Lokmat Sakhi >Beauty > हॉट टॉवेल स्क्रब हा फॉर्म्युला वापरुन पहा, हो जा स्कीन फ्रेश !

हॉट टॉवेल स्क्रब हा फॉर्म्युला वापरुन पहा, हो जा स्कीन फ्रेश !

हॉट टॉवेल स्क्रबमूळे त्वचेवरील व्हाइट हेडस, ब्लॅक हेडस या समस्या सहजपणे दूर होतात. तसेच त्वचेची रंध्र मोकळी होतात. यामुळे आपली त्वचा दीर्घकाळपर्यंत निरोगी राहाते. उन्हाळ्यात त्वचेवर येणारा ताण आणि थकवाही यामुळे दूर होतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 06:08 PM2021-05-27T18:08:27+5:302021-05-27T18:51:56+5:30

हॉट टॉवेल स्क्रबमूळे त्वचेवरील व्हाइट हेडस, ब्लॅक हेडस या समस्या सहजपणे दूर होतात. तसेच त्वचेची रंध्र मोकळी होतात. यामुळे आपली त्वचा दीर्घकाळपर्यंत निरोगी राहाते. उन्हाळ्यात त्वचेवर येणारा ताण आणि थकवाही यामुळे दूर होतो.

Hot Towel Scrub is an easy way to clean and smooth skin at home! | हॉट टॉवेल स्क्रब हा फॉर्म्युला वापरुन पहा, हो जा स्कीन फ्रेश !

हॉट टॉवेल स्क्रब हा फॉर्म्युला वापरुन पहा, हो जा स्कीन फ्रेश !

Highlights स्नायुंवर आलेला ताण कमी करण्यास हॉट टॉवेल स्क्रबचा खूप उपयोग होतो. हॉट टॉवेल स्क्रबमुळे त्वचेतील विषारी घटक बाहेर पडतात.हॉट टॉवेल स्क्रब हा घरच्याघरी करता येणारा उपाय असला तरी गरम पाण्यानं त्वचा पोळली जाणार नाही यासाठी तो खूप काळजीपूर्वक करावा लागतो .


 उन्हाळ्याच्या काळात त्वचेला उन्हाचा चटका आणि बाहेरचं प्रदूषण अशा दोन्ही गोष्टींचा सामना करावा लागतो. यातून उद्भभवणाऱ्या समस्यांवर रसायनयुक्त सौंदर्य उत्पादनं तात्काळ उपाय करतात. पण या उपायांनी लाभ कमी आणि तोटे जास्त अशी परिस्थिती होते. त्वचेवर सतत रसायनयुक्त सौंदर्य उप्तादनांचा मारा केल्यानं त्वचा खराब होते, थकते. त्वचेच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी वेगवेगळे सौंदर्य उत्पादन वापरण्याऐवजी एकच उपाय करुन अनेक समस्या सोडवता येऊ शकतात. आणि तेही घरच्या घरी. त्यासाठीच गरम रुमालाचा स्क्रब हा उपाय करुन पाहायला हवा. यालाच हॉट टॉवेल स्क्रब असंही म्हणतात.
 हॉट टॉवेल स्क्रबमुळे त्वचेवरील व्हाइट हेडस, ब्लॅक हेडस या समस्या सहजपणे दूर होतात. तसेच त्वचेची रंध्र मोकळी होतात. यामुळे आपली त्वचा दीर्घकाळपर्यंत निरोगी राहाते. उन्हाळ्यात त्वचेवर येणारा ताण आणि थकवाही यामुळे दूर होतो.


 
हॉट टॉवेल स्क्रबचे फायदे
- हॉट टॉवेल स्क्रबमुळे रक्तप्रवाह सुधारतो. शरीरात ऊर्जा येते. हा उपाय सकाळी केल्यास दिवसभर काम करण्यास ऊर्जा मिळते. मूड छान राहतो.

- शरीरावरील ताण घालवण्यासाठी, थकवा दूर करण्यासाठी हा उपाय खूपच परिणामकारक आहे. स्क्रब करण्याच्या प्रक्रियेदरम्यान शरीर आणि मनाला ताजेपणा वाटतो. आराम मिळतो. त्यामुळे साहजिकच शरीर आणि मनाला आलेला थकवा या उपायानं जातो. आठवड्यातून दोनदा हा उपाय केल्यास जास्त परिणामकारक ठरतो.

- स्नायूंवर आलेला ताण कमी करण्यास हॉट टॉवेल स्क्रबचा खूप उपयोग होतो. आखडलेले स्नायू यामुळे मोकळे होतात.  स्नायुशी संबधित इतर समस्या दूर होतात. खेळाडू स्नायुंवर आलेला ताण घालवण्यासाठी हा उपाय नियमित करतात.

- त्वचा चांगली राहाण्यासाठी शरीरातील, त्वचेतील विषारी घटक बाहेर पडणं अत्यंत आवश्यक असतं. हॉट टॉवेल स्क्रबमुळे त्वचेतील विषारी घटक बाहेर पडतात. शिवाय त्वचेवरच्या मृत पेशी निघून जातात. नवीन पेशी निर्माण होण्यासाठी हा उपाय चालना देतो.

- व्यायाम आणि आहार यातून रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते. पण हॉट टॉवेल स्क्रब हा सौंदर्योपचारही रक्तप्रवाह सुधारतो. या उपायानं शारीरिक आणि मानसिक ऊर्जाही वाढते.

- हॉट टॉवेल स्क्रब हा घरच्याघरी करता येणारा उपाय असला तरी गरम पाण्यानं त्वचा पोळली जाणार नाही यासाठी तो खूप काळजीपूर्वक करावा लागतो . सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यासाठी सुती कापडाच्या रुमालाचाच उपयोग करावा. आणि पाणी शरीराला सोसवेल इतकंच गरम असायला हवं.

हॉट टॉवेल स्क्रब कसं करावं?
 हॉट टॉवेल स्क्रब हा एक सौंदर्योपचार आहे. यासाठी खूप साधन सामग्रीची गरज नसते. फक्त एक सुती कापडाचा रुमाल आणि गरम पाणी एवढंच आवश्यक असतं. स्क्रबसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छ धुतलेला रुमालच वापरावा. रुमाल गरम पाण्यात भिजवावा. थोडासा पिळून घ्यावा. आणि आपल्या शरीरावर तो गोलाकार फिरवावा. यामुळे आपल्या त्वचेवरील मृत पेशी निघून जातात. शिवाय त्वचेची रंध्र, पेशी यावरही याचा सकारात्मक परिणाम होतो. 

Web Title: Hot Towel Scrub is an easy way to clean and smooth skin at home!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.