हेअर कलर करणे हा आजकालचा एकदम हटके ट्रेंड आहे. सध्या जो - तो आपल्या केसांना वेगवेगळ्या प्रकारचे हेअर कलर करुन अधिक आकर्षक दिसण्याचा प्रयत्न करत असतो. विशेषतः तरुणी व स्त्रिया या केसांना वेगवेगळ्या प्रकारचे रंग देतात. केसांना छान रंग देता यावेत म्हणून काहीजण घरीच अनेक रंगांचे हेअर डाय शेड्स (7 Ways To Avoid Hair Color Fading) आणून केस रंगवितात. इतकेच नव्हे तर काहीजण केसांना रंग देण्यासाठी पार्लरला जाऊन महागड्या ट्रिटमेंट्स करणे अधिक पसंत करतात. नवीन लुक करायचा असं म्हटंल की, खूप पैसे, वेळ आणि मेहनत घ्यावी लागते. परंतु या सगळ्यानंतरही आपल्याला केसांचा रंग लवकर जाऊ नये असे वाटत असते(How do I keep my hair from fading after dying it?).
काहीवेळा केसांना महागडे हेअर कलर केल्यानंतर काही दिवसांतच केसांचा कलर निघून जातो आणि ते पहिल्यासारखे शुष्क दिसू लागतात. यामुळेच हेअर कलर केलेल्या केसांची आपल्याला अधिक काळजी घ्यावी लागते. जर हेअर कलर केल्यानंतर केसांची व्यवस्थित काळजी घेतली नाही तर केस खराब होऊ लागतात. इतकेच नव्हे तर केसांसोबतच आपला वेळ, पैसे सगळेच वाया जाते. अशावेळी नेमके काय करावे हे समजत नाही. केसांवर केलेला हा महागडा (How to Prevent Your Hair Color From Fading) हेअर कलर लवकर न जाता, बरेचदिवस तो तसाच टिकून राहावा यासाठी काही सोप्या टिप्स फॉलो केल्या तर केसांचा रंग दीर्घकाळ (How do I keep my hair from fading after dying it?) टिकू शकतो. याशिवाय या केसांची काळजी घेतल्यास कलर केल्यानंतरही केस चमकदार आणि मऊ, मुलायम ठेवता येतात(How to Care for Your Hair After Coloring)
केसांचा कलर दीर्घकाळ टिकवण्यासाठी टिप्स...
१. कलर केल्यावर लगेच शॅम्पू करु नका :- केसांना कलर केल्यानंतर 2-3 दिवस केसांना शॅम्पू करण्याची गरज नाही. कारण केसांना कलर केल्यानंतर त्यांचे क्यूटिकल खुले होतात. शॅम्पू केल्यास केसांचा रंग धुऊन जाऊ शकतो. त्यामुळे केसांना कलर केल्यानंतर काही दिवस थांबा. यामुळे तुमच्या केसांचा रंग केसांमध्ये मुरेल आणि रंग बराच काळ तो आहे तसा टिकून राहिल.
२. योग्य शॅम्पू वापरा :- हेअर कलर केलेल्या केसांसाठी योग्य शॅम्पू निवडणे आवश्यक आहे, ज्यामुळे केसांचे संरक्षण होईल. केसांना केलेले काही रंग जास्त काळ टिकत नाहीत. मात्र शॅम्पू न केल्यास तो जास्त काळ टिकेल. त्यामुळे कलर - प्रोटेक्ट शॅम्पू आणि सल्फेट - फ्री शॅम्पूचाच वापर करा. यामुळे केसांचा कलर लवकर फिका पडणार नाही.
३. प्रोटीन मास्कचा वापर करा :- केसांना कलर केल्यानंतर आपल्याला त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. याआधी जर आपण कधी हेअर कलर लावला नसेल तर केसांची अधिक काळजी घ्यावी लागते. त्यामुळे आठवड्यातून एकदा शॅम्पूच्या एक तास आधी हेअर मास्क लावा. जर आपण केसांना प्रोटीन हेअर मास्क लावत असाल तर तो केसांसाठी उत्तम पर्याय ठरेल. प्रोटीन हेअर मास्कचा वापर केल्याने खराब झालेले केस चांगले होण्यास मदत मिळते.
४. गरम पाण्याचा वापर करु नका :- शॅम्पू करताना केस थंड पाण्याने धुवा. कोमट पाण्याने केस धुतल्याने क्युटिकल्स उघडतात आणि केसांचा कलर निघून जातो. त्यामुळे कोमट किंवा थंड पाण्याचा वापर करा.
शांत झोप आणि सुंदर व्हा ! ब्यूटी स्लिपचा घ्या निवांत फॉर्म्युला, चेहऱ्यावर येईल चमचमता ग्लो चकटफू...
५. केसांना हलक्या हाताने हाताळा :- हेअर कलर केल्यानंतर रोज केस धुण्याची सवय सोडा. आपण जितका वेळ शॅम्पू कराल तितक्या लवकर केसांना केलेला हा कलर निघून जाईल. त्यामुळे २ ते ३ दिवसांतून एकदा शॅम्पू करा आणि उर्वरित वेळी ड्राय शॅम्पू वापरा.
६. केसांना ट्रिम करत रहा :- केसांना महिन्या - दोन महिन्यांतून योग्य वेळी ट्रिम करत रहा. असे न केल्यास केस खराब होण्याची अधिक जास्त शक्यता असते. नियमित ट्रिमिंग केल्याने केसांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
७. हिटिंग टूल्सचा वापर कमी करा :- हेअर कलर केलेल्या केसांवर हेअर स्ट्रेटनर आणि कर्लर्स सारखे हिटिंग टूल्स वापरू नका. यातील उष्णता आपल्या केसांमधील ड्रायनेस काढून घेते, ज्यामुळे केसांची आर्द्रता कमी होते आणि ते शुष्क दिसू लागतात. त्यामुळे हार कलर केल्यानंतर स्टायलिंग टूल्सपासून दूर राहा.