चेहऱ्याची त्वचा चांगली दिसावी म्हणून आपण अनेक उपाय करतो. फेसमास्क, फेसपॅक, स्क्रबिंग अशा अनेक पर्यायांचा वापर आपण करतो. परंतु चेहऱ्याच्या त्वचेसोबतच शरीराच्या त्वचेची काळजी घेणे देखील तितकेच महत्वाचे असते. काहीवेळा चेहऱ्याच्या त्वचेची काळजी घेताना आपण शरीराच्या त्वचेकडे दुर्लक्ष करतो. शरीराच्या त्वचेची योग्य ती काळजी घेतली नाही तर त्वचेसंबंधित अनेक समस्या उद्भवतात. यासाठी आठवड्यातून एकदा बॉडी स्क्रबिंग करणे फायदेशीर ठरते(Easy Homemade Sugar Scrub Recipe).
बॉडी स्क्रबिंग करण्यासाठी आपल्याला बाजारातून महागडे स्क्रबिंग आणायची गरज नाही. आपण घरच्या घरी देखील नैसर्गिक पदार्थांचा वापर करून बॉडी स्क्रब बनवू शकतो. अगदी मोजक्या पदार्थांचा वापर करून देखील आपण घरच्या घरी स्क्रब तयार करु शकतो. घरच्या घरी बॉडी स्क्रब कसे तयार करायचे ते पाहूयात(How to Make Your Own Sugar Scrub At Home).
साहित्य :-
१. साखर - २ कप
२. मध - २ कप
३. खोबरेल तेल - ४ टेबलस्पून
४. बॉडी वॉश - १/२ कप
५. परफ्युम / इसेंन्शियल ऑइल - ३ ते ४ थेंब
कृती :-
१. खलबत्त्यात साखर घेऊन ती थोडीशी क्रश करुन घ्या.
२. आता एक प्लॅस्टिक कंटेनर घेऊन त्यात क्रश केलेली साखर ओता.
३. त्यानंतर या साखरेत मध, खोबरेल तेल, बॉडी वॉश घाला.
४. आता या बॉडी स्क्रबमध्ये आपल्या आवडीनुसार, परफ्यूम किंवा इसेंन्शियल ऑइलचे काही थेंब घालावेत.
५. सगळ्यात शेवटी हे मिश्रण चमच्याने ढवळून एकजीव करुन घ्यावे.
६. आता या हवाबंद कंटेनरला घट्ट झाकण लावून कोरड्या ठिकाणी स्टोअर करून ठेवावे.
आपले बॉडी स्क्रब वापरण्यासाठी तयार आहे.
केस काळे करण्यासाठी विसरा विकतचे डाय, घ्या सोपा घरगुती उपाय! केस काळेभोर - नो साइड इफेक्ट्स...
बॉडी स्क्रब करण्याचे फायदे :-
१. त्वचेतील मृत पेशी निघून जातात.
२. स्क्रबिंगमुळे त्वचेचे सौंदर्य अनेक पटींनी वाढते, आणि त्वचेला चमक येते.
३. त्वचेवरील अतिरिक्त केस निघून जाण्यास मदत मिळते.
४. बॉडी स्क्रबिंगमुळे त्वचेची पी.एच पातळी संतुलित राखली जाते.