. प्राजक्ता स्किनसाठी वापरते तो फेसमास्क नेमका कसा तयार करायचा आणि वापरायचा ते पाहूयात. 

वयाच्या तिशीनंतर खालावते ‘कोलेजन’ची पातळी, त्वचा दिसते म्हातारी; खा ८ गोष्टी-दिसा कायम तरुण...

हा फेसमास्क तयार करण्यासाठी आपल्याला प्रत्येकी २ टेबलस्पून बेसन आणि दही, १/३ टेबलस्पून हळद , १ टेबलस्पून मध इतक्या साहित्याची गरज लागणार आहे. हा फेसमास्क तयार करण्यासाठी एका बाऊलमध्ये बेसन, दही, हळद, मध असे सगळे पदार्थ एकत्रित घेऊन त्याची पेस्ट तयार करून घ्यावी. प्राजक्ताने सांगितले की, जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही बेसना ऐवजी तांदळाचे पीठही वापरू शकता.

हा तयार फेसमास्क चेहऱ्याला लावून घ्यावा. त्यानंतर, १० ते १५ मिनिटे किंवा फेसमास्क सुकेपर्यंत त्वचेवर ठेवावा. मग पाण्याने धुवून चेहरा स्वच्छ करावा. हा फेसमास्क तुमच्या चेहऱ्यावर स्क्रबसारखे काम करेल आणि त्वचा देखील चमकदार करेल. जर तुम्हाला घाईगडबडीच्या वेळी एखाद्या फंक्शनला जायचे असेल आणि पार्लरला जाण्यास वेळ नसेल तेव्हा आपण हा झटपट इन्स्टंट उपाय नक्कीच करुन पाहू शकता.

कितीही गडद डार्क सर्कल्स होतील गायब! फक्त चमचाभर केशर वापरा - आजीबाईच्या बटव्यातील उपाय...


    

करिश्मा तन्ना म्हणते, सगळ्यात भारी माझ्या आईने सांगितलेला सोपा उपाय, म्हणून चमकतो आहे चेहरा...

२. केसांसाठी तिच्या वडिलांनी तयार केलेल्या तेलाचा करते वापर... 

प्राजक्ता त्वचेसोबतच केसांची देखील तितकीच काळजी घेते. केसांचे सौंदर्य आणि लूक अगदी परफेक्ट दिसावा यासाठी ती तिच्या वडिलांची सिक्रेट रेसिपी असणारे खास असे हेअर ऑइल वापरते. हे तेल तयार करण्यासाठी आपल्याला २ कप खोबरेल तेल, १५ कडीपत्त्याची पान, २ कप चिरलेला कांदा इतके साहित्य लागणार आहे.

हे तेल तयार करण्यासाठी सर्वात आधी एक पॅन घेऊन त्या पॅनमध्ये खोबरेल तेल ओतून घ्यावे. खोबरेल तेल हलकेच गरम झाल्यावर त्यात चिरलेला कांदा व कडीपत्त्याची पान घालावीत. आता या तेलाला हलकेच एक उकळी येऊ द्यावी. त्यानंतर गॅस बंद करून तेल थंड करून घ्यावे. तेल थंड झाल्यावर व्यवस्थित गाळून एका काचेच्या हवाबंद बाटलीत स्टोअर करून ठेवावे. प्राजक्ता सांगते तिच्या केसगळतीपासून ते केसांच्या वाढीबद्दलच्या अनेक समस्या अगदी लगेच कमी होतात. त्यामुळे अशा घरगुती तेलाने आठवड्यातून २ वेळा केसांना चांगली मालिश करावी.

Web Title: Homemade skin & hair care Secrets by Prajakta Koli Prajakta koli share her home made face pack to get glowing skin Prajakta koli share Skin & Hair Care

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.