थंडीच्या दिवसांत त्वचेशी संबंधित अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. हिवाळ्यामध्ये त्वचा रूक्ष - कोरडी होणे, निस्तेज व निर्जीव दिसणं, त्वचा कोरडी पडून भेगा पडणं, तसेच त्वचा ड्राय होऊन पापुद्रे निघणं यासारख्या समस्या सतावतात. जसजशी वातावरणातील थंडी वाढू लागते तसे या लहान वाटणाऱ्या समस्या अधिकच त्रास देतात. या सगळ्या समस्यांमुळे त्वचेचे नुकसान होऊन त्वचा अधिकच खराब दिसू लागते. परंतु या थंडीच्या दिवसांत वेळीच योग्य पद्धतीने स्किन केअर रुटीन फॉलो केल्यास त्वचा निरोगी आणि नितळ राहण्यास मदत मिळू शकते. हिवाळ्यात त्वचेचे होणारे हे नुकसान टाळण्यासाठी आपण घरच्याघरीच उपलब्ध असणाऱ्या गोष्टींपासून होममेड विंटर स्पेशल क्लिअर फेसपॅक तयार करु शकतो.
बाजारातही ऋतुनुसार कित्येक प्रकारचे फेस सीरम आणि मॉइश्चराइझर उपलब्ध असतात. पण यामुळे तुमच्या त्वचेला फायदे होतीलच असे नाही. त्वचेला खोलवर पोषण तत्त्वांचा पुरवठा मिळण्यासाठी आपण काही घरगुती उपाय नक्की वापरुन पाहू शकतो. हिवाळ्यात सतत स्किनच्या होणाऱ्या अनेक समस्या आणि त्यामुळे काळवंडलेली त्वचा पुन्हा पहिल्यासारखी चमकदार, फ्रेश करण्यासाठी आपण एका खास विंटर स्पेशल क्लिअर फेसपॅकचा वापर करु शकता. हा होममेड विंटर स्पेशल क्लिअर फेसपॅक घरच्याघरीच कसा तयार करायचा ते पाहूयात.
साहित्य :-
१. खोबरेल तेल - १ टेबलस्पून
२. एलोवेरा जेल - १ टेबलस्पून
३. गुलाब पाणी - २ टेबलस्पून
४. मध - १ टेबलस्पून
कृती :-
१. सगळ्यांत आधी एका बाऊलमध्ये खोबरेल तेल घेऊन त्यात एलोवेरा जेल, गुलाब पाणी आणि मध घालावे.
२. आता हे सगळे जिन्नस एकत्रित चमच्याने मिसळून घ्यावे. चमच्याने हलवून त्याची एकजीव पेस्ट तयार करून घ्यावी.
हळदी समारंभासाठी हळद भिजवण्याची नवी ट्रिक, त्वचेची आग, जळजळ न होता - दिसेल उजळ...
हा फेसपॅक कसा वापरायचा ?
आपला होममेड विंटर स्पेशल क्लिअर फेसपॅक तयार आहे. आता हा मास्क आपण आपल्या चेहऱ्याला लावू शकता. ब्रशच्या मदतीने आपण हा फेसपॅक आपल्या चेहऱ्यावर लावू शकता. त्यानंतर ३० मिनिटे हा फेसपॅक आपल्या चेहऱ्यावर तसाच लावून ठेवावा, मग पाण्याने स्वच्छ धुवून चेहरा पुसून कोरडा करावा. आपल्याला त्वचेत बराच फरक पडलेला दिसेल.
हा फेसपॅक वापरण्याचे फायदे कोणते ?
१. खोबरेल तेल :- हिवाळ्यात त्वचेला खोबरेल तेल लावल्याने ते त्वचेला हायड्रेट आणि मॉइश्चराईज करण्यास मदत करते.
२. एलोवेरा जेल :- एलोवेरा जेलचे नैसर्गिक मॉइश्चरायझिंग गुणधर्म हिवाळ्यात त्वचेला नैसर्गिक ओलावा मिळवून देतात, ज्यामुळे त्वचा कोरडी पडत नाही. एलोवेरा जेल त्वचेचा वरचा पृष्ठभाग मऊ आणि चमकदार करते.
३. गुलाब पाणी :- गुलाबपाणी त्वचेचे नैसर्गिक पीएच संतुलन राखण्यास मदत करते. हे एक सौम्य टोनर आहे जे त्वचेला शांत करते आणि त्वचेतील आर्द्रता टिकवून ठेवते. ज्यामुळे हिवाळ्यात त्वचेसाठी गुलाब पाणी विशेषतः फायदेशीर असते.
४. मध :- मधामध्ये अँटिऑक्सिडंट असतात ज्यामुळे खराब झालेली त्वचा सुधारते आणि त्वचेवर चमक येते.