Lokmat Sakhi >Beauty > फक्त चिमूटभर हळद आहे? 'असा ' करा उपयोग मिळवा इन्स्टंट ग्लो घरी आणि झटपट

फक्त चिमूटभर हळद आहे? 'असा ' करा उपयोग मिळवा इन्स्टंट ग्लो घरी आणि झटपट

Homemade Turmeric Face Pack for Instantly Bright and Glowing Skin नितळ त्वचेसाठी हळदचा करा असा वापर, मिळेल इन्स्टंट क्लिनिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2023 07:20 PM2023-03-19T19:20:06+5:302023-03-19T19:20:47+5:30

Homemade Turmeric Face Pack for Instantly Bright and Glowing Skin नितळ त्वचेसाठी हळदचा करा असा वापर, मिळेल इन्स्टंट क्लिनिंग

Homemade Turmeric Face Pack for Instantly Bright and Glowing Skin | फक्त चिमूटभर हळद आहे? 'असा ' करा उपयोग मिळवा इन्स्टंट ग्लो घरी आणि झटपट

फक्त चिमूटभर हळद आहे? 'असा ' करा उपयोग मिळवा इन्स्टंट ग्लो घरी आणि झटपट

सणासुदीचे दिवस सुरु झाले की, आपण आपल्या त्वचेकडे जास्त लक्ष देतो. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहे, व काही दिवसात गुढीपाडवा हा सण येईल. महाराष्ट्रातील नववर्षाचे स्वागत करण्यासाठी महिलावर्ग खूप उत्सुक असतात. स्वतः सुंदर व हटके दिसण्यासाठी त्या पार्लरमध्ये जाऊन तासंतास घालवतात. पण आपण घरच्या घरी संपूर्ण त्वचा क्लिन करू शकता.

या ट्रिकमुळे त्वचेमधील घाण निघून जाईल. यासह स्कार्स, मुरुमांचे डाग, तेलकटपणा कमी होईल. मुख्य म्हणजे या फुल बॉडी इन्स्टंट क्लिनिंगमुळे त्वचेवर ब्राईटनेस येईल. या उपायात आपण हळदचा वापर करणार आहोत. हळदीमध्ये अँटीऑक्सिडेंट, अँटीफंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे त्वचेची ऍलर्जी, फोड आणि मुरुमांपासून मुक्त होण्यास मदत करतात. चला तर मग या ट्रिकचा वापर कसा करायचा पाहूयात(Homemade Turmeric Face Pack for Instantly Bright and Glowing Skin).

गुढी पाडव्याला चेहरा सतेज आणि फ्रेश दिसायला हवा? १ चमचा तूप-चिमूटभर हळद- करा खास उपाय आठवडाभर

फुल बॉडी इन्स्टंट क्लिनिंगसाठी लागणारं साहित्य

हळद

कॉफी पावडर

१ टेबलस्पून लिंबाचा रस

एलोवेरा जेल

एक बटाटा तुमचा चेहरा उजळवू शकतो! बटाटा वापरुन करा ४ फेसमास्क- आठवडाभरात चेहरा तजेलदार

गुलाब जल

फुल बॉडी इन्स्टंट क्लिनिंग करण्याची पद्धत

सर्वप्रथम, लोखंडी तवा गरम करण्यासाठी ठेवा. त्यावर हळद ब्राऊन रंग येऊपर्यंत भाजून घ्या. आता भाजलेली हळद एका वाटीत काढून घ्या. त्यात २ टेबलस्पून कॉफी पावडर, १ टेबलस्पून लिंबाचा रस, कोरफडीचा गर व गुलाब जल मिक्स करून मिश्रण तयार करा.

केस गळतात म्हणून कंटाळलात? मेथीचे तेल करा - केस गळण्याचे टेन्शन नाही...

आता हे मिश्रण हाताने संपूर्ण चेहरा व हातावर लावा. ही प्रोसेस आंघोळीच्या आधी करायची आहे. २० मिनिटे हे मिश्रण त्वचेवर ठेवायचे आहे. २० मिनिटानंतर आपल्याला हाताने मसाज करून स्क्रब करायचे आहे. स्क्रब केल्यानंतर सामान्य पाण्याने त्वचा धुवून काढा. अशा प्रकारे आपल्याला नितळ तुकतुकीत त्वचा मिळेल. आपण याचा वापर १५ दिवसातून एकदा करू शकता. 

Web Title: Homemade Turmeric Face Pack for Instantly Bright and Glowing Skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.