Join us  

कंगवा फिरवताच फरशीवर केसच केस? 'या' भाजीच्या रसाचा करा वापर; पांढरे केसही होतील गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2024 2:47 PM

How Can Onion Juice Improve Your Hair : कांद्याच्या रसाचे अनेक फायदे; त्वचा आणि केसांचे सौंदर्य वाढवते..

कांदा हा आपल्या आहारातील महत्वाचा भाग मानला जातो (Hair Care Tips). भाजीची चव असो किंवा फोडणी. प्रत्येक गोष्टीत कांदा लागतो. काही लोक अन्नासोबत कच्चा कांदा खातात (Onion for Hairs). किंवा सॅलडमध्ये मिक्स करतात. पण कांदा फक्त जेवणाची चव वाढवत नसून, आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. शिवाय सौंदर्य वाढवण्यासाठीही मदत करते. आपण ऐकलं असेल की, केसांवर कांद्याचा रस लावल्याने केसांची वाढ होते. शिवाय चेहऱ्यावरही ग्लो येतो. पण खरंच कांद्याच्या रसाचा वापर केल्याने केस वाढतात का? केसांची समस्या सुटते का?(How Can Onion Juice Improve Your Hair).

केसांसाठी कांद्याच्या रसाचे फायदे

आजकाल प्रत्येक जण केस गळतीच्या समस्येने त्रस्त आहे. मुख्य म्हणजे तरुणांनाही टक्कल पडणे आणि केस अकाली पांढरे होण्याची समस्या आहे. यामागे अनेक कारणे असू शकतात. ज्यात पौष्टीक आहार न खाणे, केसांची योग्य काळजी न घेणे, प्रदूषित वातावरण यांचा समावेश आहे. या सर्व समस्यांवर कांद्याच्या रसाचा वापर प्रभावी ठरू शकतो.

केसांच्या वाढीसाठी कांद्याचा रस

लेक रात्रभर जागवते, झोपच पूर्ण होत नाही कारण..! प्रियांका चोप्रा सांगते आई झाल्यानंतर बदललेलं झोपेचं चक्र

कांद्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. जे आपल्या केसांच्या वाढीसाठी मदत करते. यामध्ये असलेले सल्फर केसांना जाड आणि चमकदार बनवते. शिवाय स्काल्पमधील रक्ताभिसरणही वाढवते. ज्यामुळे केस मजबूत होतात.

कांद्याच्या रसाचा वापर केसांवर कसा करावा?

- कांद्याच्या रसाचा वापर आपण टाळूवर थेट करू शकता. यासाठी स्काल्पवर कांद्याचा रस लावा. १५ मिनिटे तसेच राहूद्या. नंतर कोमट पाण्याने केस स्वच्छ धुवा. केसांमधला कांद्याचा वास दूर करण्यासाठी शाम्पूचा वापर करा.

विशीतच वजन वाढले-हाडांचीही समस्या छळते? 'या' तेलात शिजवा अन्न; पन्नाशीतही राहाल फिट

पांढऱ्या केसांवर करा कांद्याच्या रसाचा वापर

केस अकाली पांढरे होऊ नये म्हणून आपण कांद्याच्या रसाचा वापर करू शकता. कांद्यामध्ये कॅटालेज नावाचे एन्झाइम आढळते, जे केस पांढरे होण्यापासून रोखते. ज्यामुळे केस मुळापासून काळे होतात. केस काळे करण्यासाठी कांद्याचा वापर हेअर पॅक म्हणून केला जाऊ शकतो. किंवा कांद्याच्या रसात मध मिसळून स्काल्पवर लावा. यामुळे केसांची योग्य वाढ होईल.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्सकांदा