केसांना सुंदर व निरोगी ठेवण्यासाठी आठवड्यातून दोन ते तीन वेळा तेल लावले जाते. केसांना तेल लावल्याने पोषण तर मिळतेच शिवाय केसांच्या अनेक समस्याही दूर होण्यास मदत मिळते. केसांना तेल लावून मसाज केल्याने फक्त केसच नाही तर स्कॅल्पला देखील पोषण मिळते. ज्यामुळे केसांची मुळं अधिक घट्ट होतात. केसांना तेल लावण्याचे अनेक फायदे आहेत पण कोणत्या प्रकारच्या केसांना कोणते तेल लावावे हे बहुतेकजणांना माहितच नसते(The best hair oils for you according to your hair porosity level).
लहानपणापासूनच आपल्या सर्वांना केसांना तेल लावण्याचे महत्त्व सांगितले जाते. केसांना पोषण मिळावे, त्यांची चांगली वाढ व्हावी म्हणून नियमितपणे तेल लावण्याचा सल्ला दिला जातो. आपण केसांच्या वेगवेगळ्या समस्यांनुसार केसांना वेगवेगळी तेलं लावतो. काहीवेळा आपण बदाम, तीळ, नारळ यांसारख्या वेगवेगळ्या तेलांचा वापर केसांसाठी करतो, परंतु आपल्या केसांना कोणत्या प्रकारचे तेल लावण्याची गरज आहे हे आपल्याला माहित नसते. काहीवेळा केसांना चुकीचे तेल लावल्याने देखील केसांच्या अनेक समस्या वाढू शकतात. केसांची काळजी घेतानाच, त्यांच्यासाठी काय योग्य, काय अयोग्य याकडेही नीट लक्ष दिले पाहिजे. केसांना तेल लावणे आवश्यक असते, परंतु आपल्या केसांची पोरॉसिटी काय आहे हे माहित नसून देखील उगाचच केसांवर तेल चोपडणे महागात पडू शकते. केसांची पोरॉसिटी म्हणजे काय ? ती कशी ओळखावी आणि त्यानुसार कोणत्या प्रकारच्या केसांना कोणते तेल लावावे याबाबद्दल अधिक माहिती पाहूयात(How To Choose Oil According To Your Hair Porosity).
१. हेअर पोरॉसिटी (Hair Porosity) म्हणजे काय ?
स्किन टाइपनुसार जसं स्किन केअर प्रॉडक्सची निवड करतो तसंच हेअर पोरॉसिटी नुसार हेअर प्रॉडक्स निवडायचे असतात. केसांच्या मॉईश्चर शोषून घेण्याच्या आणि ते होल्ड करून ठेवण्याच्या क्षमतेला 'हेअर पोरॉसिटी' असे म्हणतात. प्रत्येकाच्या केसांची पोषण पातळी वेगळी असते हे जाणून घेणे आवश्यक आहे. एखाद्याच्या केसांना थोडेसे तेल लावले तरी ते जास्त वाटू शकते, तर एखाद्याचे केस खूप तेल लावल्यानंतरही कोरडे दिसू शकतात. हेअर पोरॉसिटीचे तीन प्रकार असतात. या तीन प्रकारानुसारच, केसांसाठी नेमकं कोणतं तेल वापराव हे ठरवलं जात. हेअर पोरॉसिटीनुसार कोणत्या प्रकारच्या केसांना कोणतं तेल लावावं ते पाहूयात.
आलिया भट लावते कडुलिंब-तुळशीचा हिरवा फेसमास्क, तिच्यासारखं तेज हवं चेहऱ्यावर तर करा ‘असा’ फेसपॅक...
२. हेअर पोरॉसिटी कशी ओळखावी ?
हेअर पोरॉसिटी तपासण्यासाठी एका काचेच्या ग्लासात पाणी घ्यावे. त्या पाण्यात आपला केस टाकावा. केस जर पाण्यावर तरंगला तर लो हेअर पोरॉसिटी आहे. तसेच जर हा केस ग्लासच्या मधल्या मध्ये तरंगत असतील तर मिडीयम हेअर पोरॉसिटी आहे असे समजावे, आणि जर केस बुडून ग्लासच्या तळाशी गेला तर तुमच्या केसांची हाय हेअर पोरॉसिटी आहे असे समजावे.
अनन्या पांडे लावते ‘हा’ पिवळा फेसमास्क, १ रुपयाही खर्च न करता त्वचेवर येईल गोल्डन ग्लो...
१. लो हेअर पोरॉसिटी :- लो हेअर पोरॉसिटीमध्ये, केसांमध्ये तेल फारच कमी प्रमाणात शोषण्याची क्षमता असते. जर केसांची लो हेअर पोरॉसिटी असेल तर हेयर फॉलिकल खूपच जास्त प्रमाणात टाईट असतात. यासाठीच ज्यांच्या केसांची हेअर पोरॉसिटी लो असते अशांनी हलक्या व सौम्य तेलाचा वापर करावा. लो हेअर पोरॉसिटी असेल तर आपण जोजोबा, आर्गन, एवोकाडो, सूर्यफुलाचे तेल किंवा बदामाचे तेल केसांना लावू शकता. ही तेल केसांच्या केसांच्या क्यूटिकलमध्ये जाऊन मुरतात आणि केसांना मजबूत आणि घनदाट करण्याचे मुख्य काम करतात.
२. मिडीयम हेअर पोरॉसिटी :- मिडीयम हेअर पोरॉसिटी या प्रकारात, केसांची तेल शोषून घेण्याची क्षमता ही खूप चांगली असते. यात हेअर फॉलिकल जास्त प्रमाणात उघडलेले नसतात तसेच बंदही नसतात, म्हणजेच ते मध्यम आकाराचे असतात. मिडीयम हेअर पोरॉसिटी असणाऱ्यांनी आपल्या केसाला कडुलिंबाचे किंवा गुलाबाचे तेल लावणे अतिशय फायद्याचे ठरेल, यामुळे केसांना पोषण मिळून ते अधिक मजबूत होण्यास मदत मिळेल.
३. हाय हेअर पोरॉसिटी :- हाय हेअर पोरॉसिटी मध्ये, केसांची तेल शोषून घेण्याची क्षमता ही अधिक जास्त असते. त्यामुळे या प्रकारचे केस असणाऱ्यांनी केसांना हेव्ही तेल लावले तर ते फायद्याचे ठरते. हाय हेअर पोरॉसिटी असणाऱ्यांनी आपल्या केसाला एरंडेल, ऑलिव्ह ऑईल किंवा खोबरेल तेल लावले तर ते फायदेशीर ठरते. ही तेलं केसांना मजबूत करतात, त्यांना चमकदार बनवतात आणि त्यांची लवचिकता टिकवून ठेवण्यास मदत करतात. या तेलांचा वापर करून तुम्ही तुमच्या केसांतील मॉइश्चर लॉक करु शकता.