Lokmat Sakhi >Beauty > पाणी आणि ५ गुलाबच्या पाकळ्या; १०० % शुद्ध गुलाब जल करण्याची सोपी कृती-चेहऱ्यासाठी वरदान

पाणी आणि ५ गुलाबच्या पाकळ्या; १०० % शुद्ध गुलाब जल करण्याची सोपी कृती-चेहऱ्यासाठी वरदान

How do I make a rose water toner for the face : विकतचे रसायनयुक्त गुलाब जल कशाला? घरातच करा गुलाब पाणी ते ही १०० % शुद्ध..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2024 10:10 AM2024-03-01T10:10:55+5:302024-03-01T10:15:01+5:30

How do I make a rose water toner for the face : विकतचे रसायनयुक्त गुलाब जल कशाला? घरातच करा गुलाब पाणी ते ही १०० % शुद्ध..

How do I make a rose water toner for the face? | पाणी आणि ५ गुलाबच्या पाकळ्या; १०० % शुद्ध गुलाब जल करण्याची सोपी कृती-चेहऱ्यासाठी वरदान

पाणी आणि ५ गुलाबच्या पाकळ्या; १०० % शुद्ध गुलाब जल करण्याची सोपी कृती-चेहऱ्यासाठी वरदान

एक उत्कृष्ट आणि चेहऱ्याला तेज देणारं उत्पादन म्हणजे गुलाब पाणी. अँटी-ऑक्सिडंट्सनी समृद्ध गुलाब पाणी फक्त चेहऱ्याची चमक वाढवत नासून, चेहऱ्याला पोषण देखील देते. शिवाय चेहऱ्याचा सुरकुत्यापासून बचाव करते. गुलाबाचे पाणी उत्कृष्ट क्लीन्सर, मेकअप रिमूव्हर म्हणून काम करते (Beauty Tips). मुख्य म्हणजे सतत जर आपलं बाहेर जाणं-येणं असेल तर, ते चेहऱ्यावरील धूळयुक्त मातीचे कण काढून टाकते (Homemade Gulab Jal). आपण गुलाब पाण्याचे अनेक फायदे ऐकून बाजारातून विकत आणतो.

पण बऱ्याच गुलाब पाण्यात केमिकल घटक असतात. ज्यामुळे स्किन खराब देखील होऊ शकते (Skin Care Tips). त्यामुळे गुलाब पाणी घरी तयार केलेले काय वाईट? जर आपल्याला घरच्या घरी गुलाब जल तयार करायचं असेल तर, या टिप्स फॉलो करा. घरातच १०० टक्के शुद्ध गुलाब पाणी तयार होईल(How do I make a rose water toner for the face).

गुलाब जल तयार करण्यासाठी लागणारं साहित्य

गुलाबाच्या पाकळ्या

केसांची वाढ खुंटली-गळून विरळ झालेत? शाम्पूमध्ये मिसळा चहापत्तीचं पाणी-केसांसाठी खास टॉनिक

पाणी

अशा पद्धतीने तयार करा गुलाब जल

सर्वप्रथम, एका भांड्यात एक लिटर पाणी घ्या. गॅसवर भांडं गरम करण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी येण्याआधी गॅस बंद करा. नंतर त्यात गुलाबाच्या पाकळ्या घाला. गुलाबाच्या पाकळ्यांवर मुंगी किंवा इतर घाण लागली नसेल याची खात्री करून घ्या. हवे असल्यास आपण गुलाबाच्या पाकळ्या धुवून घालू शकता.

यानंतर भांडे झाकून त्यावर दुसरी प्लेट ठेवा. त्यात बर्फाचे तुकडे टाका. साधारण १५ ते २० मिनिटे असेच बंद राहू द्या. १५ मिनिटानंतर आपण पाहू शकता, पाकळ्यांचा रंग पाण्यात उतरला असेल. जर पाकळ्यांचा रंग पाण्यात उतरला नसेल तर, आपण ५ मिनिटांसाठी मध्यम आचेवर गॅस चालू करू शकता.

कोरियन तरुणींचं ब्यूटी सिक्रेट, तांदुळाच्या पिठात घाला फक्त २ गोष्टी; त्वचा चमकेल इतकी की..

पाणी थंड झाल्यानंतर गाळणीने गाळून पाणी वेगळ्या भांड्यात काढून घ्या, व पाणी एका बॉटलमध्ये भरून ठेवा. बॉटल नेहमी थंड जागेवर ठेवा. जेणेकरून गुलाब जल अधिक काळ टिकेल. आपण गुलाब पाण्यात लॅव्हेंडर ऑइल देखील घालू शकता. ज्यामुळे स्किनसाठी फायदेशीर ठरेल. अशा प्रकारे दुकानात मिळते तसे, गुलाब जल घरच्या घरी रेडी.

Web Title: How do I make a rose water toner for the face?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.