Join us  

आरोग्यासाठी घातक-चेहऱ्यासाठी वरदान; चमचाभर साखरेची चालते चेहऱ्यावर जादू-येईल नैसर्गिक तेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2024 3:20 PM

Homemade sugar scrubs for skin care : महागडे स्क्रब-फेशिअल कशाला? तजेलदार त्वचेसाठी फक्त साखर पुरेशी..

साखर आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकत नाही, पण त्वचेसाठी नक्कीच फायदेशीर ठरु शकते. त्वचेला साखर लावण्याचे अनेक फायदे आहेत. साखर त्वचेमध्ये नैसर्गिक एजंट म्हणून काम करते. आपण साखर स्क्रब म्हणून वापरू शकता. जे त्वचेवरील मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करतील (Glowing Skin). यासह साखरेचा वापर आपण अनेक कारणांसाठी करू शकता. पण साखरेचा वापर त्वचेवर कशापद्धतीने करायचा? याची माहिती फार कमी लोकांना ठाऊक असेल (Skin Care Tips).

त्वचा निरोगी आणि चमकदार त्तेज टिकवण्यासाठी आपण साखरेचा वापर करू शकता (Sugar Scrub). पण चेहऱ्यावर साखरेचा वापर नक्की कसा करावा? पाहूयात(Homemade sugar scrubs for skin care).

जाता जात नाही हट्टी डार्क सर्कल? मधात मिसळा फक्त २ गोष्टी, काळी वर्तुळे गायब-डोळे दिसतील टपोरे

चेहऱ्यावर येईल नैसर्गिक चमक(Use of Sugar for Glowing Skin)

खराब जीवनशैली, अयोग्य आहार, प्रदूषण इत्यादींमुळे आपली त्वचा सतत खराब होत राहते. प्रदुषणामुळे त्वचेवरील तेज झाकले जाते, यासह खराब देखील होते. त्वचेवर नैसर्गिक चमक मिळवण्यासाठी केमिकल उत्पादनांचा वापर करण्यापेक्षा आपण घरगुती वस्तूंचा वापर करून चेहरा क्लिन करू शकता. आपण साखरेचा वापर करून त्वचेच्या निगडीत अनेक समस्या सोडवू शकता.

चेहऱ्यावर या पद्धतीने करा साखरेचा वापर

त्वचेची गमावलेली चमक परत मिळवण्यासाठी, आपण साखरेचा वापर करू शकता. यासाठी एका वाटीत एक चमचा साखर, एक चमचा खोबरेल तेल, आणि अर्धा चमचा मध मिसळा. तयार पेस्टवर ३० मिनिटांसाठी झाकण ठेवा. ३० मिनिटांनंतर याचा वापर आपण चेहऱ्यावर करू शकता.

केमिकल डायमुळे केस गळतात? करून पाहा नारळाच्या शेंड्यांचा वापर; केसांवर चढेल नैसर्गिक रंग

अशा पद्धतीने करा साखरेचा चेहऱ्यावर वापर

चेहऱ्यावर साखर फक्त रात्रीच्या वेळेस वापरावी. सर्व प्रथम, चेहरा साध्या पाण्याने धुवा आणि सुती कापडाने कोरडा करा. चेहरा कोरडा झाल्यानंतर चमच्याने किंवा बोटाच्या मदतीने चेहऱ्यावर साखरेची पेस्ट लावा. २० मिनिटांसाठी तसेच ठेवा. २० मिनिटानंतर चेहरा पाण्याने धुवा. सकाळी नैसर्गिक फेसवॉशच्या मदतीने आपला चेहरा पुन्हा धुवा. आपण याचा वापर आठवड्यातून २ वेळा करू शकता. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी