चेहऱ्यावरील नको असलेले केस काढण्यासाठी आपण दर आठवड्याला पार्लरला जातो (Beauty Tips). चेहऱ्यावरचे केस काढणे म्हणजे खूप वेदनादायक (Threading). हे केस काढण्यासाठी महिला पार्लरमध्ये जाऊन थ्रेडिंग किंवा वॅक्सिंगची या प्रक्रियांची मदत घेतात. चेहऱ्यावरील ते केस काढण्यासाठी अनेक उत्पादने बाजारातही उपलब्ध आहेत (Facial Hairs).
मात्र, अशा उत्पादनांमध्ये काही रसायने असतात जी त्वचेसाठी घातक ठरतात. ज्यामुळे त्वचेला हानीही पोहचू शकते. अशावेळी चेहऱ्यावरचे नैसर्गिक केस नैसर्गिक पद्धतीने दूर करा. या घरगुती उपायांच्या मदतीने आपण मिनिटात त्वचेवरचे केस काढू शकता. शिवाय पार्लरमध्ये जाऊन पैसे खर्च करण्याचीही गरज नाही(How Can I Remove Facial Hair Permanently at Home? Use homemade remedy).
चेहऱ्यावरचे नको असलेले काढण्यासाठी उपाय
- चेहऱ्यावरचे नको असलेले काढण्यासाठी एका बाऊलमध्ये २ चमचे बेसन घ्या. त्यात एक चमचा हळद, २ चमचे दूध किंवा दही, १ चमचा मध आणि अर्धा चमचा लिंबाचा रस घालून मिक्स करा.
दिवसभरात फक्त 'एवढी'च पावलं चाला, वजन कमी होणारच- हृदयही राहील निरोगी -दिसाल फिट
- तयार पेस्ट संपूर्ण चेहरा किंवा नको असलेल्या केसांवर लावा. २० ते २५ मिनिटांसाठी तसेच ठेवा. २५ मिनिटांनंतर ओल्या कापडाने चेहरा स्वच्छ पुसून घ्या.
- आपण या पेस्टचा वापर आठवड्यातून २ वेळा वापरू शकता.
- आपण दुसरीही पेस्ट तयार करू शकता. एका बाऊलमध्ये दोन चमचे दूध घ्या. त्यात चिमुटभर हळद, खोबरेल तेल आणि एक चमचा साखर घालून मिक्स करा. गॅसवर २ मिनिटांसाठी बाऊल ठेवा.
ऐन तारुण्यात पायऱ्या चढताना दम लागतो - श्वास फुलतो? ५ गोष्टी; दम लागणं बंद - ताकद वाढेल
- अंतर त्यात गव्हाचं पीठ आणि बेसन घालून मिक्स करा. त्यात पेस्ट १५ मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावून ठेवा. पेस्ट सुकल्यावर हात ओले करून चेहऱ्यावर मसाज करून पेस्ट काढा. यानंतर चेहरा पाण्याने धुवा.
- आठवड्यातून एकदा या उपायाला फॉलो केल्याने नको असलेल्या केसांपासून सुटका होऊ शकते.