स्किन केअर म्हटलं की आपण चेहरा आणि हाताची विशेष काळजी घेतो (Skin Care Tips). पण बहुतांश वेळा मानेकडे आपले दुर्लक्ष होते. अंघोळीदरम्यान आपण मान घासून साफ करतो तेवढंच (Dark Neck home remedy). परंतु चेहरा, मान यांचा एकसमान रंग आपल्याला दिसत नाही. मानेचा काळेपणा घालवण्यासाठी काही लोक सौंदर्य उत्पादनांचा वापर करतात.
पण सौंदर्य उत्पादनांचा वापर करण्यापेक्षा आपण टूथपेस्टच्या वापरानेही काळेपणा घालवू शकता. यासाठी आपल्याला काही घरगुती साहित्यांची गरज आहे. या साहित्यांमध्ये टूथपेस्ट मिसळून पेस्ट तयार करा. या पेस्टचा वापर केल्याने मानेचा काळेपणा, हाताचे कोपरे काही मिनिटात स्वच्छ होतील(How Do You Get Rid of a Dark Neck? use spoonful of Toothpaste).
मानेचा काळेपणा घालवण्यासाठी टूथपेस्टचा करा असा वापर
लागणारं साहित्य
लांब आणि दाट केस हवेत? जास्वंदाच्या फुलांचा करा 'असा' वापर; केसांची प्रत्येक समस्या होईल दूर
बेसन
हळद
दही
टूथपेस्ट
खोबरेल तेल
काळेपणा घालवणारी क्रीम
मानेचा काळेपणा घालवण्यासाठी एका बाऊलमध्ये २ चमचे बेसन घ्या. त्यात अर्धा चमचा हळद, २ चमचे दही घालून मिक्स करा. नंतर त्यात अर्धा चमचा टूथपेस्ट, अर्धा चमचा खोबरेल तेल आणि एक चमचा शाम्पू घालून मिक्स करा. अशा प्रकारे मानेचा काळेपणा घालवणारी क्रीम रेडी. आपण या क्रीमचा वापर मानेवर आणि हाताच्या कोपऱ्याचा काळेपणा घालवण्यासाठी करू शकता.
जावेद हबीब सांगतात घरगुती नुस्खा; आल्याच्या रसात मिसळा '१' खास तेल; केस वाढतील इतके की..
काळेपणा घालवणारी क्रीम कशी वापरावी?
सर्वात आधी मान स्वच्छ धुवून घ्या. नंतर चमचा किंवा बोटाने क्रीम मानेवर लावा. ५ मिनिट तसेच राहू द्या. ५ मिनिटानंतर हाताने काही वेळासाठी रगडा. शेवटी पाण्याने मान धुवा. आपण या क्रीमचा वापर आठवड्यातून २ वेळा करू शकता. यामुळे त्वचा उजळेल.