Join us  

How To Prevent White Hair : कमी वयातच केस खूप पांढरे व्हायला लागले? फक्त ४ सवयी सोडा, कायम काळेभोर राहतील केस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2022 11:42 AM

How To Prevent White Hair : केसांच्या आणि शरीराच्या एकूण आरोग्यासाठी शरीर सक्रिय असणं खूप गरजेचं आहे, तुम्हाला आळस सोडावा लागेल, तरच तुम्ही पांढऱ्या केसांसह अनेक समस्या टाळू शकता.

एक काळ असा होता की डोके पांढरे होणे म्हणजे तुम्ही म्हातारपणाच्या उंबरठ्यावर उभे आहात, परंतु आजच्या काळात 25 ते 30 वर्ष वयाच्या तरुणांनाही केस पिकण्याचा त्रास होत आहे. अनेकदा टेन्शन, लाजिरवाणेपणा येतोआणि कमी आत्मविश्वासाचा सामना करावा लागतो. अशा स्थितीत लोक रासायनयुक्त हेअर डाईने पांढरे केस काळे करण्याचा प्रयत्न करतात पण त्यामुळे केसांचे नुकसान होऊ शकते. (How To Prevent White Hair) जर तुमचे केस किशोरवयात किंवा 25 वर्षे ओलांडल्यानंतर पांढरे होऊ लागले असतील तर हा लेख तुम्हाला खूप मदत करू शकतो. पांढऱ्या केसांची वाढ थांबवण्यासाठी काही वाईट सवयी सोडल्या पाहिजेत. (Reason for premature white hair at early age 25 years smoking drinking diet tension stress workout)

1) अन्हेल्दी डाएट 

तरुण वयातील लोकांना त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेता येत नाही. त्यांना अनेकदा बाजारातून आणलेले फाजंक फूड खायला आवडते. त्यामध्ये तेलाचे प्रमाण खूप जास्त असते, यामुळे तुमचे कोलेस्ट्रॉल, रक्तातील साखरेची पातळी वाढून  संतुलन बिघडते. त्यामुळे केसांचे आरोग्यही बिघडते. तुमच्या आहारात कॅल्शियम, जस्त, लोह, तांबे, प्रथिने, जीवनसत्त्वे यासारख्या पोषक घटकांना प्राधान्य द्या.

2) गरजेपेक्षा जास्त टेंशन घेणं

हल्ली लहानपणापासूनच चांगला अभ्यास करून चांगली नोकरी करण्याचे दडपण असते. त्यामुळे ताणतणाव होणे साहजिकच असते, अनेक लोक अशा प्रकारच्या तणावाचा सामना करू शकत नाहीत, ज्याचा परिणाम त्यांच्या संपूर्ण शरीरावर होतो. अगदी लहान वयातच केस पांढरे होऊ लागतात. जीवनाची परिस्थिती कशीही असली तरी स्वतःवर दबाव न आणणे चांगले.

3) सिगारेट आणि दारू 

फुफ्फुस आणि यकृत मुख्यतः सिगारेट आणि अल्कोहोल पिण्याने खराब होऊ लागतात. ही वाईट सवय केस पांढरे होण्याचे कारण बनते. यामुळे टाळू कमकुवत होतो आणि केसांच्या रक्ताभिसरणावर परिणाम होतो.

टेंशनमुळे भलते सलते विचार मनात येतात, झोपच येत नाही? 5 उपाय करा; डोकं, मन नेहमी राहील शांत

4) शारीरिकदृया सक्रीय नसणं

केसांच्या आणि शरीराच्या एकूण आरोग्यासाठी शरीर सक्रिय असणं खूप गरजेचं आहे, तुम्हाला आळस सोडावा लागेल, तरच तुम्ही पांढऱ्या केसांसह अनेक समस्या टाळू शकता. वर्कआउट न केल्यामुळे रक्ताभिसरण बरोबर होत नाही आणि मग यातून पोषण टाळूपर्यंत पोहोचत नाही, परिणामी केस लहान वयातच पांढरे होऊ लागतात. 

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स