चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो (Natural Glow) कोणाला नकोय. पण सध्या धूळ, माती प्रदुषणामुळे अनेकांना स्वतःच्या स्किनची काळजी घ्यायला जमत नाही. अशावेळी स्किनच्या निगडीत समस्या वाढतात. चेहऱ्यावर पुरळ, काळे डाग, पिग्मेण्टेशन, सुरकुत्या यामुळे स्किन आणखी खराब दिसते. चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो हवा असेल तर, महागड्या प्रॉडक्ट्सचा वापर न करता नैसर्गिक उपायांना फॉलो करून पाहा. चेहऱ्यावरील समस्या सोडवण्यासाठी आपण मधाचा (Honey) वापर करू शकता. मध हे उत्तम मॉइश्चराझर म्हणून ओळखले जाते.
मधामध्ये अँटी बॅक्टेरिअल गुणधर्म असतात, ज्यामुळे चेहऱ्यावरील मुरुमांची समस्या दूर होते. शिवाय मध आणि टोमॅटो (Tomato) फेसपॅकचा वापर केल्याने चेहऱ्याला आणखी फायदा होतो. टोमॅटोमध्ये अँटीऑक्सीडेंट्स, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-फंगल गुणधर्म आढळतात. जे त्वचेसाठी फायदेशीर मानले जाते (Skin Care tips). मध आणि टोमॅटोचा फेसपॅक लावल्याने चेहऱ्यावर कोणते बदल घडतात? पाहूयात(Honey Tomato Facepack for Glowing skin).
गोल्डन ग्लोसाठी मध आणि टोमॅटोचे फायदे
मध आणि टोमॅटो फेसपॅकचा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्याने डेड स्किन, अनइवन टोन, मुरुमांचे डाग, यासह इतरही समस्या दूर होऊ शकतात. टोमॅटो आणि मध चेहऱ्याला मॉइश्चरायझ करते. शिवाय यामध्ये आढळणारे विविध प्रकारचे अँटिऑक्सिडंट्स त्वचेला चमकदार आणि डागरहित करतात.
मध आणि टोमॅटोचा फेसपॅक करण्यासाठी लागणारं साहित्य
मध
टोमॅटो
अशा पद्धतीने तयार करा फेसपॅक
सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये २ चमचे टोमॅटो पेस्ट किंवा त्याचा रस घ्या. नंतर त्यात एक चमचा मध मिसळा. नंतर फेस क्लिन करा, किंवा स्वच्छ धुवून घ्या. तयार पेस्ट चेहऱ्यावर १५ ते २० मिनिटांसाठी लावून ठेवा. १५ मिनिटानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवून घ्या. आठवड्यातून २ वेळा याचा वापर केल्याने स्किनवर नैसर्गिक ग्लो येईल, शिवाय चेहऱ्यावर कोणतेही डाग दिसणार नाही.