Join us  

बॉलिवूडस्टाइल साड्यांची यादी ताजी करणारी जान्हवी कपूरची फ्लोरल प्रिंट रोमँटिक साडी; हा साडीचा प्रकार जुना की नवा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2021 6:06 PM

जान्हवी कपूरचा एक स्टनिंग हॉट लूक (stunning and hot look) सध्या जबरदस्त व्हायरल होत आहे.... यामध्ये ती रॉ मँगो ब्रॅण्डची (raw mango saree) प्रिंटेड साडी नेसली  असून या साडीचा नेमका प्रकार कोणता अशी चर्चा या निमित्ताने रंगली आहे.

ठळक मुद्देजान्हवीच्या या साडीची किंमत अंदाचे ३५ हजार ते ४० हजार या दरम्यान असावी, अशी शक्यता आहे. 

ब्यूटी विथ फॅशन सेन्स असं जान्हवीच्या (Bollywood actress Janhvi Kapoor) बाबतीत म्हणणं अगदीच परफेक्ट ठरेल. कारण नेहमीच तिच्या ड्रेसिंग सेन्सची चर्चा सोशल मिडियावर सुरू असते. वेस्टर्न कपडे असाे किंवा मग ट्रॅडिशनल लेहेंगा, सलवार कमीज किंवा मग साडी... ती प्रत्येक प्रकारचे कपडे अत्यंत सहजतेने कॅरी करते, हे देखील तिचे एक वैशिष्ट्य. सध्या जान्हवीचे फ्लोरल प्रिंटेड साडीतले (floral printed saree) फोटो सध्या सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. ही साडी पाहून अनेकांना ९० च्या दशकातल्या बॉलीवूडच्या साड्यांची आठवण येते, असंही काही जणांचं म्हणणं आहे.. जान्हवीची साडी आणि साडीचा नेमका प्रकार आहे तरी कसा, हे जाणून घेण्याबाबत तिच्या चाहत्यांमध्ये चांगलाच उत्साह आहे. 

 

जान्हवीने तिचे हे फोटो नुकतेच इन्स्टाग्रामवर (instagram) शेअर केले आहेत. दिल्लीमध्ये (Delhi) झालेल्या एका मेहेंदीच्या कार्यक्रमासाठी तिने ही साडी नेसली होती. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत तिने “Gulabi 🌹” असं त्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. ही साडी रॉ मँगो या अतिशय गाजलेल्या ब्रॅण्डची असून सेलिब्रिटी  स्टाईलिस्ट मोहित राय (Mohit Rai) यांनी ती स्टाईल केली आहे. अतिशय तलम कपडा आणि सोनेरी रंगाचा धागा वापरून साडीवर केलेले काम ही रॉ मँगो या ब्रँडच्या साड्यांची खासियत. साडीचा पोत अतिशय तलम असल्याने ही साडी नेसणे आणि ती कॅरी करणे अतिशय आरामदायी ठरते. जान्हवीच्या या साडीची किंमत अंदाचे ३५ हजार ते ४० हजार या दरम्यान असावी, अशी शक्यता आहे. 

 

जान्हवीची साडी फ्लोरल प्रिंटेड प्रकारातली असून साडी बघूनच ती किती लाईटवेट आहे हे लक्षात येते. चमकदार मोतिया पांढऱ्या रंगाची ही साडी असून साडीवर लाल, केशरी रंगाच्या फुलांचे मोठे प्रिंट आहे. गार्डन या ब्रॅण्डच्या साड्या जशा असतात, साधारण तसाच जान्हवीच्या या साडीचा लूक आहे. या साडीवर तिने पांढरे slevesless ब्लाऊज घातले असून तिचा लूक अतिशय बोल्ड झाला आहे. साडीवर तिने दागिणेही (jwellery) अगदी विचारपुर्वक घातले आहे. ब्लॅकिश सिल्व्हर मेटालिक प्रकारतल्या बांगड्या आणि कानातले तिने घातले असून काळी टिकली तिचा लूक कम्प्लिट करणारी ठरली आहे.  

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सफॅशनजान्हवी कपूरसेलिब्रिटी