Lokmat Sakhi >Beauty > डाय न लावता पांढरे केस करा काळे; नारळाच्या तेलात हा पदार्थ घालून लावा, आठवड्याभरात केस काळे होतील

डाय न लावता पांढरे केस करा काळे; नारळाच्या तेलात हा पदार्थ घालून लावा, आठवड्याभरात केस काळे होतील

How Blacken Grey Hairs (Kes Kale Karnyache Upay) : कमी वयातच केस पांढरे होत असतील तर तुम्ही केस काळे करण्यासाठी घरगुती उपाय करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2024 11:59 AM2024-09-15T11:59:14+5:302024-09-15T12:15:59+5:30

How Blacken Grey Hairs (Kes Kale Karnyache Upay) : कमी वयातच केस पांढरे होत असतील तर तुम्ही केस काळे करण्यासाठी घरगुती उपाय करू शकता.

How Blacken Grey Hairs : Add These 3 Ingredients In Coconut Oil to Get Long And Shiny Hairs | डाय न लावता पांढरे केस करा काळे; नारळाच्या तेलात हा पदार्थ घालून लावा, आठवड्याभरात केस काळे होतील

डाय न लावता पांढरे केस करा काळे; नारळाच्या तेलात हा पदार्थ घालून लावा, आठवड्याभरात केस काळे होतील

केस पांढरे होणं (Grey  Hairs) हे खूपच कॉमन आहे. केस पांढरे होऊ नयेत यासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करू शकता. चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी, खाण्यापिण्यात अनियमिततात, प्रदूषण, चुकीची लाईफस्टाईल यामुळे केस पांढरे होण्याची समस्या उद्भवते. (How to Blacken Grey Hairs) बाजारात बरेच केमिकल्सयुक्त उत्पादनं असतात ज्यामुळे केसांचे नुकसानही होते कारण यात केमिकल्स असतात ज्याचा केसांच्या वाढीवर आणि केसांच्या रंगावर परिणाम होतो. कमी वयातच केस पांढरे होत असतील तर तुम्ही केस काळे करण्यासाठी घरगुती उपाय करू शकता. ( Add These 3 Ingredients In Coconut Oil to Get Long And Shiny Hairs)

नारळाच्या तेलात एक नैसर्गिक घटक असतो जो केसांच्या आरोग्यासाठी उत्तम ठरतो. यात एंटीऑक्सिडेंट्स, फॅटी एसिड्स असतात. ज्यामुळे केसांना पोषण मिळते आणि स्काल्प मजबूत होण्यास मदत होते. जर नारळाच्या तेलात काही पदार्थ मिसळून केसांना लावले तर पांढऱ्या केसांपासून सुरक्षा मिळवता येते.  काही पदार्थ नारळाच्या तेलात शिजवून मग केसांना लावल्यास केस काळेभोर आणि दाट होण्यास मदत होते. 

केस काळे करण्यासाठी नारळाच्या तेलात काय मिसळावे?

1) आवळा

आवळा व्हिटामीन सी आणि एंटीऑक्सिडेंट्सचा चांगला स्त्रोत आहे. जो केसांसाठी फायदेशीर ठरतो. ज्यामुळे केस मजबूत होतात आणि पांढरे केस काळे होण्यास मदत होते.  सुक्या आवळ्याचे तुकडे नारळाच्या तेलात घालून हे मिश्रण मंच आचेवर शिजवून घ्या. जोपर्यंत आवळा काळा होत नाही तोपर्यंत हे मिश्रण शिजवा. त्यानंतर तेल गाळून थंड करून घ्या आठवड्यातून २ ते ३ वेळा हा उपाय केल्यास केसांवर चांगला परिणाम दिसून येईल.

2) कढीपत्ता

 कढीपत्त्यात व्हिटामीन बी, ए आणि ई असते, ज्यामुळे केसांतील पिग्मेंटेशनला रिजनरेट करण्यास मदत होते. ज्यामुळे केस गळणं कमी होतं आणि केस वेळेआधीच पांढरे होऊ लागता.  कढीपत्ता नारळाच्या तेलात घालून हे तेल शिजवून घ्या.  जोपर्यंत तेल काळे होत नाही तोपर्यंत शिजवा. थंड झाल्यानंतर केसांच्या मुळांना हे तेल लावा काही तास मालिश केल्यानंतर केस स्वच्छ धुवा. 

3) मेथीचे दाणे

मेथीच्या बीयांमध्ये प्रोटीन आणि निकोटिनिक एसिड मोठ्या प्रमाणात असते ज्यामुळे केसांच्या वाढीस चालना मिळते आणि पांढरे केस काळे होण्यास मदत होते. एक चमचा मेथीच्या बीयांना नारळाच्या तेलात मिसळून लावा आणि मंच आचेवर शिजू द्या त्यानंतर या बिया हलक्या पिवळसर होईपर्यंत शिजवून घ्या. नंतर केसांना लावून  केस स्वच्छ धुवून घ्या.

वरण-भातावर 'हा' पदार्थ घालून खा; रोजचं साधं वरण होईल अमृतासमान, थकवा-कमजोरी होईल दूर
 
4) भृंगराज

 रिसर्चनुसार भृंगराजला आयुर्वेदात केसांच्या सर्व समस्यांवर रामबाण उपाय मानले जाते. ज्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते केस मजबूत होतात आणि पांढरे केस काळे होण्यास मदत होते.  भृंगराजची पानं नारळाच्या तेलात शिजवून घ्या (Ref). नंतर हे तेल थंड करून केसांच्या मुळांना लावून मालिश करा नियमित या तेलानं मसाज केल्यास केसांच्या समस्या हळूहळू कमी होत जातात. 

केसांची शेपटी झाली? मोहोरीच्या तेलात हा पदार्थ मिसळून केसांना लावा; दाट-लांबसडक होतील केस

5) कांद्याचा रस

 कांद्याच्या रसात सल्फरचे प्रमाण अधिक असते ज्यामुळे केसांची रोमछिद्र उत्तेजित होतात आणि केस पिग्मेंटेड होत नाहीत. कांद्याचा रस काढून त्यात नारळाचा रस मिसळा  नंतर हे मिश्रण केसांच्या मुळांना लावा नंतर काही तासांनी केस स्वच्छ धुवा. आठवड्यातून २ वेळा याचा वापर केल्यास केस काळे होण्यास मदत होईल. 

पांढऱ्या केसांना काळे करण्यासाठी तुम्ही नैसर्गिक उपाय करू शकता ज्यामुळे फक्त केसांचा रंग सुधारत नाही तर केस काळे आणि दाट होण्यासही मदत होते. नारळाच्या तेलात हे पदार्थ शिजवून केसांना लावल्यानं केस दीर्घकाळ काळे राहण्यास मदत होते. नियमित हा उपाय केल्यानं केसांच्या इतर समस्या उद्भवत नाहीत.

Web Title: How Blacken Grey Hairs : Add These 3 Ingredients In Coconut Oil to Get Long And Shiny Hairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.