Lokmat Sakhi >Beauty > केसांच्या फ्रिझीनेसने हैराण आहात? चिंता नको, एक घरगुती स्प्रे, २ मिनिटात केसांना येईल शाईन

केसांच्या फ्रिझीनेसने हैराण आहात? चिंता नको, एक घरगुती स्प्रे, २ मिनिटात केसांना येईल शाईन

Home Remedy for Frizzy Hair, this spray will give you shinny hairs केस धुतल्यानंतर फ्रिझीनेसची समस्या कॉमन जरी असली तरी, यातून एक स्प्रे सुटका मिळवून देईल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2023 01:59 PM2023-02-05T13:59:33+5:302023-02-05T14:02:02+5:30

Home Remedy for Frizzy Hair, this spray will give you shinny hairs केस धुतल्यानंतर फ्रिझीनेसची समस्या कॉमन जरी असली तरी, यातून एक स्प्रे सुटका मिळवून देईल..

Homemade Spray for Frizzy Hair, Plus Tips for Prevention, apply spray on hairs, hairs will Shine | केसांच्या फ्रिझीनेसने हैराण आहात? चिंता नको, एक घरगुती स्प्रे, २ मिनिटात केसांना येईल शाईन

केसांच्या फ्रिझीनेसने हैराण आहात? चिंता नको, एक घरगुती स्प्रे, २ मिनिटात केसांना येईल शाईन

या धकाधकीच्या जीवनात अनेक जणांना स्वतःची काळजी घेणं कठीण जाते. मुख्य म्हणजे त्वचा आणि केसांची निगा राखणं अनेकांना जमत नाही. याला कारणीभूत अनेक गोष्टी आहेत. केसांच्या निगडीत अनेक समस्या उद्भवतात. केसात कोंडा तयार होणे, केस लवकर पांढरे होणे, फाटे फुटणे अशा प्रकारच्या तक्रारी महिला वर्ग करत असतात. वाढत्या प्रदुषणामुळे देखील केस व टाळू खराब होते. काहींचे केस धुतल्यानंतर फ्रिझी होतात, केसांवर ड्रायनेस दिसू लागते. एकदा का केस फ्रिझी झालेत की, केसांवर काय उपाय करावे हे सुचत नाही. केस विंचरल्यानंतर देखील फ्रिझी हेअर हैराण करतात. अशा वेळी बाहेर जाणे अवघड होऊन जाते.

दरम्यान, केसांवर फ्रिझीनेस वाढल्यानंतर केसांना कंडीशनर आणि तेलाने मालिश करावे असा सल्ला दिला जातो. मात्र, केमिकलयुक्त प्रोडक्ट्समुळे देखील केस निर्जीव होतात. जर आपल्याला झटपट केसांवरील फ्रिझीनेस घालवायचा असेल तर एक घरगुती उपाय करून पाहा. यासाठी एक स्प्रे आपल्याला मदत करेल. हा स्प्रे घरगुती साहित्यातून बनतो. याने केसांवरील फ्रिझीनेस झटकन निघते, यासह केस कोमल व शाईनी दिसतात. 

स्प्रेसाठी लागणारं साहित्य

कंडीशनर

पाणी

बदाम तेल

एसेंशियल ऑयल

असा तयार करा स्प्रे

सर्वप्रथम, एका स्प्रे बॉटलमध्ये पाणी घ्या. त्यात आपल्या केसांवर योग्यरित्या काम करणारा कंडीशनर घाला. त्यानंतर बदाम तेल,  एसेंशियल ऑयलचे काही थेंब मिसळा. हे मिश्रण चांगले मिक्स करा. केस धुतल्यानंतर जर केसांवर फ्रिझीनेसची समस्या उद्भवत असेल तर, सर्वप्रथम केस विंचरा त्यानंतर केसांवर या स्प्रेचे पाणी शिंपडा. सगळ्या केसांवर स्प्रेचे पाणी शिंपडा. याने केसांवरील फ्रिझीनेस निघून जाईल. व केस कोमल व शाईनी दिसतील.

कंडिशनर केसांना चिकट न करता पोषण आणि मॉइश्चरायझ करतात. तर बदाम तेल हळूवारपणे केसांमध्ये आत प्रवेश करते, यामुळे केसांना पोषण मिळते. बदामाच्या तेलात अनेक व्हिटॅमिन, अँटीऑक्सिडंट्स आणि पोषक घटक आढळून येतात. याच पोषक घटकांमुळे बदामाचे तेल हेअर केअरसाठी बेस्ट मानले जाते. त्यामुळे हा स्प्रे नक्कीच आपल्या केसांसाठी फायदेशीर आहे.

Web Title: Homemade Spray for Frizzy Hair, Plus Tips for Prevention, apply spray on hairs, hairs will Shine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.