केवळ त्वचाच नाही तर, केसांची देखील तितकीच काळजी घेणं गरजेचं (Hair Growth). बिघडलेल्या जीवनशैलीचा मुख्य फटका केसांना देखील होतो. केस गळतात, अकाली पांढरी होतात, केस पातळ होणे यासह इतर समस्या केसांच्या निगडीत निर्माण होतात (Hair Serum). केसांची निगा राखण्यासाठी आपण ब्यूटी उत्पादनांचा वापर करतो.
पण ब्यूटी उत्पादनांचा वापर करण्यापेक्षा आपण घरगुती उपायांनी देखील केसांची निगा राखू शकता. यासाठी आपण कांदा, कडीपत्ता आणि आल्याचा वापर करून पाहू शकता. या घरगुती उपायामुळे केस अधिक मजबूत होतील. कांदा, कडीपत्ता आणि आल्यातील गुणधर्मामुळे केस अधिक दाट आणि सुंदर दिसतील(Homemade Thick Hair Growth Serum / Stop Hair Fall In just 1 Month).
हेअर सीरम करण्यासाठी लागणारं साहित्य
कांदा
कडीपत्ता
फक्त २ गोष्टी दह्यात कालवून खा, बॅड कोलेस्टेरॉलचा त्रास होईल कमी, रक्ताभिसरण होईल छान
आलं
एरंडेल तेल
लिंबाचा रस
अशा पद्धतीने तयार करा हेअर सीरम
सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यात २ चिरलेले कांदे, एक इंच आलं, एक वाटी कडीपत्ता घालून वाटून घ्या. त्यात पाणी घालू नका. एका वाटीमध्ये एक सुती कापड ठेवा, त्यात वाटण ओतून पिळून त्यातील रस काढा.
तयार रस एका बाऊलमध्ये काढून घेतल्यानंतर त्यात एक चमचा एरंडेल तेल आणि अर्धा लिंबाचा रस घालून मिक्स करा. अशा प्रकारे आपलं घरगुती हेअर सीरम वापरण्यासाठी रेडी.
हेअर सीरम वापरण्यापूर्वी केस विंचरून घ्या. त्यात कॉटन बॉल बुडवून स्काल्प आणि केसांना लावा. ३० मिनिटांसाठी तसेच राहूद्या. नंतर केस शाम्पूने धुवा. या हेअर सीरमचा वापर आपण आठवड्यातून २ वेळा करू शकता. यामुळे केस अधिक दाट आणि काळेभोर होतील. केसांच्या मुळांना पोषण मिळेल.
केसांसाठी कांद्याचे फायदे
कांद्यामध्ये केटालेस नावाचं ॲण्टिऑक्सिडेण्ट असतं ते केसांच्या वाढीसाठी महत्वाचं असतं. कांद्यामध्ये असलेल्या सल्फरमुळे केसांच्या मुळांचं पोषण होतं.
केसांसाठी कडीपत्त्याचे फायदे
कडीपत्ता फक्त फोडणीसाठी नसून, केसांसाठीही फायदेशीर ठरते. त्यात दाहक विरोधी गुणधर्म असतात. जे केसांच्या संबंधित समस्या सोडवण्यास मदत करते. त्यातील अमीनो ॲसिड केसांना चमकदार बनवते.