Lokmat Sakhi >Beauty > चहा-कॉफी पिताना कपवर लिपस्टिकचे डाग पडू नयेत म्हणून खास ट्रिक- लिपस्टिकही पुसली जाणार नाही...

चहा-कॉफी पिताना कपवर लिपस्टिकचे डाग पडू नयेत म्हणून खास ट्रिक- लिपस्टिकही पुसली जाणार नाही...

How do you deal with lipstick remaining on the cups bottles etc while drinking : How To Prevent Lipstick Stains On Glasses, cups : ओठांवर लावलेली लिपस्टिक पुसली जाऊ नये किंवा चहा - कॉफी च्या मगवर लिप्स्टिकचे ठसे उमटू नये म्हणून अशी लावा लिपस्टिक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2024 02:54 PM2024-11-20T14:54:32+5:302024-11-20T15:00:31+5:30

How do you deal with lipstick remaining on the cups bottles etc while drinking : How To Prevent Lipstick Stains On Glasses, cups : ओठांवर लावलेली लिपस्टिक पुसली जाऊ नये किंवा चहा - कॉफी च्या मगवर लिप्स्टिकचे ठसे उमटू नये म्हणून अशी लावा लिपस्टिक...

How do you deal with lipstick remaining on the cups bottles etc while drinking How To Prevent Lipstick Stains On Glasses, cups | चहा-कॉफी पिताना कपवर लिपस्टिकचे डाग पडू नयेत म्हणून खास ट्रिक- लिपस्टिकही पुसली जाणार नाही...

चहा-कॉफी पिताना कपवर लिपस्टिकचे डाग पडू नयेत म्हणून खास ट्रिक- लिपस्टिकही पुसली जाणार नाही...

मेकअप करताना आपण सगळ्याचजणी ओठांवर लिपस्टिक लावणे पसंत करतो. लिपस्टिक लावल्याशिवाय आपला मेकअप पूर्ण झाला असे वाटतच नाही. ओठ सुंदर दिसावेत म्हणून आणि आपला मेकअप अधिक खुलून यावा यासाठी, आपण लिपस्टिक लावतो. लिपस्टिक लावल्याने ओठ सुंदर तर दिसतात परंतु एक अडचण येते ती म्हणजे ओठांवर लिपस्टिक लावली असताना काही खाणे - पिणे सहज शक्य होत नाही. ओठांवर लिपस्टिक लावल्यानंतर ती पुसली जाऊ नये म्हणून शक्यतो आपण  खाणे - पिणे टाळतो(How To Prevent Lipstick Stains On Glasses, cups).

ओठांवर लिपस्टिक लावल्यानंतर चहा - कॉफी पिताना या लिप्स्टिकचे ठसे कपच्या कडेवर उमटतात. यामुळे कप - मग खराब होतात. एवढंच नव्हे तर आपली लिपस्टिक देखील पुसली जाते. याचबरोबर, काहीवेळा चहा - कॉफी पिताना कप - मगवर असे लिप्स्टिकचे ठसे उमटले की चारचौघात ओशाळल्यासारखे वाटते. अशावेळी ओठांवर लावलेली लिपस्टिक काही खाताना - पिताना पुसली जाऊ नये किंवा चहा - कॉफी च्या मगवर लिप्स्टिकचे ठसे उमटू नये म्हणून नेमकी कोणत्या पद्धतीने ओठांवर लिपस्टिक लावावी ते पाहूयात. ओठांवर लावलेली लिपस्टिक काही खात- पित असताना किंवा त्याचे ठसे कपवर उमटू नये यासाठी ही एक सोपी ट्रिक नक्की वापरुन पहा(How do you deal with lipstick remaining on the cups bottles etc while drinking).

ओठांवरील लिपस्टिकचे ठसे कप - मगवर उमटू नये यासाठी... 

जेव्हा आपण ओठांवर लिपस्टिक लावतो, तेव्हा ती लिपस्टिक पुसली जाऊ नये म्हणून आपण खूप काळजीपूर्वक खातो - पितो. परंतु काहीवेळा खाताना - पिताना आपल्या ओठांवरची ही लिपस्टिक अन्नपदार्थ किंवा कप - मगच्या कडेवर लागून पुसली जाते किंवा त्याचे ठसे कपवर उमटतात. अशावेळी नेमके काय करावे सुचत नाही. यासाठी आपण एक सोपी ट्रिक करुन वापरुन ही अडचण दूर करु शकतो. या ट्रिकचा वापर केल्याने आपल्या ओठांवरची लिपस्टिक पुसली न जाता आहे तशीच ओठांवर टिकून राहील. याचबरोबर, चहा - कॉफी पिताना लिप्स्टिकचे ठसे देखील कप - मगच्या कडेवर उमटणार नाहीत. 

चहा - कॉफी पिताना लिप्स्टिकचे ठसे कप - मगच्या कडेवर उमटू नये म्हणून virtualdiva.official या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक सोपी ट्रिक शेअर करण्यात आली आहे. 

थंडीत त्वेचेला भेगा पडतात-काळपटपणा येतो? खोबरेल तेलात मिसळा ३ पदार्थ, त्वचा राहील मऊ मुलायम कायम!


मेकअप किट-पाऊचमध्ये ब्यूटी प्रॉडक्ट्स सांडून खराब होते? १ ट्रिक, सांडून वाया जाणार नाही...

 लिप्स्टिकचे ठसे कप - मगच्या कडेवर उमटू नये म्हणून लिपस्टिक लावतानाच खबरदारी घेतली पाहिजे. यासाठी, लिपस्टिक लावताना टॅल्कम पावडरचा वापर करावा. लिपस्टिक लावण्यापूर्वी थोडीशी टॅल्कम पावडर हातांवर घ्या. आता लिपस्टिकच्या टोकाला थोडीशी टॅल्कम पावडर लावून घ्यावी. आणि तशीच लिपस्टिक ओठांवर फिरवून घ्यावी. किंवा ओठांवर लिपस्टिक लावल्यानंतर बोटांच्या मदतीने थोडीशी टॅल्कम पावडर ओठांवर हलकेच लावून पसरवून घ्यावी. या सोप्या आणि झटपट ट्रिकमुळे आपली लिपस्टिक पुसली न जाता दिवसभर ओठांवर आहे तशीच बराच काळ टिकून राहते. यासोबतच, काही खात-पित असताना किंवा चहा - कॉफीच्या कपवर लिप्स्टिकचे डाग पडणार नाहीत.

Web Title: How do you deal with lipstick remaining on the cups bottles etc while drinking How To Prevent Lipstick Stains On Glasses, cups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.