Join us  

केस खूपच पातळ झालेत? कोमट पाण्यात घाला '४' गोष्टी; केस वाढतील भरभर - गळत होते हेच विसराल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2024 10:00 AM

How do I reduce hair loss problems naturally : कांदा, आलं, चहापत्ती आणि मेथी दाणे; हेअर ग्रोथचं सिक्रेट दडलंय 'या' जादुई पाण्यात..

केस गळण्याची समस्या कॉमन झाली आहे (Hair Care). परंतु, यावर त्वरित उपाय करणं गरजचं. केस गळण्यामागे अनेक कारणं असू शकतात. परंतु, केस गळल्यानंतर पुन्हा जर वाढ होत नसेल तर, टक्कल पडण्याची शक्यता निर्माण होते. शिवाय केस पातळ होतात ते वेगळंच. केस गळू नये म्हणून, आपण विविध महागडे प्रॉडक्ट्सचा वापर करतो (Hair Growth). परंतु, प्रत्येक प्रॉडक्ट्सचा आपल्या केसांवर सकारात्मक परिणाम होईलच असे नाही. त्यामुळे रसायनयुक्त प्रॉडक्ट्सचा वापर करण्यापेक्षा आपण घरीच एक जादुई पाणी तयार करू शकता.

घरगुती साहित्यांचा वापर करून हे पाणी तयार होतं, शिवाय या पाण्यामुळे केस धुतल्याने केसांची उत्तम वाढ होते. फक्त हे पाणी तयार केल्यानंतर त्यात आवडीचा शाम्पू घालायला विसरू नका. पण हे जादुई पाणी तयार करण्यासाठी कोणत्या पदार्थांचा वापर होईल? या पाण्याचा वापर केसांवर कसा करावा? पाहूयात(How do I reduce hair loss problems naturally?).

हेअर फॉल रोखण्यासाठी 'या' जादुई पाण्यात मिसळा शाम्पू

लागणारं साहित्य

पाणी

आलं

कांदा

उर्फी जावेदसारखा चमचमता ग्लो हवा चेहऱ्यावर? तांदुळाच्या पाण्यात मिसळा 'ही' माती चमचाभर; बघा जादू

मेथी दाणे

चहापत्ती

कृती

सर्वप्रथम, एक इंच आलं किसून घ्या. एका भांड्यात २ कप पाणी घ्या. त्यात एक बारीक चिरलेला कांदा घाला. नंतर त्यात किसलेलं आलं, २ चमचे मेथी दाणे, एक चमचा चहापत्ती घालून मिक्स करा. भांडं गॅसवर ठेवा. उकळी फुटल्यानंतर गॅस २ मिनिटांसाठी मध्यम आचेवर ठेवा.

२ मिनिटानंतर गॅस बंद करा. एक वाटी घ्या. त्यावर चहाची गाळणी ठेवा. त्यात पाणी ओतून घ्या. पाणी कोमट झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा खोबरेल तेल घालून मिक्स करा. नंतर त्यात एक चमचा आपल्या आवडीचा शाम्पू घालून मिक्स करा.

आता केस विंचरून घ्या. ब्रश किंवा बोटाने शाम्पूचं पाणी केसांना लावा. ५ मिनिटानंतर केस पाण्याने धुवा. या पाण्यात घातलेल्या साहित्यांच्या गुणधर्मामुळे, केसांना पोषक घटक प्रदान होईल.

केसांसाठी कांद्याचे फायदे

ना पेस्ट - ना खर्च, १ रुपयाच्या शाम्पूने करा पेडीक्युअर, पायाचा काळेपणा होईल दूर; दिसतील स्वच्छ

कांदा फक्त जेवणाची चव वाढवण्यासाठी नसून, केसांसाठीही फायदेशीर ठरते. कांद्याच्या रसात अँटी-बॅक्टिरियल गुणधर्म असतात. ज्यामुळे टाळूच्या संसर्गापासून आपली सुटका होते. तसंच त्यातील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म केसातील कोंडा कमी करण्यास मदत करतात.

केसांचे आल्याचे फायदे

केसांवर आल्याचा नियमित वापर केल्याने, केस भरभर वाढतात. शिवाय केसांना नवी चमक येते. आल्यामध्ये अँटी-फंगल आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. ज्यामुळे टाळूवर होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून बचाव होतो.  

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स