आजकाल फक्त वृद्धच नाही तर तरूण मुलींमध्येही केस पांढरे होण्याची समस्या दिसून येते. आपले केस पांढरे व्हावेत असे कोणालाच वाटत नाही. जर तुमचे केस पांढरे होऊ लागले असतील तर तुम्ही हर्बल आणि अतिशय सोप्या पद्धतीने तुमचे केस पांढरे होण्यापासून थांबवू शकता. या पद्धतीने बराच वेळ शॅम्पू केल्यानंतर, तुमच्या केसांचा नैसर्गिकरित्या रंग परत येण्यास मदत होईल. (How to black white hair )
शॅम्पू करताना त्यात औषधी वनस्पती असलेले पाणी मिसळले तर केस पांढरे होण्याची संख्या कमी होण्यास मदत होईल. हे पाणी तुम्ही घरी सहज बनवू शकता आणि ते बनवण्यासाठी तुम्हाला या गोष्टींची गरज आहे. 2 टीस्पून चहाची पाने, 2 टीस्पून मेथी दाणे, २ टीस्पून आवळा पावडर. (Home Remedies for black white hairs)
कृती
तुम्ही एका भांड्यात अर्धा लिटर पाणी घेऊन गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा. आता या पाण्यात २ चमचे चहाची पाने, २ चमचे आवळा पावडर आणि २ चमचे मेथीदाणे टाका. हे पाणी अर्धे होईपर्यंत मंद आचेवर उकळवा. पाणी उकळल्यानंतर गॅस बंद करा आणि हे पाणी थंड होण्यासाठी ठेवा. ते थंड झाल्यावर गाळून घ्या आणि काचेच्या किंवा प्लास्टिकच्या भांड्यात भरून फ्रीजमध्ये ठेवा. हे पाणी तुम्ही १५ दिवस वापरू शकता.
चेहरा तेलकट, मानेवर काळपटपणा आलाय? ग्लोईंग त्वचेसाठी घरीच फक्त १० मिनिटात असं करा फेशियल
या पद्धतीनं उपयोग करा
जेव्हाही शॅम्पू करायचा असेल तेव्हा बाटलीतून शॅम्पू काढून थेट केसांना लावू नका. त्यापेक्षा भांड्यात काढा. एका भांड्यात तुम्ही जितका शॅम्पू वापरता तितका शॅम्पू फ्रीजमधून बाहेर काढल्यानंतर त्यात अर्धा कप औषधी वनस्पतींचे पाणी घाला आणि नंतर शॅम्पू करा. या पाण्याचा प्रभाव काही आठवड्यांतच तुमच्या केसांवर दिसून येईल.
बाहेर जाताना मेकअप नाही पण रोज पावडर लावता? 'या' ५ चुकांमुळे तुम्ही वयापेक्षा १० वर्ष म्हातारं दिसाल
जर तुम्ही आठवड्यातून तीनदा शॅम्पू करत असाल तर हे पाणी नेहमी वापरा. म्हणजेच, तुम्हाला या पद्धतीनेच शॅम्पू करावे लागेल. असे नियमित केल्याने तुमचे केस गळणे देखील थांबेल आणि पांढऱ्या केसांचा नैसर्गिक रंग परत येण्यास मदत होईल.
याशिवाय डोक्यात पांढरे केस दिसू लागताच चहा, कॉफी, सॉफ्ट ड्रिंग असे कॅफिनयुक्त पदार्थ कमी करा. ॲण्टीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतील अशी फळे आणि फॉलिक ॲसिड मुबलक असेल अशा भाज्या भरपूर खा. ग्रीन टी घेत जा.