Lokmat Sakhi >Beauty > थंड की गरम कोणत्या पाण्याने केस धुतले तर केस गळणे थांबेल? केस धुण्याची योग्य पद्धत कोणती?

थंड की गरम कोणत्या पाण्याने केस धुतले तर केस गळणे थांबेल? केस धुण्याची योग्य पद्धत कोणती?

Hot v/s cold: What's the best temperature to wash your hair? केस धुतल्यानंतर फार गळतात - निर्जीव दिसतात? केस धुण्यासाठी कोणते पाणी वापरावे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2023 04:18 PM2023-07-30T16:18:50+5:302023-07-30T16:20:06+5:30

Hot v/s cold: What's the best temperature to wash your hair? केस धुतल्यानंतर फार गळतात - निर्जीव दिसतात? केस धुण्यासाठी कोणते पाणी वापरावे?

Hot v/s cold: What's the best temperature to wash your hair? | थंड की गरम कोणत्या पाण्याने केस धुतले तर केस गळणे थांबेल? केस धुण्याची योग्य पद्धत कोणती?

थंड की गरम कोणत्या पाण्याने केस धुतले तर केस गळणे थांबेल? केस धुण्याची योग्य पद्धत कोणती?

केसांमुळे चेहऱ्याची शोभा वाढते. प्रत्येकजण आपल्या केसांची काळजी घेतो. केस स्वच्छ निरोगी ठेवण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो. काही लोकं महागडे प्रॉडक्ट्स तर काही नैसर्गिक उपायांना फॉलो करतात. परंतु, अनेक उपाय करूनही केस गळती, केसात कोंडा, केस अकाली पांढरे होणे या समस्या निर्माण होतात.

अनेकदा केस कोणत्या पाण्याने धुवावे? हा देखील प्रश्न पडतो. थंड की गरम? कोणत्या पाण्याने केस धुतल्याने याचा फायदा होतो? काही वेळेला केस धुतल्यानंतर जास्त गळतात, असे का होते? दरम्यान, केस गळू नये म्हणून कोणत्या पाण्याने हेअर वॉश करावा हे पाहूयात(Hot v/s cold: What's the best temperature to wash your hair?).

गरम पाण्याने केस धुण्याचे फायदे - तोटे

१. कोमट पाण्याने केस धुतल्याने डोक्यातील कोंडामुळे बंद झालेली छिद्रे उघडतात. यामुळे तेलाचे सर्व गुणधर्म स्काल्पला मिळतात. ज्यामुळे केस मजबूत होतात. याशिवाय कोमट पाण्याने केस धुतल्याने स्काल्पवरील घाण निघून जाते.

१ चमचा तूप बदलून टाकेल तुमचं रुप, मऊ -नितळ त्वचा-चेहऱ्यावर चमक हवी तर करा तुपाचे ३ उपयोग

२. मात्र, कोमट पाण्याने केस धुतल्याने केस कोरडे आणि फ्रिजी दिसतात. याशिवाय कोमट पाणी नैसर्गिक तेल आणि ओलावा काढून टाकते, ज्यामुळे केस निर्जीव दिसतात.

थंड पाण्याने केस धुण्याचे फायदे - तोटे

१. थंड पाणी केसांचे नैसर्गिक तेल वेगळे होऊ देत नाही, ज्यामुळे टाळू हायड्रेटेड राहते. याशिवाय थंड पाण्याने छिद्रही बंद होतात, त्यामुळे बाहेरील घाण आणि ऍक्सेस ऑइल टाळूच्या आत जात नाही. कारण उघड्या छिद्रांमध्ये बाहेरील प्रदूषण, धूळ आणि घाण जाण्याचा धोका जास्त असतो. ज्यामुळे केस अधिक गळतात.

व्हिटामिन ई केसांना नक्की कसे लावायचे? पाहा २ व्हिटामिन ई कॅप्सुल केसांवर काय कमाल करतात...

२. थंड पाण्याने केस धुतल्याने केसांची वॉल्यूम कमी होते. स्काल्पवर ऍक्सेस ऑइल तसेच राहते. ज्यामुळे त्यांची वॉल्यूम कमी होते.

परफेक्ट केसांसाठी या पद्धतीने धुवा केस

सुरुवातीला कोमट पाण्याने केस धुवा. टाळूवरील साचलेली घाण आणि ऍक्सेस ऑइल  काढून टाकण्यासाठी शॅम्पूने स्काल्पवर हलक्या हाताने मसाज करा. नंतर कोमट पाण्याने केस धुवा, मग कंडिशनर लावा. पाच मिनिटांनंतर, केस थंड पाण्याने स्वच्छ धुवा.

Web Title: Hot v/s cold: What's the best temperature to wash your hair?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.