आपली त्वचा चमकदार, मुलायम आणि सुंदर दिसण्यासाठी फक्त त्वचा स्वच्छ ठेवणे किंवा क्रिम्स लावणे एवढेच पुरेसे नसते. त्वचा सुंदर दिसण्यासाठी त्वचेची तितकीच काळजी घेणे देखील महत्वाचे असते. प्रत्येकाला आपली त्वचा खूप खास दिसावी असे कायम वाटत असते. यासाठी अनेकजणी दर महिन्याला पार्लरमध्ये जाऊन महागड्या ट्रिटमेंट्स करुन घेतात. असे असले तरीही काहीवेळा बिझी लाइफस्टाइलमुळे आपल्याला पार्लरला (How can I take care of my skin naturally at home?) जायला पुरेसा वेळ मिळत नाही. अशा परिस्थितीत घरच्या घरी देखील अगदी सहज सोप्या टिप्स वापरुन त्वचेची काळजी घेता येते(How do I care for my skin at home without going to the beauty parlour).
जर आपण पार्लरला जायचे सोडून घरच्या घरी त्वचेची देखभाल केल्यास त्याचे अनेक चांगले परिणाम त्वचेवर दिसून येतील. घरच्या घरी त्वचेची योग्य ती काळजी घेतल्यास त्वचेच्या अनेक समस्या अगदी लगेच कमी होण्यास मदत होईल. यासोबतच जर आपण पार्लरला न जाता घरीच त्वचेची देखभाल केल्यास केमिकल्सयुक्त प्रॉडक्ट्सचा वापर आपल्या त्वचेवर कमी प्रमाणांत केला जाईल. यामुळे त्वचा नैसर्गिक पद्धतीने सुंदर बनवण्यास मदत होईल. यामुळेच घरच्या घरी त्वचेची काळजी नेमकी कशी घ्यावी जेणेकरुन पार्लरला जाण्याची वेळच येणार नाही, यासाठीच्या काही टिप्स लक्षात ठेवूयात(How do I care for my skin at home without going to the beauty parlour).
घरच्या घरी त्वचेची काळजी कशी घ्यावी ?
१. दिवसातून किमान दोन वेळा तरी चेहरा पाण्याने धुवून स्वच्छ करावा.
आपली त्वचा धूळ, प्रदूषण, माती, धूलिकण यांसारख्या बाहेरील वातावरणामुळे खराब होण्याची दाट शक्यता असते. यामुळे आपली त्वचा कोरडी, निस्तेज किंवा ऑइली होते. या सगळ्या समस्यांना दूर ठेवण्यासाठी आणि आपल्या त्वचेचा रंग सुधारण्यासाठी, दिवसातून किमान दोन वेळा तरी आपला चेहरा पाण्याने धुवा. सकाळी उठल्यावर आणि संध्याकाळी झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवावा. असे केल्याने त्वचा स्वच्छ तर होईलच यासोबत मुलायमही होईल. चेहरा वारंवार धुवून स्वच्छ केल्याने त्वचेचे पोर्स उघडतात यामुळे त्वचा मोकळा श्वास घेऊ शकते. याचबरोबर त्वचेवरील सुरकुत्या व एजिंगच्या खुणा देखील कमी होतात.
२. आंघोळ करताना एकदम कडक गरम पाणी वापरू नका.
हिवाळ्यात अनेकजण आंघोळीसाठी गरम पाण्याचा वापर करतात. त्यामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जाते आणि त्वचा कोरडीही होऊ शकते. जर आपली त्वचा कोरडी असल्यास, बदाम, नारळ किंवा ऑलिव्ह ऑइल सारख्या नैसर्गिक तेलांनी त्वचेवर मसाज करावा. यासोबतच आंघोळ करताना शक्यतो साबणाचा वापर न करता सौम्य मॉइश्चरायझिंग बॉडी वॉश वापरावा. तसेच आंघोळीसाठी गरम कडक पाण्याचा वापर करण्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करावा.
काजळ जरुर लावा, पण हमखास होणारी १ चूक टाळा, नाहीतर डोळे व आजूबाजूची त्वचा होईल खराब...
३. त्वचा कायम कोरडी ठेवण्याचा प्रयत्न करावा.
घरच्या घरी त्वचेची काळजी घेण्यासाठी चेहरा धुतल्यानंतर त्वचेला रगडून पुसण्याऐवजी हलक्या हातांनी पुसून कोरडी करुन घ्यावी. अशाप्रकारे त्वचा स्वच्छ केल्यास त्वचेतील नैसर्गिक तेलं ही त्वचेत आहेत तासशीच टिकून राहतात. याशिवाय, असे केल्याने त्वचा देखील हायड्रेटेड राहते.
४. मॉइश्चरायझर वापरा.
घरच्या घरी त्वचेची काळजी घेण्यासाठी चांगले मॉइश्चरायझर वापरावे. मॉइश्चरायझर विकत घेताना आपल्या त्वचेचा प्रकार आणि ऋतूनुसार मॉइश्चरायझर निवडावे. उन्हाळ्यात कोरफड किंवा हलके मॉइश्चरायझर वापरा. हिवाळ्यात खोबरेल तेल आणि बदामाचे तेल असलेले मॉइश्चरायझर वापरा.
५. वेळच्या वेळी त्वचा एक्सफोलिएट करा.
त्वचा निरोगी ठेवण्यासाठी एक्सफोलिएट करणे खूप महत्वाचे आहे. एक्सफोलिएट केल्याने मृत त्वचा निघून जाईल आणि आपल्याला स्वच्छ, चमकदार त्वचा मिळेल. घरच्या घरी एक्सफोलिएट करण्यासाठी आपण होममेड स्क्रबचा देखील वापर करु शकता. एक्सफोलिएट करताना त्वचेवर जास्त दाब देऊ नका आणि जास्त वेळ स्क्रब करू नका.
घरच्याघरी १००% शुद्ध कोरफड जेल बनवायची सोपी कृती, ३ स्टेप्स - महागड्या जेलची गरजच नाही...