Join us  

केसांच्या अनेक समस्यांवर एक असरदार उत्तम उपाय - 'पोटली मसाज', करुन पाहा केसांच्या तक्रारीच संपतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2024 12:25 PM

Potli hair massage for long strong healthy straight hair : केसांना मसाज केल्याने त्यांना आतून पोषण मिळतेच शिवाय केसांच्या अनेक समस्या देखील दूर होतात, 'पोटली मसाज' एक सोपा उपाय...

आपले केस लांबसडक, काळेभोर, घनदाट असावेत अशी प्रत्येक महिलेची इच्छा असते. केसांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून आपण त्यांची अधिकाधिक काळजी घेतो. केस सुंदर दिसावेत म्हणून फक्त शॅम्पू आणि कंडिशनर करून चालत नाही, तर मसाज देखील महत्वाचा असतो. केसांना व स्कॅल्पला मसाज करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या तेलांचा वापर करतो. केसांना मसाज (Head Massage) केल्याने त्यांना आतून पोषण मिळतेच शिवाय केसांच्या अनेक समस्या देखील दूर होतात(Hot Potli Massage).

केसगळती, अकाली केस पांढरे होणे, केस पातळ होणे अशा केसांच्या अनेक समस्यांवर मसाज हा उत्तम पर्याय आहे. केसांना फक्त तेलानेच मसाज केला जातो असे नाही तर, इतर नैसर्गिक गोष्टींचा देखील वापर करू शकतो. सध्या 'पोटली मसाज' हा मसाजचा एक नवीन प्रकार खूप ट्रेंडिंग होत आहे. केसांसाठीच्या या पोटली मसाजमध्ये वेगवेगळ्या नैसर्गिक गोष्टींचा वापर केला जातो. घरच्या घरी केसांना पोटली मसाज कसा करावा याची सोपी पद्धत जाणून घेऊयात(Potli hair massage for long strong healthy straight hair).

साहित्य :- 

१. तमालपत्र - १ ते २ पान २. दालचिनी - २ लहान काड्या ३. लवंग - १० ते १५ ४. मेथी दाणे - १ टेबलस्पून ५. कलौंजी - १ टेबलस्पून 

कृती :- 

१. सर्वप्रथम एक कॉटनचा छोटासा रुमाल घेऊन त्यात तमालपत्र, दालचिनी, लवंग, मेथी दाणे, कलौंजी असे सर्व साहित्य घेऊन त्याची एक छोटीशी पोटली बनवावी. २. आता गॅसच्या मंद आचेवर तवा ठेवून तो व्यवस्थित गरम करून घ्यावा. ३. तवा गरम झाल्यावर ही पोटली त्यावर हलकेच ठेवून गरम करून घ्यावी. ४. गरम झालेली पोटली घेऊन केसांच्या मुळांवर ठेवून हलकेच दाब देत केसांच्या मुळांना मसाज करुन घ्यावा. ५. आपल्या स्कॅल्पला सोसवेल इतकी पोटली गरम करून घ्यावी.  

पोटली मसाज करण्याची योग्य पद्धत :-

१. केस कंगव्याने व्यवस्थित विंचरुन केसांतील गुंता काढून घ्यावा. २. त्यानंतर बरोबर मधोमध भांग पाडून केसांचे दोन भागांत विभाजन करुन घ्यावे. ३. आता केसांच्या छोट्या - छोट्या बटा हाताने उचलून गरम केलेल्या पोटलीने केसांच्या मुळांशी मसाज करुन घ्यावा.  केसांना पोटली मसाज करण्याचे फायदे :- 

१. मोठ्या प्रमाणावर केसांची वाढ होण्यास मदत मिळते. २. डोकेदुखीच्या समस्येपासून आराम मिळतो. ३. स्कॅल्पचे रक्ताभिसरण चांगल्या पद्धतीने होते.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी