सणवार आल्यानंतर सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरते (Beauty Tips). लवकरच घरोघरी बाप्पाचे आगमन होईल. गणपती बाप्पा मोरया म्हणत सर्वत्र एकच जल्लोष पाहायला मिळेल. गणरायाच्या आगमनानंतर लोकांमध्ये उत्साह निर्माण होतो (Ganesh Chaturthi 2024). या दिवसांत मात्र महिलावर्गाची वेगळीच गडबड पाहायला मिळते (Skin care Tips). स्वयंपाक, पूजा, मोदक, बाप्पाची आराधना. या सगळ्या गोष्टी करण्यात त्यांना स्वतःसाठी वेळ देता येत नाही. स्वतःकडे लक्ष देता येत नाही.
मग ऐनवेळी महिलावर्ग ब्यूटी पार्लरमध्ये धाव घेतात. यामुळे हवा तसा तेज चेहऱ्यावर दिसून येत नाही. जर आपल्याला ब्यूटी पार्लरमध्ये न जाता, घरातच फेशिअल करायचं असेल तर, काही घरगुती साहित्यांचा या पद्धतीने वापर करून पाहा. अगदी काही मिनिटात चेहऱ्यावर सोनेरी गलो येईल. शिवाय चारचौघात तुमचाच चेहरा चमकेल(How Can I Do a Natural Facial at Home? 2 Steps; This Ganesh chaturthi get Instant Glow).
पहिली स्टेप
क्लिन्झर आणि स्क्रब
लागणारं साहित्य
टोमॅटो
हळद
मध
- चेहरा स्क्रब आणि स्वच्छ करण्यासाठी, प्रथम १ टोमॅटो घ्या आणि मध्यभागी कापून घ्या.
- नंतर त्यावर हळद आणि मध टाका.
- टोमॅटो थेट चेहऱ्यावर ठेवून चांगले स्क्रब करा.
बैठ्या कामामुळे पोट नुसतं सुटलंय? जेवल्यानंतर १० मिनिटे 'ही' गोष्ट करा; लवकरच पोट सपाट
- त्यानंतर चेहऱ्याला ५ मिनिटे मसाज करा.
- शेवटी चेहरा धुवा.
फायदे
हळद
हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी घटक असतात. या गुणधर्मामुळे चेहऱ्यावर चमक येते. त्वचेसाठी हळदीचा एक प्रमुख फायदा म्हणजे कोलेजन उत्पादन वाढवण्याची क्षमता आहे.
मध
त्वचेसाठी मधाचे अनेक फायदे आहेत. यात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आहे. ज्यामुळे मुरूम, पिंपल्सचे डाग नष्ट होतात.
दुसरी स्टेप
फेशिअल
लागणारं साहित्य
मसूर डाळ
संत्र्याच्या सालीची पावडर
वाढीच्या वयात मुलं फिट व्हावी असं वाटत असेल तर खाऊ घाला ५ पदार्थ, आजीपणजीच्या काळातला सोपा उपाय
टोमॅटो प्युरी
दही
- फेस पॅक बनवण्यासाठी सर्व साहित्य एका भांड्यात घ्या.
- नंतर ते चांगले मिसळा.
- तयार पेस्ट चेहऱ्यावर लावा, आणि कोरडे होईपर्यंत ठेवा.
- यानंतर हलक्या हातांनी स्क्रब करून चेहरा स्वच्छ करा.
फायदे
मसूर डाळ
एक उत्कृष्ट नैसर्गिक एक्सफोलिएटर म्हणून मसूर डाळीचा वापर होतो. मसूर डाळ डेड स्कीन काढून टाकण्यास मदत करते. ज्यामुळे त्वचा चमकते. मसूर डाळ एक उत्कृष्ट क्लिन्झर म्हणूनही कार्य करते. चेहऱ्यावर याच्या नियमित वापरामुळे ब्लॅकहेड्स आणि मुरुमांवरील डाग दूर होतात.
संत्र्याच्या सालीची पावडर
संत्र्याच्या सालीच्या पावडरमुळे त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो. यात अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. ज्यामुळे त्वचा क्लीन होते. याचा वापर आपण फेस पॅक आणि स्क्रबसाठी करू शकता.